Bhartiyans

Menu

रियो ऑलिम्पिकच्या जिम्नॅस्टिक स्पर्धेत भारतासाठी ऐतिहासिक कामगिरी नोंदवून आल्यावर दीपा करमाकरने विश्रांती घेतलीच नाही!

Date : 10 Nov 2016

Total View : 103

ऑलिम्पिक वरून परतल्याच्या चौथ्याच दिवशी, सर्व सत्कार समारंभ आटोपल्यावर, परीक्षेसाठी महाविद्यालयात पोहोचलेल्या दीपाची शिक्षणाप्रती असलेली निष्ठा पाहून त्रिपुरा विद्यापीठाचे अधिकारी आणि शिक्षक अक्षरशः आ


सारांश

ऑलिम्पिक वरून परत आल्या आल्या आगरतळा इथे दीपाचे भव्य शासकीय स्वागत करण्यात आले. वर्तमानपत्रांचे रकानेच्या रकाने भरले आणि अनेक सत्कार समारंभही झाले. पण दीपा एका स्थितप्रज्ञ विद्यार्थिनी सारखी या सगळ्यातून मानसिकरीत्या बाहेर पडून, तिच्या मूळ विद्यार्थिनीच्या भूमिकेत शिरली आहे. डिस्टन्स एज्युकेशन कोर्ससविस्तर बातमी

 

तुम्हाला वाटलं असेल ना कदाचित की रियो ऑलिम्पिकच्या जिम्नॅस्टिक स्पर्धेत भारतासाठी ऐतिहासिक कामगिरी नोंदवून, शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सुद्धा थकवणाऱ्या ऑलिम्पिक वरून परत आल्या आल्या, दीपा करमाकरने मस्त विश्रांती घेतली असेल आणि आता ती कुठल्यातरी थंड हवेच्या ठिकाणी हवापालट करण्यास निघून गेली असेल?
अजिबात नाही...
#Bharatiyans

 

परतल्या परतल्या दीपाने लगेचच दिली MA पॉलिटिक्स ची परीक्षा....

 

तमाम संघर्ष, शारीरिक कमकुवतपणा आणि आर्थिक तंगीला समर्थपणे यशस्वी तोंड देऊन आज दीपा करमाकरने भारताच्या दृष्टीने इतिहास निर्माण केला आहे.

 

ऑलिम्पिकच्या जिम्नॅस्टिक स्पर्धेत फायनल मध्ये पोहोचलेली पहिलीच भारतीय महिला अशी नोंद आता दीपाची भारतीय खेळ जगतात निर्माण झाली आहे.

 

ऑलिम्पिक वरून परत आल्या आल्या आगरतळा इथे दीपाचे भव्य शासकीय स्वागत करण्यात आले. वर्तमानपत्रांचे रकानेच्या रकाने आणि राज्यात अनेको सत्कार समारंभ झाल्या झाल्या आता दीपा एका स्थितप्रज्ञ विद्यार्थिनी सारखी या सगळ्यातून मानसिकरीत्या बाहेर पडली आहे आणि तिच्या मूळ असलेल्या विद्यार्थ्याच्या भूमिकेत शिरली आहे.

 

ऑलिम्पिक वरून परतल्याच्या चौथ्याच दिवशी, सर्व सत्कार समारंभ आटोपल्यावर, परीक्षेसाठी महाविद्यालयात पोहोचलेल्या दीपाची शिक्षणाप्रती असलेली निष्ठा पाहून त्रिपुरा विद्यापीठाचे अधिकारी आणि शिक्षक अक्षरशः आश्चर्यचकीत आणि प्रभावित सुद्धा झाले.

 

NDTVशी बोलताना डिस्टन्स एज्युकेशन कोर्सचे, त्रिपुरा विद्यापीठाचे डायरेक्टर म्हणाले, “ देशातल्या अन्य सर्व युवा वर्गासाठी हे एक जबरदस्त असा आदर्श निर्माण करणारे उदाहरण आहे. 
ऑलिम्पिक स्पर्धेत देशाला अत्युच्च स्थानावर नेणारी आणि देशासाठी एक इतिहास निर्माण करणारी तरुणी खेळ आणि त्याचा सराव सुरु असतानाच बरोबरीने अभ्यास सुद्धा तितक्याच तन्मयतेने करते आणि तिच्या क्रीडा क्षेत्रातल्या प्राविण्यासोबतच उच्च शिक्षणामध्ये सुद्धा स्वतःचे स्थान निर्माण करते हे शब्दशः युवकांसाठी एक असामान्य उदहरण आहे. 
खरच, दीपा आजकालच्या युवकांसमोरील एक आदर्श युथ आयकॉन आहे.”

 

दीपा सोबत या परीक्षेसाठी बसलेली दीपाची एक मैत्रीण सांगते ,” साधारणपणे आपल्या देशात युवकांना क्रीडा किंवा शिक्षण क्षेत्र असा ऑप्शन दिला जातो.

 

दीपा, आज तू दाखवून दिलं आहेस की या दोन्ही गोष्टी एकाच वेळी करणे आणि कष्टपूर्वक परिश्रम करून त्या दोहोंत ही उत्तुंग यश संपादन करणे सहज शक्य आहे. त्रिपुराच्या आम्हा विद्यार्थ्यांना दीपाचा विलक्षण अभिमान वाटतो आहे.”

 

आजकालच्या देशभरातल्या युवा वर्गाने क्रीडा आणि अभ्यास या दोहोंकडे कश्या परफेक्ट पद्धतीने समतोल साधला पाहिजे याचे दीपा हे उत्तम उदहरण आहे.

 

दीपा करमाकर – तुझ्या देदीप्यमान कर्तुत्वाचा आणि तू तुझ्या वागणुकीने भारताच्या विद्यार्थ्यांच्या समोर ठेवलेल्या उत्तुंग अश्या मानदंडाचा आम्हां सर्वच भारतीयन्स’ना अभिमान वाटतो आहे.

 

तुझ्या अफाट जिद्दीला आणि तुझ्या सारखे तेजस्वी रत्न घडवणाऱ्या तुझ्या गुरूंना आणि तुझ्यामागे हिमालयासारखे भक्कमपणे उभ्या राहणाऱ्या तुझ्या आई-वडलांना ‘टीम भारतीयन्स’चा मानाचा मुजरा....

#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his ‘Mission 2020’ .

 

 

मिलिंद वेर्लेकर

टीम भारतीयन्स

बातमी सौजन्य