Bhartiyans

Menu

भारतीय रेल्वे आता प्रवाशांना 10 लाखापर्यंत इन्शुरन्स देणार आहे. १ रुपयात.

Date : 10 Nov 2016

Total View : 418

१ सप्टेंबर पासून रेल्वेने प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांसाठी काही खाजगी इन्शुरन्स प्रोव्हायडर्सच्या सहयोगाने भारतीय रेल्वे खात्याने ही सुविधा सुरु केलेली आहे.


सारांश

भारतीय रेल्वे आता देणार प्रवाशांना १० लाखापर्यंतचा इन्शुरन्स, तोही निव्वळ १ रुपयात.१ सप्टेंबर पासून रेल्वेने प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांसाठी ICICI Lombard, Royal Sundaram आणि Shriram General या खाजगी इन्शुरन्स प्रोव्हायडर्सच्या सहयोगाने भारतीय रेल्वे खात्याने ही सुविधा सुरु केलेली आहे.सविस्तर बातमी

भारतीय रेल्वे आता देणार प्रवाशांना १० लाखापर्यंतचा इन्शुरन्स, 
तो ही निव्वळ १ रुपयात
#Bharatiyans

१ सप्टेंबर पासून रेल्वेने प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांसाठी ICICI Lombard, Royal Sundaram आणि Shriram General या खाजगी इन्शुरन्स प्रोव्हायडर्सच्या सहयोगाने भारतीय रेल्वे खात्याने ही सुविधा सुरु केलेली आहे.

भारतीय रेल्वेच्या लोकल ट्रेन्स सोडून इतर सर्व ट्रेन्स मधून प्रवास करणाऱ्या प्रवासी आणि त्यांच्या नातलगांना मृत्यू अथवा कायमस्वरूपी पूर्ण अपंगत्वासाठी १० लाख रुपये, कायमस्वरूपी आंशिक अपंगत्वासाठी ७.५ लाख रुपये , हॉस्पिटलाय्झेशन साठी २ लाख रुपयांपर्यंत मदत आणि मृत्यू झाल्यास शव एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणे यासाठी रुपये १०,००० मात्र एव्हढी सोय केलेली आहे.

भारतीय रेल्वेला प्रवास करताना झालेले अपघात, अथवा इतर कुठलाही अवांछित प्रकार, दहशतवादी हल्ला, लुटमार, दंगल , गोळीबार अथवा जाळपोळ किंवा ट्रेन रद्द होणे, ट्रेन चा मार्ग बदलणे या बाबतीत ही इन्शुरन्सची सुविधा मिळणार आहे.

अश्या प्रकारची घटना घडल्याची नोंद इन्शुरन्स कंपनी कडे चार महिन्यांच्या आत करावयाची आहे आणि या नोंदीवर त्वरित प्रोसेस करून इन्शुरन्स कंपनीने १५ दिवसांच्या आत संबंधित व्यक्तीच्या नावाने चेक काढावयाचा आहे.

** Team Bharatiyans**

#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his ‘Mission 2020’ .

 

 

मिलिंद वेर्लेकर

टीम भारतीयन्स