Bhartiyans

Menu

आपल्या राष्ट्रीय स्तरावरील नेमबाज असलेल्या कन्येसाठी अत्याधुनिक रायफल विकत घेण्यासाठी धडपडणाऱ्या कुटुंबाची वाटचाल

Date : 10 Nov 2016

Total View : 105

आपल्या राष्ट्रीय स्तरावरील नेमबाज असलेल्या कन्येसाठी अत्याधुनिक रायफल विकत घेण्यासाठी धडपडणाऱ्या कुटुंबाची वाटचाल


सारांश

पाच लाख हि रक्कम एका रिक्षाचालकासाठी नक्कीच मोठी आहे. परंतु आपल्या लेकीच्या नेमबाजी करिअरसाठी रात्रंदिवस मेहनत करून आंतरराष्ट्रीय दर्जाची रायफल विकत घेतली व गुजरात पोलिसांच्या सहकार्याने तिला परवानाही मिळवून दिला.सविस्तर बातमी

खरंतर किती तुटपुंजे रोजचे उत्पन्न असते एका सामान्य गरीब रिक्षाचालकाचे ?

पण पोटच्या पोरी साठी हा गरीब बाप, अख्खे कुटुंब प्रसंगी वाट्टेल तो त्याग करतात, 
आपल्या राष्ट्रीय नेमबाज असणाऱ्या लेकीला महागडी ५ लाखांची अत्याधुनिक रायफल घेऊन देतात....मानलं या सगळ्यांना..अक्षरशः मानलं
#Bharatiyans

आज भेटूया अहमदाबाद इथल्या मणिलाल गोहील यांना आणि त्यांच्या कन्येला, मित्तलला...

राष्ट्रीय स्तरावर नेमबाज असलेल्या मित्तल गोहीलचे ऑटोरिक्षा चालवणारे वडील श्री मणिलाल गोहिल, परिस्थिती नसतानाही आपल्या पोटच्या मुलीला ५ लाखांची रायफल घेऊन देतात.

पाच लाख ही कदाचित आजकाल फार मोठी रक्कम नसेल अनेक जणांसाठी पण गुजरात मधल्या पोलीस दलासाठी ही घटना इतकी आश्चर्यजनक आहे की नियमानुसार ज्या स्थानिक पोलीस आयुक्तांकडे मणिलाल आणि मित्तल, या रायफलच्या परवान्यासाठी गेले त्यांना ह्या जगावेगळ्या बापाचं विलक्षण कौतुक वाटलं.

एक सर्वसामान्य रिक्षा चालक असून सुद्धा त्यांनी एवढी मोठी रक्कम जमा करून आपल्या मुलीसाठी एक आंतरराष्ट्रीय दर्जाची रायफल विकत घेतली.

सुदैवाने पोलिसांनी त्यांना परवानाही मिळवून दिला आणि वर मणिलालजींचे मनापासून कौतुकही केले.

अहमदाबाद येथे गोमतीपुर परिसरात एका साध्याश्या चाळीत आपल्या २ भावांसह राहणारी मित्तल म्हणते, \\\\\\\\"माझ्या वडिलांनी आणि कुटुंबीयांनी माझ्या या महागड्या छंदासाठी खूप त्याग केला आहे. आता ही रायफल मिळाल्यावर मी अथक परिश्रम करून आंतराष्ट्रीय स्तरावर आपल्या भारताचं प्रतिनिधित्व करण्याचं आणि उत्तुंग यश खेचून आणण्याचं आम्हां सर्वांच स्वप्न साकार करणार आहे.\\\\\\\\"

मित्तल आज ४ वर्षे रायफल नेमबाजीचं प्रशिक्षण घेत आहे.

आश्चर्याचा भाग म्हणजे शुटींग ही मित्तलची पॅशन कधीच नव्हती. इंडियन आर्मी जॉईन करणे हेच तिचे स्वप्न होते. पण तिच्या कमी उंचीमुळे तिचे ते स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही.

तिने PSIची परीक्षा सुद्धा उत्तीर्ण केली होती पण तिच्या शारीरिक अडचणींमुळे तिला ही सर्व्हिस जॉईन करता आली नव्हती.

मित्तलचा लहान भाऊ मितेश हा सुद्धा आता पिस्तुल शुटर म्हणून यशस्वी होण्याचा प्रयत्न करतो आहे.

मित्तलच्या ह्या नेमबाजीच्या वेगळ्याच अश्या ‘श्रीमंती वेडाची’ सुरुवात अहमदाबाद येथील रायफल क्लब’मध्ये, ज्यावेळी तिने तिथून जात असताना, प्रत्यक्ष रायफल प्रशिक्षण घेताना काही विद्यार्थ्यांना पहिले तिथून झाली.

तत्क्षणी ह्या तरुण मुलीने आपल्या ध्येयाची दिशा निश्चित केली आणि आपण ह्या रायफल नेमबाजी साठीच पुढील आयुष्य वेचायचं असं मनोमन ठरवलं.

एक कुटुंब, ज्यांचं पालनपोषण एका गरीब मणिलालजींच्या रिक्षा चालवण्यामुळे होत होतं, त्यांच्यासाठी हा महागडा छंद कसा काय परवडणार?

परंतु मुलीवर जीवापाड प्रेम करणाऱ्या त्या बापाने तिला अजिबात नाराज केलं नाही, तिला तिच्या नेमबाजीच्या ध्येयापासून दूर जाण्यास भागही पाडलं नाही आणि ते थेट तिला रायफल क्लब मध्ये घेऊन गेले आणि तिचं प्रशिक्षण सुरु करून, भाड्याने एक रायफलही घेऊन दिली.

हे क्षेत्र करिअर म्हणून निवडण्याचा तिचा निर्णय किती योग्य आहे हे मित्तलने सुद्धा लगेचच सिद्ध केले.

२०१३ मध्ये अगदीच कमी वेळ सराव करूनसुद्धा मित्तलने ५७ व्या ऑल इंडिया नॅशनल शुटींग चॅम्पियनशीप मध्ये भाग घेतला आणि अंजू शर्मा तसेच लज्जा गोस्वामी या दोघा सहकाऱ्यांसोबत या उच्चस्तरीय स्पर्धेत तिने ब्राँझ मेडल पटकावले.

एका नावाजलेल्या राष्ट्रीय स्पर्धेत एव्हढे घसघशीत यश संपादन केल्यानंतर आता मात्र मित्तलचा आत्मविश्वास शेकडो पटींनी वाढला आणि यामुळेच तिचा खेळ सुद्धा सुधारला होता.

पण आता मात्र तिच्या स्वतःच्या रायफल शिवाय पुढचे ठिकठिकाणचे रायफल शुटींगचे ऍडव्हान्स प्रशिक्षण घेणे तिला प्रचंड अडचणीचे होऊ लागले.

मित्तलच्या याच अनंत अडचणींना आणि घुसमटीला स्वतःहून वेळीच ओळखले तिच्या बाबांनी आणि तिचा मोठा भाऊ जैनेशने.

या दोघांनी मिळून आता तिला तिची स्वतःची वैयक्तिक अशी अत्याधुनिक जर्मन-मेड ५० मीटर रेंजची रायफल विकत घेण्यासाठी पैशांची जमवाजमव करायला सुरुवात केली.

याचाच अर्थ होता की इतर पैशांसोबातच, मित्तलच्या लग्नासाठी तिच्या वडलांनी वेळोवेळी बाजूला काढून ठेवलेले पैसे सुद्धा या रायफलसाठी त्यांना वापरावे लागणार होते.

शेवटी या पाच लाख रुपयांची जमवाजमव करताना, कर्ता पुरुष साधे गरीब रिक्षा चालक असणाऱ्या, त्या संपूर्ण कुटुंबाने अतोनात हाल-अपेष्टा भोगत का होईना सहा महिन्यानंतर आपल्या घरातल्या या पोटच्या मुलीला, एका बहिणीला, अत्याधुनीक अशी तीची स्वतःची जर्मन-मेड रायफल विकत घेवून दिलीच.

वडील आणि भावाने रक्ताचे पाणी करत, थेंब-थेंब पैसे जमवत या घरच्या कन्येला घेऊन दिलेली हीच महागडी अद्ययावत रायफल घेवून कंबर कसून सराव करत असेलली मित्तल आता डिसेंबर २०१६ मध्ये प्रचंड मोठ्या आत्मविश्वासाने राष्ट्रीय स्पर्धांमध्ये उतरणार आहे.

मित्तलची ही नवीन जर्मन-मेड रायफल आठ किलो वजनाची आहे आणि हीची एक बुलेट किमान ३१ रुपयांना पडते.

कुठल्याही स्पर्धेमध्ये उतरण्यासाठी मित्तलला किमान अश्या १००० बुलेटस विकत घ्याव्या लागणार आहेत.

ही महागडी रायफल विकत घेतल्यानंतर आता या हे कुटुंब या रायफलसाठी लागणाऱ्या गोळ्या विकत घेण्याच्या विवंचनेत आहे.

पोटच्या मुलीसाठी रक्ताचे पाणी करणारा बाप, तिच्या या स्वप्न-पूर्तीसाठी हाल-अपेष्टा सोसणारे कुटुंब आणि या सगळ्यांच्या अपेक्षांना खरी उतरणारी कर्तुत्ववान मुलगी जेव्हा एका अत्युच्च ध्येयासाठी आता काबाड-कष्टी सराव करते आहे, पराकोटीची मेहेनत करते आहे...

....तेव्हा येत्या एखाद्या ऑलिम्पिक मध्ये \\\\\\\\"मित्तल गोहील\\\\\\\\" ही भारतीय, तुम्हा आम्हा सर्वांसाठी एखादे मेडल नक्की आणणार ही काळ्या दगडावरची रेघ.

गोहील कुटुंबियांना आम्हा ‘टीम भारतीयन्स’चा मानाचा मुजरा....

#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his ‘Mission 2020’ .

 

 

मिलिंद वेर्लेकर

टीम भारतीयन्स

बातमी सौजन्य