Bhartiyans

Menu

भारताचा सर्जिकल स्ट्राईक

Date : 10 Nov 2016

Total View : 386

रक्षामंत्री मनोहर पर्रीकर यांनी, पाकव्याप्त काश्मीरमधील तब्बल ८ दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्याची जोखिमेची कामगिरी तडीपार नेणाऱ्या देशभक्त सैनिकांचे, भरभरून कौतुक केले.


सारांश

भारतानं पाकिस्तानवर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकमध्ये ८ अतिरेकी संघटनांच्या तळांना आपलं लक्ष करत तब्बल ५० दहशतवाद्यांना यमसदनास रवाना केलं.जगाचे आणि विशेषतः पाकिस्तानचे डोळे मुस्काटात मारल्यासारखे खाडकन आणि व्यवस्थित उघडवणाऱ्या या सर्जिकल स्ट्राईकला यशस्वीपणे घडवून आणणाऱ्या शूर भारतीय सैनिकांना ‘Teamसविस्तर बातमी

२९ सप्टेंबरला भारतातर्फे करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राईक विषयी पहिल्यांदाच बोलताना रक्षामंत्री मनोहर पर्रीकर यांनी, पाकव्याप्त काश्मीरमधील तब्बल ८ दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्याची जोखिमेची कामगिरी तडीपार नेणाऱ्या देशभक्त सैनिकांचे, भरभरून कौतुक केले.

“यापुढे सुद्धा जर अशी किंवा कुठलीही आगळीक पलीकडून झालीच अथवा भारताला कोणीही, कसलीही इजा पोचवली तर त्यांना समजेल अश्या भाषेत चोख समर्पक प्रत्युत्तर देण्यात येईल.” पर्रीकर पुढे म्हणाले.

”भारताला इतर कोणतेही राष्ट्र अथवा कुणाचीही एक इंच सुद्धा भूमी जिंकून घ्यायची इच्छा नाही. आमचा तो इतिहास नाही आणि परंपरा सुद्धा नाही. 
भगवान श्रीराम यांनी दुर्जनांचे निर्दालन करून लंका जिंकून घेतली आणि बिभीषणाला सुपूर्त केली. 
भारतानेदेखील बांगलादेशमध्ये हीच गोष्ट केली. 
भारताला कोणालाही इजा करायची इच्छा नाही आहे परंतु जर कोणी आम्हाला इजा केली किंवा असा विचार जरी केला तरी त्यांना प्रत्याघाती प्रत्युत्तर देण्यात येईल.” संरक्षण मंत्री म्हणाले.

भारतातर्फे सर्जिकल स्ट्राईक झालाच नाही, या पाकिस्तानच्या भूमिकेविषयी बोलताना पर्रीकर म्हणाले की भारतीय सेनेचे विशेष सैनिक दल ‘लाईन ऑफ कंट्रोल’ पार करून कधी आणि कसे गेले आणि त्यांनी ही कामगिरी फत्ते केली कशी केली हेच पाकिस्तानच्या लक्षात येत नसल्यामुळे पाकिस्तान मुद्दामून असा कांगावा करतंय.

“कोणत्याही शस्त्रक्रियेनंतर जसा प्रत्येक जण बेशुद्धीच्या अवस्थेत असतो त्याचप्रमाणे पाकिस्तानदेखील अजून शुद्धीवर आलेला नाही”,पर्रीकर म्हणाले.

“विशाल पसरलेला समुद्र उल्लंघून लंकेला उड्डाण करण्यापूर्वी हनुमानाला त्याच्या दिव्य शक्तींविषयी काहीच कल्पना नव्हती. मी निव्वळ आपल्या सशस्त्र सेनेला त्यांच्या उत्तुंग कुवतीविषयी जाणीव करून दिली.” पर्रीकर आत्मविश्वासाने म्हणाले.

या भारतभूमीत राहाणाऱ्या सर्व सव्वाशे कोटी भारतीयांच्या वतीने ‘पॅरा कमांडोंचे’ अभिनंदन करताना रक्षामंत्री म्हणाले’ “पंतप्रधानांच्या आदेशानुसार सेनेने आपली कामगिरी अतिशय चोख रीतीने पार पडली आहे आणि ज्यांना जो धडा आणि संदेश द्यायचा तो व्यवस्थित पोचवला आहे.”

दहशतवाद्यांनी जम्मू आणि काश्मीरच्या उरी भागामध्ये १९ भारतीय जवानांना ठार मारण्याच्या घटनेला ११ दिवस होऊन गेले असतानाच, भारतीय विशेष सेना दलाने ‘लाईन ऑफ कंट्रोल’ जवळ स्थित ८ अतिरेकी संघटनांच्या तळांना आपलं लक्ष करत तब्बल ५० दहशतवाद्यांना यमसदनास रवाना केलं.

एवढंच नाही तर यावेळी त्यांच्या त्या सर्वच तळांचीदेखील भीषण नासधूस करण्यात आली.

‘लाईन ऑफ कंट्रोल’ नजीक स्थित असणाऱ्या दहशतवादी तळांवरील कोणीही अतिरेकी भारतीय हद्दीत घुसून हल्ला करू नये म्हणून अशा प्रकारच्या दहशतवादी तळांना आळा घालण्याचे मूळ उद्दिष्ट ठेऊन हे सर्वच सर्जिकल स्ट्राईक बेमालूनपणे करण्यात आले.

सर्जिकल स्ट्राईक मध्ये महत्वाची भूमिका बजावली ती म्हणजे विशेष दलाच्या ४ आणि ९ पलटणीने, तर ‘घातक’ पलटणीच्या ६ बिहार आणि १० डोग्रा पलटणीने महत्वाची सहाय्यक भूमिका बजावली.

पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकमुळे अस्वस्थ झालेल्या पाकिस्तानने, इस्लामाबादहून आलेल्या निर्देशांनुसार आपले जवान, अतिरिक्त राखीव सैन्य आणि यांत्रिक शस्त्रास्त्र भारतीय हद्दीलगत हलवली आहेत. 
गुप्तचर संस्थांनी देखील या गोष्टीला दुजोरा दिला आहे.

विशेष भारतीय लष्करी सूत्रांकडून हेदेखील सांगण्यात आले आहे की, पाकिस्तानच्या कोणत्याही प्रकारच्या अविचारी धाडसाला प्रत्युत्तर देण्यासाठी भारत संपूर्णपणे समर्थ आणि तयार असून सर्व प्रकारच्या हल्ल्याविरोधात प्रतिसाद यंत्रणा पुरेपूर ताकतीनीशी कार्यान्वित आहेत.

जगाचे आणि विशेषतः पाकिस्तानचे डोळे मुस्काटात मारल्यासारखे खाडकन आणि व्यवस्थित उघडवणाऱ्या या सर्जिकल स्ट्राईकला यशस्वीपणे घडवून आणणाऱ्या शूर भारतीय सैनिकांना ‘Team Bharatiyans’चा मानाचा मुजरा.


** Team Bharatiyans **

#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his ‘Mission 2020’ .

 

ओम वेर्लेकर

टीम भारतीयन्स