Bhartiyans

Menu

देशाच्या सीमेवर पहारा देणाऱ्या भारतीय जवानांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी DRDO चा एक क्रांतिकारी शोध

Date : 10 Nov 2016

Total View : 134

डाळींबाच्या सालापासून एका विशिष्ट पद्धतीने एक अर्क तयार करण्यात आला जो या मांसाहारी अन्नपदार्थांमध्ये एका विशिष्ट प्रमाणात टोचल्यावर या मांसाहारी अन्नपदार्थांचे टिकण्याचे प्रमाण लक्षणीयपणे वाढवण्याची


सारांश

हे मांसाहारी अन्नपदार्थ जम्मूतल्या आर्मी बेसवरून या दूरदूरच्या बर्फिल्या मृत्यूंच्या सापळ्यात उभ्या असणाऱ्या सैनिकांसाठी नेले जातात. एकदा कापलेले मांसाहारी अन्नपदार्थ फ्रीज शिवाय जास्तीतजास्त ६ तास आणि फ्रीज मध्ये २ दिवस टिकू शकतात. यानंतर मात्र हे पदार्थ या वातावरणात खराब होतात आणि चुकून जरी हे पदासविस्तर बातमी

 

मायनस ५० डिग्रीच्या बर्फाळलेल्या सीमांवर अहोरात्र पहारा देणाऱ्या भारतीय जवानांसाठीअत्यावश्यक असे मांसाहारी पदार्थ आठवडाभर ताजे ठेवणारी प्रक्रिया निर्माण केली डीआरडीओ\\'ने...
#Bharatiyans

 

२०००० ते २२००० फुटांवरच्या क्षणार्धात हाडं गोठवणाऱ्या थंडीत, १५-१५ किलोचे थंडीपासून संरक्षणाचे कपडे अंगावर घालून दिवसरात्र बंदुका घेऊन डोळ्यांत तेल घालून देशाच्या अशक्य अशा सीमांवर पहारा देत उभं राहायचं आणि आवश्यकता पडेल तेव्हा घुसखोर दहशतवाद्यासोबत युद्ध ही करायचं ही अक्षरशः जिवावर बेतू शकणारी कामगिरी असते.

 

या अश्या ठिकाणी या जांबाज सैनिकांचे खायचे अन्न हे सुद्धा खूप शास्त्रीय रिसर्च करून तयार केलेलं असते आणि मांसाहारी अन्नपदार्थ हे या सैनिकांच्या अन्नाचा या पराकोटीच्या ठिकाणी तग धरून ठेवण्याचा एक महत्वाचा घटक असतो.

 

हे मांसाहारी अन्नपदार्थ जम्मूतल्या आर्मी बेसवरून या दूरदूरच्या बर्फिल्या मृत्यूंच्या सापळ्यात उभ्या असणाऱ्या सैनिकांसाठी नेले जातात.

 

एकदा कापलेले मांसाहारी अन्नपदार्थ फ्रीज शिवाय जास्तीतजास्त ६ तास आणि फ्रीज मध्ये २ दिवस टिकू शकतात. यानंतर मात्र हे पदार्थ या वातावरणात खराब होतात आणि चुकून जरी हे पदार्थ खाल्ले गेले तरी सैनिकांच्या जीवावर बेतू शकते.

 

जम्मुवरून निघालेले मांसाहारी अन्नपदार्थ सियाचीन आणि कारगिल मधल्या दूरवर पोचेपर्यंत खूप वेळ लागतो आणि या पदार्थांचा दर्जा नंतर धोकादायक होत जातो.

 

मैसूर येथील DRDO (Defence Research & Development Organisation) प्रयोगशाळेने गेल्या अनेक वर्षांच्या खडतर परीक्षणातून यावर अत्यंत साधा पण अतोनात आवश्यक असा उपाय शोधला.

 

डाळींबाच्या सालापासून एका विशिष्ट पद्धतीने एक अर्क तयार करण्यात आला जो या मांसाहारी अन्नपदार्थांमध्ये एका विशिष्ट प्रमाणात टोचल्यावर या मांसाहारी अन्नपदार्थांचे टिकण्याचे प्रमाण लक्षणीयपणे वाढवण्याची एक प्रक्रिया DRDOने विकसीत केली आहे.

 

आताच्या इंडस्ट्री मध्ये हे मांसाहारी पदार्थ टिकवण्यासाठी कृत्रिम केमिकल्स चा वापर केला जातो ज्यामुळे पदार्थ निसत्व तर होतातच पण तोक्सिखी होतात असे DRDOचे म्हणणे आहे.

 

या नवीन यशस्वी प्रक्रियेमुळे सैनिकांपर्यंत पोचवले जाणारे मांसाहारी अन्नपदार्थ आता खूप जास्त काळ म्हणजेच शब्दशः आठवडाभर आणि ते ही फ्रीज शिवाय सहजपणे टिकवता येऊ शकतील आणि या मांसाहारी अन्नपदार्थांमुळे थंडी, वारा आणि पाउस या नैसर्गिक शत्रुंचा सामना करण्याचे त्यांचे शारीरिक बळसुद्धा खातीच वाढेल.

 

ही प्रक्रिया DRDOने इतकी यशस्वीपणे अमलात आणली आहे कि आता DRDO हेच तंत्रज्ञान सर्वसामान्य लोकांसाठी खुले करण्याच्या विचारात आहे.

 

खडतर आणि जीवघेण्या अवस्थेत देशाच्या सीमेवर अभेद्य पहारा देणाऱ्या भारतीय जवानांच्या आवश्यक त्या सर्व गरजा पूर्ण करणाऱ्या DRDOच्या भारतीयन्स शास्त्रज्ञांचा आम्हाला अभिमान आहे.....

#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his ‘Mission 2020’ .

 

 

मिलिंद वेर्लेकर

टीम भारतीयन्स

बातमी सौजन्य