Bhartiyans

Menu

चितोडच्या राणी पद्मिनीचा जोहर - २६ ऑगस्ट १३०३ -

Date : 10 Nov 2016

Total View : 399

चितोडची राणी पद्मिनीनेअल्लाउद्दिन खिल्जीच्या वासानाधीन अत्याचारापासून स्वतःचे आणि अन्य राजपूत स्त्रियांच्या शीलांचे रक्षण करण्यासाठी १६,००० राजपूत स्त्रियांसोबत चितेत उड्या घेतली


सारांश

चितोडच्या राणी पद्मिनीचा जोहर - २६ ऑगस्ट १३०३ - आजपासून बरोब्बर ७१३ वर्षांपूर्वीचा भारतीय इतिहासातला हा एक तेजस्वी प्रसंग.याच दिवशी राणी पद्मिनीने अल्लाउद्दिन खिल्जीच्या पाशवी वासानाधीन अत्याचारापासून स्वतःचे आणि अन्य राजपूत स्त्रियांच्या शीलांचे रक्षण करण्यासाठी १६,००० राजपूत स्त्रियांसोबत चितोडच्यसविस्तर बातमी

चितोडच्या राणी पद्मिनीचा जोहर - २६ ऑगस्ट १३०३ -
आजपासून बरोब्बर ७१३ वर्षांपूर्वीचा भारतीय इतिहासातला हा एक तेजस्वी प्रसंग (नक्की वाचा...कृपया)
#Bharatiyans

जोहर’च्या कथांनी भरलेली आणि भारलेली पाने भारतीय इतिहासाची काळी तरीही विलक्षण स्फूर्तीदायक सोनेरी धरोहर आहेत.

असे अनेकानेक क्षण भारतीय इतिहासाने अनुभवले आहेत जेव्हा हिंदू सौन्दर्यवतींनी मुस्लिमांच्या टोळधाडीपासून आपल्या अब्रूच्या रक्षणासाठी \\'जय हर-जय हर\\' चा उद्घोष करत करत हजारोंच्या संख्येने निधड्या छातीने आपल्या कच्च्या-बच्च्यांच्या सोबत सामुहिक अग्नी-प्रवेश केला आहे.

हाच उद्घोष पुढे जाऊन “जोहर” झाला.

जोहर च्या तेजस्वी गाथांमधील सर्वात मोठा आणि खूप गाजला तो जोहर म्हणजे चितोड’च्या मूर्तिमंत शिल्प असलेल्या राणी पद्मिनी’चा जोहर.

हा जोहर झाला २६ ऑगस्ट १३०३ रोजी म्हणजेच आजपासून बरोब्बर ७१३ वर्षांपूर्वी...

आजच्याच दिवशी राणी पद्मिनीने क्रूर अल्लाउद्दिन खिल्जीच्या बिभित्स पाशवी वासानाधीन अत्याचारापासून स्वतःचे आणि अन्य राजपूत स्त्रियांच्या शीलांचे रक्षण करण्यासाठी १६,००० राजपूत स्त्रियांसोबत चितोडच्या किल्ल्यावर धडधडून पेटवलेल्या चितेत उड्या घेतल्या.

पद्मिनीचे मूळ नाव पद्मावती होते.
तिच्या जगभर विख्यात असलेल्या विलक्षण दैवी सौंदर्याची ख्याती क्रूर मुस्लीम बादशहा अल्लाउद्दिन खिल्जीने सुद्धा ऐकली होती.

काहीही करून या हिंदू तरुण राणी पद्मिनी’ला मिळवायचेच आणि आपल्या जनानखान्यात आणायचेच हा खिल्जीचा दुष्ट मुघली मनसुबा होता.
यासाठी त्याने चितोडच्या राजाला आणि पद्मिनीच्या नवऱ्याला धमकीचे पत्र पाठवले.

पण स्वाभिमानी राजा रतनसिंह’ने साहजिकच त्या पत्राचे फाडून तुकडे केले.
आता खिल्जीने मुस्लीम मानसिकतेनुसार दगाबाजी करण्याचे ठरवले.

आपल्या ताकतीच्या जोरावर त्याने रतनसिंहाला \\'किमान एकदा तरी राणी पद्मिनीला क्षणभर पाहण्याची\\' अट मान्य करून घेतली.

आपल्या सैन्याचा रक्तपात टाळण्यासाठी राजपूत राजा रतनसिंहाने ही गोष्ट मान्य केली.

अल्लाउद्दिन खिल्जी चीतोड\\'वर आला.

विशेष व्यवस्था करून चितोड वर राणी पद्मिनीचा चेहेरा तिच्याच महालात आरशांची व्यवस्था करून खिल्जीला आरश्यात दुरूनच दाखवण्यात आला.

हिंदू प्रथेनुसार किल्ल्यावर आलेल्या अल्लाउद्दिन खिल्जीला किल्ल्याच्या द्वारापर्यंत सोडण्यास आलेल्या राजा रतनसिंह यास अल्लाउद्दिन खिल्जीने दग्या-फटक्याने बंदी केले आणि तो या राजपूत राजाला किल्ल्याखाली वसवलेल्या आपल्या शिबिरामध्ये फरफटत घेवून गेला.

आता दगाबाज खिल्जी कडून ही अट ठेवली गेली की जर राणी पद्मिनी अल्लाउद्दिन खिल्जी कडे आली तर आणि तरच राजा रतनसिंह याला सोडण्यात येईल.

ही बातमी पोचताच चितोड किल्ल्यावर हाहाकार मजला.

पण जिगरबाज तेजस्वी हिंदू क्षत्रिय राणी पद्मिनीने हार मानली नाही.

काट्याने काटा काढण्याची बेलाग धाडसी योजना तिने त्वरीत तयार केली.

अल्लाउद्दिन खिल्जीकडे संदेश पाठवण्यात आला की पद्मिनी राणी यायला तयार आहे पण ती राणी असल्यामुळे ती एकटी येणार नाही तर तिच्यासोबत पालख्यांमध्ये ८०० सख्या आणि सेवक ही येतील.

हे ऐकून क्रूर अत्याचारी मुघल बादशहा अल्लाउद्दिन खिल्जी खुश झाला. 
त्याला आता अती सौंदर्यवती, तरुण राणी पद्मिनी सोबत ८०० हिंदू युवती सुद्धा आयत्याच मिळणार होत्या.

पण तिकडे चितोड\\'वर पालख्यांमध्ये पद्मिनी आणि तिच्या सख्यांऐवजी सशस्त्र हिंदू राजपूत लढवय्ये पुरुष स्त्रियांच्या वेशात बसवले गेले.
प्रत्येक पालखी ज्या चार भोयांनी उचलली होती ते सुद्धा धिप्पाड राजपूत सैनिक होते.

ठरल्याप्रमाणे चितोड वरून एक एक पालख्या खाली उतरू लागल्या.

पहिली पालखी अल्लाउद्दिन खिल्जी’च्या शिबिरात पोचल्या पोचल्या बुरख्यात लपलेली पद्मिनी म्हणून एक सैनिकच दाखवून रतनसिंह याची सुटका करण्यात आली आणि त्याच पालखीत त्याला बसवून त्याला किल्ल्यावर पळवत माघारी पाठवण्यात आले.

हे झाल्या झाल्या, क्षणार्धात पालख्यांमध्ये लपून बसलेले शूर राजपूत लढवय्ये आपापली पराजलेली शस्त्रे काढून क्रूर आणि अत्याचारी खिल्जीच्या सैन्यावर तुटून पडले. काही क्षणांतच खिल्जीच्या शिबिरात हजारो प्रेते पडली.

यामुळे क्रुद्ध झालेल्या क्रूर अल्लाउद्दिन खिल्जीने त्याच्या तिथे असलेल्या उरलेल्या हजारोंच्या सैन्यासकट चितोड वर उलट हल्ला केला.

या भीषण संग्रामात राव रतनसिंह आणि त्याचे हजारो सैनिक कापले गेले.

जेव्हा राणी पद्मिनीने पहिले की आता हिंदूंची जिंकण्याची काहीच आशा दिसत नाही तेव्हा तिने ‘जोहर’ करण्याचा निर्णय घेतला.

बाहेर किल्ल्यात घुसण्यासाठी रागाने पेटलेल्या खिल्जीला थांबवण्यासाठी भीषण युद्ध सुरूच होते.

राणी पद्मिनी आणि किल्ल्यावर असलेल्या जवळपास १६,००० हिंदू क्षत्रिय राजपूत स्त्रियांनी परंपरेनुसार संपूर्ण साजश्रुन्गार केला.

दिवसाढवळ्या हजारो मोठ्या चिता राणी पद्मिनीच्या महालासमोर धगधगवल्या गेल्या.

\\'जय हर-जय हर\\' चा उद्घोष करत सर्वप्रथम राणी पद्मिनीने चितेत उडी घेतली.
आणि तिच्या मागोमाग हजारो क्षत्रिय हिंदू वीरांगनांनी परमेश्वराचे स्मरण करत चितेत प्रवेश केला.

जेव्हा युद्धात विजय मिळवत राणी पद्मिनी ला शोधत शोधत अल्लाउद्दिन खिल्जी किल्ल्यात घुसला तेव्हा जळक्या रक्तमांसाच्या धुराने आणि वासाने त्याचे स्वागत केले.

क्रूर मुस्लीम बादशहा अल्लाउद्दिन खिल्जीच्या बुभूक्षित वासनेला बळी पडू नये म्हणून शील रक्षणासाठी हिंदू क्षत्रिय वीरांगना राणी पद्मिनी आजच्याच दिवशी , २६ ऑगस्ट १३०३, ठीक ७१३ वर्षांपूर्वी तेजस्वीपणे मृत्यूला सामोरी गेली.

धन्य ती महा-तेजस्वी राणी पद्मिनी आणि धन्य तिच्या त्या तेजस्वी सख्या.....
**टीम भारतीयन्स**

#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his ‘Mission 2020’ .

 

मिलिंद वेर्लेकर

टीम भारतीयन्स

बातमी सौजन्य

--