Bhartiyans

Menu

प्रोजेक्ट तेजस - १०,००० किमी चा ऑटो रिक्षातून प्रवास करून स्वच्छ सौर ऊर्जेचा जगभर प्रसार

Date : 10 Nov 2016

Total View : 239

चार महिन्यांच्या कालावधीत सौर ऊर्जेचं महत्व लोकांसमोर मांडण्यासाठी अभियंता असलेला भारतीय तरुण व त्याचे दोन साथीदार सौर उर्जेवर चालणाऱ्या रिक्षाने जगभर प्रवास करणार.


सारांश

चार महिन्यांच्या कालावधीत सौर ऊर्जेचं महत्व लोकांसमोर मांडण्यासाठी अभियंता असलेला भारतीय तरुण व त्याचे दोन साथीदार सौर उर्जेवर चालणाऱ्या रिक्षाने जगभर प्रवास करणार.सविस्तर बातमी

\\"१०,००० किमी चा ऑटो रिक्षातून प्रवास करून स्वच्छ सौर ऊर्जेचा प्रसार करत असलेला एक ध्येयवेडा भारतीय\\"

पर्यायी व स्वच्छ ऊर्जा स्रोताचा प्रसार करण्यासाठी, एक भारतीय साहसी तरुण १०,००० किमीचा भारत ते युके दरम्यानचा जमिनीवरून प्रवास एका टुक टुक म्हणजेच रिक्षेतून करत आहे.

\\"प्रोजेक्ट तेजस\\" - तेजस हा शब्द जो मूळचा संस्कृत शब्द आहे आणि ज्याचा अर्थ तेज किंवा अलौकिक बुद्धिमत्ता असाही होतो.

हा उपक्रम भारतीय अभियंता नविन राबेली ह्याचा अभिनव विचार आहे.

तो आणि त्याचा माहितीपट निर्माता असलेला मित्र आणि पर्यायी रिक्षा चालक राहुल कोपका ह्या तिघांचा संघ मिळून भारत ते इराण, तुर्की, बल्गेरिया, सर्बिया, हंगेरी, ऑस्ट्रिया जर्मनी, फ्रान्स आणि ग्रेट ब्रिटन असा प्रवास करणार आहेत.

ह्या आधीही राबेली यांनी एक अनोखा सामाजिक उपक्रम राबवला होता. ह्या पूर्वी १८ महिन्यांत, ७ देशांमध्ये म्हणजेच न्यूझीलंड ते आग्नेय आशियात (Southeast Asia), त्यांनी स्थानिक मागासवर्गीय मुलांना क्रीडा, शास्त्र आणि गणित शिकविताना भारतीय संस्कृतीची ओळखही करून दिली.

इराणमधील अब्बास ह्या बंदरात जाण्याआधी दुबई मध्ये ते ज्यावेळी थांबलेले होते त्यावेळी त्यांनी बोलताना सांगितले कि ह्या सर्व प्रवासी योजनेसाठीची प्रेरणा त्यांना आपल्या भारतीय सर्वव्यापी टुक टुक म्हणजेच रिक्षेतून मिळाली.

\\'खलीज टाइम्स\\' ह्या वृत्तपत्राशी संवाद साधताना ते म्हणाले कि, \\"मी जेव्हा भारतात होतो, त्यावेळी बघितले कि तिथे चालणाऱ्या सर्वच रिक्षा खूप प्रमाणात प्रदूषण करतात आणि त्याबाबत काही सुधारणा जास्त प्रमाणात होताना दिसत नाहीत. त्यामुळेच मला ही कल्पना सुचली.\\"

अधिक माहिती देताना ते म्हणाले, \\"मी ही टुक टुक तीन वर्षांपूर्वी तयार करायला घेतली आणि एवढ्या मेहनतीनंतर आज शेवटी मी हा दिवस बघू शकलो.\\"

टुक टुक बनविण्याची योजनाच चार टप्प्यांची होती. पहिल्या टप्प्यात त्याच्या संघाने (ज्यात काही इंजिनिअर्स सुद्धा होते) सौर ऊर्जेचा चालू कल (करंट ट्रेंड) अभ्यासला, ट्रिपचा आराखडा मांडला आणि सर्व गरजेच्या सामानाची जुळवाजुळव करायला सुरुवात केली. 
दुसऱ्या टप्प्यात मोटर आणि बॅटरी बसवली आणि विद्युतवाहक (पॉवर केबल) जोडली.

तिसऱ्या टप्प्यात संगणक बोर्डावर बसविण्यात आला आणि सौर ऊर्जा पॅनेल टुक टुक वर बसवण्यात आले आणि सर्वात शेवटी या संपूर्ण गाडीचं परीक्षण करण्यात आलं आणि सुधारणा करण्यासाठीचा सगळंच डेटा बारकाईने तपासण्यात आला.

राबेलीच्या अनुसार, ह्या सर्व प्रवासाचा खर्च $३८,७९० इतका आला आणि ह्यात नियोजित माहितीपट, प्रवास खर्च, वाहन शास्त्र (logistics), परवाने, व्हिसा आणि विपणन व्यवस्था (मार्केटिंग) समाविष्ट आहेत.

राबेलीचं हे आगळंवेगळं वाहन - एक अत्यंत सुधारित Piaggio Ape (commercial vehicle) आहे - जे प्रति चार्ज वर १०० किमी धावू शकतं आणि सहजरीत्या वीजवाहक तारांनी व सौर ऊर्जा पॅनल’ने त्याचं चार्जिंगही करता येतं.

कोची पासून सुरुवात करून राबेली आणि कोपका आत्तापर्यंत बंगलोर, पुणे आणि मुंबईतून प्रवास करून पुढे निघाले आहेत.

ते म्हणाले, \\"मला खूप वाईट वाटलं हे बघून की भारतातील कित्येक गावांमध्ये आजही वीज नाहीये आणि ह्या गोष्टीने माझी जवाबदारी वाढल्याची जाणीव मला झाली. आपल्या कल्पनेत सर्व गोष्टी विजेवरच चालतात पण ह्या लोकांनी वर्षानुवर्षे वीजच बघितलेली नाहीये.\\"

इराण - तुर्की सीमेवर पोहोचण्यासाठी बंदर अब्बास वरून राबेली आपली टुक टुक काही इराणी शहरांमधून म्हणजेच शिराझ, इस्फाहान, आणि तेहरान मधून चालवत नेतील.

ते म्हणाले, \\"अवघ्या ४० दिवसांत मी इराण संपूर्णपणे पालथा घालण्याची अपेक्षा करतोय.\\" ह्या संपूर्ण प्रवासाला राबेलीच्या मते ४ महिने लागतील, त्या कालावधीमध्ये त्यांना काही ठिकाणी मुक्काम करून सौर ऊर्जेचं महत्व लोकांसमोर मांडावं लागेल आणि काही स्वयंसेवी संस्थांना भेट द्यावी लागेल.

त्यांनी अधिक माहिती देताना सांगितलं, \\"हा सर्व प्रवास माझ्यासाठी खूप प्रेरणादायी असणार आहे, कारण मी शाळा आणि महाविद्यालयांमधूनही ह्याचा प्रसार करणार आहे. मी एक साधासुद्धा माणूस आहे पण लोकांमध्ये सौर ऊर्जेबद्दल जागरूकता निर्माण करायची हेच माझे उद्दिष्ट आहे. सर्वात महत्वाचा आपला आजचा तरुण वर्ग आहे आणि त्यांनी ह्या उपक्रमापासून प्रेरणा घ्यावी व ह्या क्षेत्रात संशोधन करून आपापल्या राष्ट्राला विद्युत-स्वावलंबी बनवावं हिच माझी इच्छा आहे.\\"

\\"तू बुद्धी दे, तू तेज दे, मम चेतना, विश्वास दे\\", ह्या ओळींप्रमाणे ह्या लेखातून आणि राबेली ह्या सौर पुत्राच्या संपूर्ण उपक्रमातून एक जरी तरुण संघ तयार झाला तरी आपल्या भारतातील कितीतरी खेड्यापाड्यांना वीज/ऊर्जा मिळेल आणि खऱ्या अर्थाने आपण सुजलाम सुफलाम होण्याच्या मार्गावर लागू!!

#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his ‘Mission 2020’ .

 

 

मिलिंद वेर्लेकर

टीम भारतीयन्स

बातमी सौजन्य