Bhartiyans

Menu

!! वाह ताज, वाह टाटा !!

Date : 10 Nov 2016

Total View : 391

Condé Nast Traveller या जागतीक पर्यटन मॅगेझीनने घेतलेल्या ऑनलाईन सर्व्हेमध्ये पर्यटकांनी उदयपूरच्या ताज लेक पॅलेस या आलिशान भारतीय हॉटेलला आशियातले आणि भारतीय उपखंडातले सर्वोत्कृष्ट हॉटेल असल्याचा कौ


सारांश

उदयपूरचे ताज लेक पॅलेस भारतीय उपखंडातले सर्वोत्कृष्ट हॉटेल ठरले आहे.'Condé Nast Traveller'. या जागतीक पर्यटन मॅगेझीनने घेतलेल्या ऑनलाईन सर्व्हेमध्ये पर्यटकांनी ही पसंती दर्शवली. या हॉटेलमध्ये राहणे म्हणजे आपण स्वतः महाराजा असल्याचा फील येण्यासारखेच आहे.सविस्तर बातमी

!! वाह ताज, वाह टाटा !!
उदयपूरच्या ताज लेक पॅलेस या टाटा ग्रुप ऑफ हॉटेल्स’च्या आलिशान भारतीय हॉटेलला, जगभरात फिरणाऱ्या पर्यटकांनी, आशियातले आणि भारतीय उपखंडातले सर्वोत्कृष्ट हॉटेल असल्याचा कौल दिला आहे. 
#Bharatiyans

\\'Condé Nast Traveller\\'. या जागतीक पर्यटन मॅगेझीनने घेतलेल्या ऑनलाईन सर्व्हेमध्ये पर्यटकांनी ही पसंती दर्शवली.

मलेशियातले \\'The Datai Langkawi\\' आणि बँकॉक’चे \\'Mandarin Oriental’ ही जागतीक दर्जाची हॉटेल्स अनुक्रमे दुसरी आणि तिसरी आली आहेत.

पूर्वी राजेशाही महालच असलेल्या आणि आता जागतीक दर्जाच्या पर्यटकांचे आकर्षण असलेल्या या हॉटेलमध्ये राहणे म्हणजे आपण स्वतः महाराजा असल्याचा फील येण्यासारखेच आहे असे मत जगभरातल्या बहुतांशी पर्यटकांनी यावेळी नोंदवले.

उदयपूरच्या मध्यावर असलेल्या विस्तीर्ण जलाशयाच्या मध्यभागी हे राजवाडा कनव्हर्टेड हॉटेल बांधलेले आहे.

या हॉटेलमधून सभोवतालच्या परिसराचा दिसणारा व्ह्यू विलक्षण सुंदर आहे.

या हॉटेलचे साधेसेच परंतु जगभरातल्या पर्यटकांना आकर्षीत करणे राजबिंडे रूप हे आशियाई टच दर्शवणारे असले तरी मुखत्वे राजघराण्याचे जरतारी वैभव आणि त्याचा जिवंत फील देणारे आहे.

२४ तास तुमच्या सेवेत असणारा आणि तुमची सर्वतोपरी काळजी घेत तुमचा कुठलाही शब्द खाली पडू न देणारा इथला प्रशिक्षित बट्लर, तुम्हाला तुमचा जन्म राजा म्हणूनच झाला असल्याची फील इथल्या वास्तव्यात देतो.


**टीम भारतीयन्स**

#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his ‘Mission 2020’ .