तत्वज्ञानात एक फार सुंदर वाक्य आहे.
“जर तुमच्याकडे एक पैसा आणि माझ्याकडे एक पैसा असेल आणि तो एक पैसा मी जर तुम्हाला किंवा तुम्ही मला दिला तर आपल्यापैकी एकाकडे दोन पैसे होतील. पण, दुसऱ्याकडे काहीच नसेल.
मात्र, जर तुमच्याकडे एक विचार असेल व माझ्याकडे एक विचार असेल आणि आपण त्या विचारांची अदलाबदली केली, तर आता मात्र दोघांकडेही दोन विचार कायमस्वरूपी राहतील..!”
हे सामर्थ्य केवळ विचारांमध्ये आहे. आपण जसा विचार करतो तसेच घडतो.
‘मन करा रे प्रसन्न..!’ म्हटलं आहे ते याचसाठी.
कारण, मनात जसे विचार निर्माण होतात, तशी ‘मानसिकता’ तयार होत जाते.
एखाद्या व्यक्तीची, कुटुंबाची, समाजाची अथवा देशाची सुद्धा मानसिकता अशीच सकारात्मक होतं जाते. याच न्यायाने जेव्हा ‘भारतीयांची’ मानसिकता अधिक सकारात्मक होईल तेव्हा अधिक समर्थ व सशक्त भारत निर्माण होईल.
पण हे सगळं करणार कोण?
भारतीय या नात्याने हे आपल्यालाच करायला हवं.
आणि नेमक्या याच प्रेरणेतून ‘टीम भारतीयन्स’ची जडणघडण झाली आहे.
‘टीम भारतीयन्स’ ही केवळ एकत्र काम करणारी ‘टीम’ नाही तर सकारात्मकता स्वत:च्या वागण्या-बोलण्यात, विचारात पेरलेला आणि एका संकल्पपूर्तीच्या दिशेने जाणाऱ्या कुटुंबीयांचा हा आमचा परिवार आहे.
आमच्या या परिवाराचे नाव आहे ‘भारतीयन्स’ आणि ओळख आहे पॉझिटीव्हिटी.
‘पॉझिटीव्हिटी’ या एकाच छताखाली आम्ही एकत्र आलो आहोत.
आमच्यात कोणी इंजिनीअर आहे, प्राध्यापक आहे, डेव्हलपर आहे, कोर्पोरेट जगतातले लोक आहेत, पत्रकार आहेत, लेखक आहेत आणि अगदी गृहिणीसुद्धा आहेत.
नानाविध क्षेत्रात काम करणारे असे आम्ही जगभरात घडणाऱ्या पॉझिटीव्ह स्टोरीज घेऊन रोज आपल्यासमोर येतो आणि सांगतो की, पेला कायम अर्धा भरलेलाच असतो, रिकामा नाही..!
आमच्या या ‘टीम भारतीयन्स’मध्ये उत्तम भाषांतरकार आहेत. संपादक आहेत. प्रत्येक कथेला सुंदर कोलाजच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडणारे डिजायनर्ससुद्धा आहेत.
अब्दुल कलामांच्या ‘मिशन २०२०’ या सुंदर स्वप्नामध्ये असलेल्या आधुनिक भारताच्या जडणघडणी साठी कार्यरत असलेल्या विचारांच्या या यज्ञात रोज सकारात्मकतेचीच आहुती पडावी याचसाठी आम्ही करतो आहोत ही धडपड.
आम्ही तयार केलेल्या वेगवेगळ्या स्टोरीज तुम्ही ‘भारतीयन्स’वर वाचत आहातच. त्यातून तुम्हाला नक्कीच सकारात्मकता, नवी ऊर्जा आणि जगण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती मिळतेच आहे...!
आम्हाला अनेकदा विचारलं जातं की, ‘टीम भारतीयन्स’ कोणत्या प्रेरणेतून कार्य करते. तेव्हा त्याचं उत्तर असं द्यावसं वाटतं की,
है कठीन यह मार्ग लेकिन
अनवरत हम बढ़ रहे है ,
इन प्रबलतम आंधीयोंसे
हम निरंतर लड़ रहे है ,
साधना साकार कर दे,
बस यहीं निश्चय है,
चिरविजय की कामना है,
कर्म ही आराधना है...!
भारत माता की जय !! जय हिंद..!!