Bhartiyans

Menu

आपल्या दृष्टिदोषावर मात करून

Date : 10 Nov 2016

Total View : 485

न्यूयॉर्क सारख्या शहरात आपल्या दृष्टिदोषाला हरवून


सारांश

न्यूयॉर्क सारख्या शहरात आपल्या दृष्टिदोषाला हरवूनसविस्तर बातमी

\\"जे जे उत्तम, उदात्त, उन्नत, महन्मधुर ते ते..\\" 
आज आपण भेटणार आहोत अचाट सामर्थ्य असलेल्या एका ‘हिरो’ला, ज्याला स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ‘जयोस्तुते’मधल्या या ओळी, अगदीच शोभून दिसतील, 
हा “मुंबई’बॉर्न” लंडन’स्थीत ३४ वर्षीय अंध तरुण, सर्व भीषण अडचणींवर कष्टसाध्य ध्यासाने मात करून, अमेरिकेच्या \\"वॉल स्ट्रीट\\"वरचा एक यशस्वी भारतीय शेअर ट्रेडर म्हणून मानाने उभा आहे. (वेळ काढून नक्की वाचा, प्रेरणादायी आहे) 
#Bharatiyans

आपल्या दृष्टिदोषावर मात करून \\"वॉल स्ट्रीट\\" वर पहिला अंध शेअर ट्रेडर म्हणून काम करणारा आशीष गोयल, हा मूळ मुंबईचा मुलगा World Economic Forum मध्ये १८७ वा \\"Young Global Leader\\" म्हणून नामांकित झाला.

उत्तुंग भविष्याच्या व्यासपीठवर, एक महिला अफगाणी तंत्रज्ञान उद्योजक, जपान मधील एक तरुण राजकारणी, अश्या त्या त्या क्षेत्रातील भल्या भल्या तज्ञांना मागे टाकून, आर्थिक बाजारातील (financial market) एक तरुण “भारतीय” तज्ञ पुढे येतो आणि त्याला \\"Young Global Leader\\" म्हणून देश-परदेशांमधून मानांकन मिळतं ही खरंच आपल्या सर्वांसाठीच एक अत्यंत गौरवाची गोष्ट आहे!

अत्यंत नम्र असलेला आशीष ह्या प्रसंगी म्हणाला की, \\"ह्या किताबामुळे मला एक नवीन संधी मिळाली आहे आणि माझ्या व्यापार आणि व्यापार व्यतिरिक्त वैश्विक विचारधारेला प्रवाह सुद्धा मिळाला आहे. मला खूप अभिमान वाटतो की मी आपल्या भारत देशाचे व सर्व अक्षम वर्गाचे प्रतिनिधित्व करतोय व मला काही दिग्गजांबरोबर आणि सर्वांसाठी प्रेरणा असणाऱ्या लोकांबरोबर काम करायला मिळतंय.\\"

३४ वर्षीय आशीष लहानपणापासूनच सर्व मर्यादांना आव्हान देत आला आहे.

बाहेरच्या मैदानी खेळांची आवड असलेल्या आशीषला ५ व्या वर्षापासूनच पोहणे, सायकल चालवणे, घोडदौड व नेमबाजी ह्या क्रीडा कला अवगत होत्या. क्रिकेट च्या मैदानावर तो तासंतास घालवायचा पण टेनिस खेळामधील तारा आपण व्हावे असेही त्याला वाटायचे.

आणि अचानक एक दिवस.........
परिपूर्ण वाटणारे त्याचे आयुष्य अचानक बदलत गेले ज्यावेळी त्याची दृष्टि दूषित व्हायला लागली, त्याच्या पाठ्यपुस्तकातील अक्षरे वाचणेही त्याला कठीण जाऊ लागले आणि लोकांमध्ये चालताचलता तो धडपडू लागला.

वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी \\"Retinitis pigmentosa\\" आजाराने त्याचे जीवन अंधकारमय करून टाकले. 
वयाच्या २२ व्या वर्षापर्यंत त्याला संपूर्ण अंधत्व आले. 
सुरुवातीला महाविद्यालयात १५ हुन अधिक मित्र असणारा आशीष ह्या घटनेनंतर निव्वळ ५ मित्र त्याच्या आयुष्यात उरले.

\\"मीच का?\\" असा हृदयस्पर्शी प्रश्न पडलेला आशीष मनातून तुटला होता, परंतु त्याच्या अध्यात्मिक गुरूंनी, श्री बालाजी तांबे यांनी त्याला ह्या भोवर्यातून बाहेर काढण्यास मदत केली.

\\"तुझ्या फक्त एका ज्ञानेंद्रियांची शक्ती तुझ्या बरोबर नाहीये, परंतु बाकीची इंद्रिये सक्षम आहेत. ह्या दुःखाच्या गर्तेत न बुडता, ह्या संकटावर मात कर, उभा राहा\\" असा गुरुमंत्रच दिला.

अर्थातच हा मंत्र अंतरात उतरवून तो कृतीत आणण्यासाठी आशीषला खूप काळ खूप कष्टपूर्वक धडपड करावी लागली. 
पण त्याने असामान्य मनोनिग्रहाने ते आत्मसात केले.

\\"येणाऱ्या अडचणींबरोबर जगायचं आणि त्यांच्यावर मात करायची, प्रत्येक अडचणीच निरसन करायचं आणि कधीच खचायचं नाही\\" ह्या मंत्रत्रयीवर तो आज खंबीरपणे उभा आहे.

आयुष्याच्या समोर उभ्या थकलेल्या प्रत्येक वळणाला हरवत आज त्याने यशाची कितीतरी शिखरे पार केली आहेत.

ING Vyasya मध्ये काम करताना त्याने Wharton मधून आपली पदवी पूर्ण केली. नंतर JP Morgan सारख्या नावाजलेल्या कंपनीत काम केले आणि नंतर त्याची घोडदौड \\"वॉल स्ट्रीट\\" वर पहिला अंध शेअर ट्रेडर म्हणून काम करण्यापर्यंत अविरत चालूच आहे.

आज तो खंबीरपणे म्हणतो, \\"लोक माझ्या अंधत्वाला आव्हान देऊ शकतात पण माझ्या बुद्धिमत्तेला नाही.\\" 
किती थक्क करणारी ही महत्वाकांक्षा आणि ते सुद्धा ३४ व्या वर्षी इतक्या लहान वयात!!

एका दशकाचा वैश्विक आर्थिक बाजाराचा (इंटरनॅशनल फायनान्शियल मार्केट) अनुभव असलेला आशीष सध्या BlueCrest Capital Management Ltd. ह्या एका अग्रगण्य कंपनीत \\"पोर्टफोलिओ मॅनेजर\\" म्हणून काम पाहतो. 
गोयल जेव्हा काम करत नसतो त्यावेळी त्याला वेगवेगळे खेळ बघायला आवडतात,

तो त्याचा इतर वेळ सार्वजनिक धोरणं अभ्यासण्यात व मानवी हक्कांची पायमल्ली व निराकरण अश्या प्रगल्भ विषयांवर काम करण्यात घालवतो.

आपल्यातील बऱ्याच जणांना त्याच्या वैवाहिक आयुष्याबद्दल उत्कंठा असेल व हे जाणून आनंद होईल की त्याच्या अंधत्वाकडे न बघता त्याच्यातला सामान्य पण सुंदर आणि हुषार गुणी माणूस, ज्याला आपल्यासारख्याच अनंत दैनंदिन अडचणी येतात, ह्या द्रुष्टिकोनातून एका सुस्वरूप मुलीशी त्याचा विवाह सुद्धा झालाय.

खरंच आज केवळ तंत्रज्ञानामुळे त्याला ब्रेल लिपी शिकायची गरज लागली नाही. काही अशी softwares आज उपलब्ध आहेत ज्यामुळे संगणकचं त्याच्यासाठी वाचनाचं काम करतो, त्याच्या mobile वरील डेटा देखील वाचला जातो.

आता तो लंडन मध्ये स्थायिक आहे, सार्वजनिक दळणवळण उत्कृष्ट दर्जाचे असल्यामुळे त्याला कोणावरही अवलंबून राहावे लागत नाही.

त्याला मुंबईत परत यायला आवडेल परंतु येथील सार्वजनिक दळणवळण व पदपथ अंध किंवा अपंग लोकांसाठी सोयीचे नसल्यामुळे त्याला थोडी वाट पाहावी लागेल, आपल्या लाडक्या मायभूमीत परतण्यासाठी.

त्याच्या अंधत्वाने त्याला जाकार्तातील टॅक्सी चालकांवर, फिलाडेल्फियातील दुकानदारांवर, दिल्ली, मुंबई, लंडन, न्यूयॉर्क सारख्या शहरांतील रस्त्यावरून चालणाऱ्या लोकांवर विश्वास ठेवायला शिकविले.

तो म्हणतो, \\"तुम्ही जेवढा लोकांवर विश्वास ठेवाल, तितके ते मदतीचा हात पुढे करायला तयार असतात.\\" 
आहाहा! काय हा सकारात्मक दृष्टिकोन!!

ज्यावेळेस त्याला अपंगांचे सक्षमीकरणाचा राष्ट्रीय पुरस्कार (National Award for the Empowerment of Persons with Disabilities) आणि Joseph P Wharton पुरस्कार मिळाला, त्यावेळी त्याने आवर्जून आपल्या कुटुंबीयांना, समाजातल्या काही अनोळखी व्यक्ती ज्यांनी त्याच्या क्षमतेवर विश्वास ठेवला, त्या सर्वांप्रती कृतज्ञेतेने आभार व्यक्त केले.

एवढ्यावरच न थांबता ह्या असामान्य मुलाने निव्वळ ३ वर्षांत $५०,००० जमा केले आहेत, ते स्वतःसाठी नाही, तर भारतातील शिक्षणापासून वंचित असलेल्या मुलांना शिक्षण मिळावे, वैश्विक स्तरावर शांतता नांदावी व वैश्विक स्तरावर अपंगत्व ह्या विषयावर सखोल संशोधन व्हावं ह्या उदात्त हेतूंसाठी!

WEF संस्थेच्या कार्यप्रणाली नुसार मागील व आत्ताचे YGL (Young Global Leader) पुढे जाऊन सरकारी उच्च पदांवर व Fortune ५०० कंपन्यांमधून अधिकारी पदांवर नियुक्त केले जातात, त्यांना नोबेल पारितोषिक व अकादमी पुरस्कारांनी सन्मानित केले जाते, पुढे जाऊन ते UN Goodwill Ambassadors आणि Social Entrepreneurs (सामाजिक उद्योजक) म्हणूनही नियुक्त होतात.

\\"आयुष्यातील प्रत्येक क्षण हा जगण्यासाठीच असतो\\" असा सकारात्मक दृष्टिकोन ठेवणारा आशीष पुढील कुठल्या संधीचं सोनं करतो व कुठलं यश-शिखर सर करतो हे आपण उत्साहाने बघत राहू व त्याच्या ह्या उत्तुंग भरारीसाठी त्याला खूप खूप सदिच्छा देऊ.

आशिष गोयल, तुझ्यासारखं भारतीय रत्न विश्वात सदैव प्रकाशमान होत राहो आणि भारतीयन्स’ची कीर्ती दिगंत करत जावो हीच ‘टीम भारतीयन्स’ची शुभेच्छा!!

#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his ‘Mission 2020’ .

 

 

मिलिंद वेर्लेकर

टीम भारतीयन्स

बातमी सौजन्य