Bhartiyans

Menu

Welcome To Bhartiyans :: bhartiyans

भारतीयन्स


भारतीयांनो नमस्कार..!

आम्हा 'टीम भारतीयन्स'च्या दिवसाची सुरुवात विलक्षण प्रेरणादायी अश्या पॉझिटीव्ह विचारांनीच होते.

'भारतीयन्स'च्या वेबसाईटमुळे आणि फेसबुकपेजमुळे आम्ही सकाळी उठल्या उठल्या देशभरातल्या आणि देशाबाहेरील भारतीयांच्यासुद्धा फक्त आणि फक्त पॉझिटीव्हीटीने भारलेल्या, सकारात्मकतेने मंतरलेल्या गोष्टी वाचतो, अनुभवतो आणि जगतोसुद्धा....!

यामुळचे आम्ही कायम सकारात्मक वातावरणात असतो.

इतरत्र कुठे असं वातावरण आपल्याला मिळतं का ? मिळेल का?
दुर्दैवाने नाही मिळणार!

सकाळ झाली की चहूबाजूंनी फक्त निगेटिव्ह गोष्टी, नकारात्मक बातम्या चहूबाजूंनी कानावर पडायला लागतात. खून, मारामाऱ्या, बलात्कार, अनैतिक संबंध, फसवणूक, भ्रष्टाचार, राजकारण्यांचे आरोप-प्रत्यारोप, अफरातफरी या आणि अशाच सगळ्या...! केवळ डोकं फिरवणाऱ्या आणि भणाणून सोडणाऱ्या बातम्या !

अनेक मानसोपचार तज्ञ म्हणतात, की निगेटिव्ह विचारांच्या, बातम्यांच्या सहवासात सतत राहिल्याने आपलं व्यक्तिमत्वसुद्धा काळत-नकळत निगेटिव्ह व्हायला लागतं. आपण कोणावरच विश्वास ठेवेनासा होतो, शंकेखोर वृत्ती बळावते आणि आपण निर्णय सुध्दा चुकीचे घ्यायला लागतो.

नकारात्मकतेचा आपल्या मनावर, मेंदूवर आणि आपल्या आयुष्यावर एवढा प्रभाव पडतो, की हळूहळू आपण अजाणता निराशेच्या, न्यूनगंडाच्या गर्तेत जातो.

याउलट जर नेहमी चांगल्या, उत्साहवर्धक आणि कठीण परिस्थितीतसुद्धा लढून जिंकलेल्या माणसांच्या प्रेरणादायी अशा सकारात्मक बातम्या आपल्या समोर येत गेल्या तर...?
तर, त्याचा परिणाम नक्कीच सकारात्मकच होईल.

आजही अनेक चांगल्या विचारांचे लोक आपल्या आजूबाजूस कार्यरत आहेत. अनेक चांगली कामे कुठलाही गाजावाजा न करता होत आहेत. संकटांचा महासागर समोर असतानासुद्धा डोकं शांत ठेवून, सद्सद्विवेकबुद्धीने सकारात्मक विचारांचे अधिष्ठान ठेवून, धैर्याने, कष्टाने, साहसाने आणि सातत्याने प्रयत्न करून ध्येय गाठण्यात यशस्वी होत आहेत. कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता रंजल्या-गांजल्यांना मदत करत आहेत. अन्यायाविरुद्ध संघटितपणे आवाज उठवत आहेत.

असं सकारात्मक जेव्हा आपण वाचतो, पाहतो आणि अनुभवतो तेव्हा या सगळ्याचा परिणाम होऊन आपणसुद्धा सकारात्मक विचारांनी भरून जातो, विश्वास द्यायला आणि ठेवायला लागतो, चांगले निर्णय घ्यायला लागतो, यशस्वी व्हायला लागतो....!

एखादी गोष्ट कुणीही, कितीही मोठ्या माणसाने, उत्तमोत्तम शब्दांत सांगितली, की त्याचा जो परिणाम होतो त्यापेक्षा खूप जास्त सकारात्मक परिणाम हा नेहमीच एखाद्या पॉझिटीव्ह बातमीने होतो. पॉझिटीव्ह बातमी ही नेहेमीच पॉझिटीव्ह गोष्टी करण्याची प्रेरणेचे मुख्य कारण ठरते.

आपण जितकं जास्त बळ पॉझिटीव्ह गोष्टींना देऊ तितकं निगेटिव्ह गोष्टी आपोआप नष्ट होत जातील. हेच आहे ‘भारतीयन्स’चं मुख्य ध्येय...!

आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या परंतू आपल्यापर्यंत न पोहोचणाऱ्या शेकडो, हजारो सकारात्मक बातम्या ‘टीम भारतीयन्स’ विविध माध्यमांतून सतत शोधून काढते आणि अद्ययावत तंत्रज्ञानाच्या साहाय्याने तुमच्या समोर ठेवते तुमच्यासाठी..... आपल्यासाठी....भारतीयांसाठी...भारतासाठी....!

१५ ऑगस्ट २०१६ला 'भारतीयन्स’चे फेसबुक पेज लॉन्च झाले तेव्हा टीम साईझ होती ८.
२६ जानेवारीला 'भारतीयन्स’ची वेबसाईट लॉन्च होते आहे आणि आज टीम साईझ आहे ५२!
आजपर्यंत या पेजचे व्ह्यूज झाले आहेत ४०,००,००० +.

लवकरच 'भारतीयन्स'ची ही वेबसाईट संस्कृतसह सर्व भारतीय भाषांमध्ये आपल्याला पहायला मिळेल. त्यादृष्टीने रचना सुरू असून ते काम आता अंतिम टप्प्यात आलं आहे.

केवळ भारतातच नाही तर अमेरिका, इंग्लंड, सिंगापूर, दुबईसारख्या देशांमध्येसुद्धा 'भारतीयन्स’चे टीम मेंबर्स आहेत.

देशात आणि पर्यायाने या विश्वात सकारात्मक विचारांची पेरणी करत जाणं हेच आमचं ध्येय आहे, कर्तव्य आहे आणि 'मिशन' आहे..!

चला तर मग, पॉझिटीव्ह वाचूया, पॉझिटीव्ह विचारांमध्ये राहूया आणि पॉझिटीव्ह आयुष्य जगूया !!

भारत माता की जय !जय हिंद !