Bhartiyans

Menu

श्रीहरीकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरने डेव्हलप केलेल्या स्क्रॅमजेट इंजिनाचे इस्रोने केले यशस्वी परीक्षण.

Date : 10 Nov 2016

Total View : 120

सतीश धवन स्पेस सेंटर येथे स्क्रॅमजेट इंजिनाचे परीक्षण करून,वातावरणातला ऑक्सिजन इंधन म्हणून वापरून ISRO च्या अवकाश मोहिमान्चा खर्च कमी करण्यात यश मिळवलं


सारांश

अवकाश तंत्रज्ञांनामध्ये अमेरिकन नासा'च्या श्रेष्ठत्वाला दिले भारताच्या ISROने जागतिक यशस्वी आव्हान.श्रीहरीकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरने डेव्हलप केलेल्या स्क्रॅमजेट इंजिनाचे इस्रो’ने केले पाच मिनिटांचे पूर्ण यशस्वी परीक्षण.अब्दुल कलामांच्या स्वप्नातली ‘सुपर-पॉवर’ होण्यासाठी भारतीयन्स च्या ISROलासविस्तर बातमी

अवकाश तंत्रज्ञांनामध्ये अमेरिकन नासा\\'च्या श्रेष्ठत्वाला दिले भारताच्या ISROने जागतिक यशस्वी आव्हान
#Bharatiyans

आज, रविवारी सकाळी श्रीहरीकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरने डेव्हलप केलेल्या स्क्रॅमजेट इंजिनाचे इस्रो’ने केले पाच मिनिटांचे पूर्ण यशस्वी परीक्षण.

या तंत्रज्ञानामध्ये हायपर सॉनीक स्पीड घेण्यासाठी वातावरणातला ऑक्सिजन वापरून इंधन हे इंजिनात जाळले जाते.

या तंत्रज्ञानाच्या सिद्धतेमुळे, अग्निबाणाच्या सहाय्याने उपग्रह अवकाशात नेताना, इंजिनात इंधन जाळण्यासाठी, सर्वच्या सर्व ऑक्सिजन पृथ्वीवरून घेऊन जावा लागत नाही.

यामुळे प्रक्षेपण होत असताना अग्निबाण प्रक्षेपकाचे वजन तब्बल अर्ध्या पेक्षाही जास्त कमी होते.

मूलतःच हे वजन खूपच कमी झाल्याने अग्निबाण अवकाशात घेऊन जाताना आता यामुळे अजून जास्त वजनाचे उपग्रह सोबत नेता येतील आणि सोबत मुळातच खूप विश्वासार्ह्य आणि यामुळेच स्वस्त असलेल्या ISROच्या अवकाश मोहिमा आता अजूनच कमी खर्चात केल्या जाऊ शकतील.

आज, रविवारी सकाळी इस्रोने स्क्रॅमजेट इंजिन तंत्रज्ञानाचे पाच मिनिटांचे सफल परीक्षण केले.

हे इंजिन आणि हे तंत्रज्ञान आता ISRO कडून भारताच्या भविष्यातल्या Reusable Launch Vehicle (RLV) साठी अवकाशातल्या हायपर सॉनीक स्पीड घेण्यावेळी वापरले जाईल.

सतीश धवन स्पेस सेंटर (SDSC) येथे स्क्रॅमजेट इंजिनाचे परीक्षण करताना हे महत्वाचे तांत्रिक यश इस्रोने मिळवले.

पारंपारिक रॉकेट्स अवकाशात जाताना इंधन आणि ऑक्सिडायझर्स अश्या दोन्ही वजनदार गोष्टी सोबत घेऊन प्रक्षेपीत होतात.

स्क्रॅमजेट इंजिन मात्र त्याच्या अंगभूत अत्याधुनीक Air-Breathing Propulsion System (ABPS) तंत्रज्ञांनामुळे, अवकाशात हायपर सॉनीक स्पीड घेत असताना, अवकाशाताला ऑक्सिजन सहजपणे संकलित करेल आणि सोबत नेलेले लिक्विड हायड्रोजन स्वरूपातले इंधन जाळण्यासाठी आयत्याच ऑक्सिडायझर्सचे काम करेल.

इस्रोच्या शास्त्रज्ञांनी सांगितले की स्क्रॅमजेट इंजिन हे अग्निबाण प्रक्षेपीत झाल्यावर ५५ सेकंदांनी वापरले जाईल.

अग्निबाणाचा पहिला टप्पा विभक्त होऊन बंगालच्या उपसागरात पडल्यावर अग्निबाण उपलब्ध असलेल्या इंधन प्रज्वलित क्षमतेवर जोरात वरच्या दिशेने मुसंडी मारेल.

दुसऱ्या टप्प्यात, अग्निबाण आवाजाच्या सहापट वेगाने वर घुसत असताना पृथ्वीपासून अवकाशात ठीक २० किलोमीटर अंतरावर स्क्रॅमजेट इंजिन सुरु केले जाईल.

हे इंजिन अत्यावश्यक असे इंधन पूर्ण ताकतीने पण नियंत्रित स्वरूपात पाच सेकंदांसाठी जाळेल.

या ज्वलनामुळे हा पूर्ण अग्निबाण पुढे अवकाशात जवळपास ४० ते ७० किलोमीटर अंतर हायपरसॉनीक स्पीडने कापेल.

सतीश धवन स्पेस सेंटरचे डायरेक्टर के सिवन यावेळी म्हणाले, \\"या तंत्रज्ञांनामध्ये दुसऱ्या टप्प्यात स्क्रॅमजेट इंजिन अवकाशात सुरु करणे आणि नंतर या इंजिनाची इंधन प्रज्वलन करणारी ज्वाळा सुपरसॉनीक स्पीड मध्ये सुद्धा सातत्याने पाच सेकंद सुरु ठेवणे हे एक मोठे आव्हान असते.

काम सुरु केल्यानंतर पहिल्या पाच सेकंदांपर्यंत सुरु ठेवली गेलेली ही यंत्रणा नंतर मात्र पुढे तशीच तब्बल १००० सेकंदांपर्यंत यशस्वीपणे काम करते. \\"

आता पुढचा टप्पा म्हणजे Reusable Launch Vehicle (RLV) चा पृथ्वीवर परतत असताना रनवे वर उतरण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर करणे.

एकदा का हे तंत्रज्ञान ISROने यशस्वीपणे विकसित केले की जगाच्या पाठीवर अवकाश क्षेत्रात महासत्ता बनून राहिलेल्या अमेरिकेच्या ‘सुपर-पॉवर’ पदाला सर्वार्थाने भारत आणि भारताची ISRO ही एक जबरदस्त जागतिक आव्हान उभे करेल हे निश्चित.

सर्व भारतीयांचे ISROच्या या यशासाठी मन:पूर्वक अभिनंदन आणि अब्दुल कलामांच्या स्वप्नातली ‘सुपर-पॉवर’ होण्यासाठी भारतीयन्स च्या ISROला सव्वाशे कोटी शुभेच्छा....


**टीम भारतीयन्स**

#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his ‘Mission 2020’ .