Bhartiyans

Menu

दुपारचे जेवण फक्त १० रुपयात ! गेली ७८ वर्षे ! एका वंदनीय सामाजिक जाणीवेतून!

Date : 10 Nov 2016

Total View : 472

‘सरल्या हॉटेल’ किंवा 'रामप्रसाद' म्हणून प्रसिद्ध असलेलं हे मेंगलोरीअन हॉटेल श्री सुंदर सरल्या या सद्गृहस्थाचे आहे. हे शहराच्या मालंड भागात शिकायला येणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांची क्षुधाशांती करून त्यां


सारांश

शहराच्या या मालंड भागात शिकायला येणाऱ्या विद्यार्थ्यांना दुपारी जेवण्यासाठी खास वेळ काढून घरी जाण्याचा ऑप्शन नसतो आणि अश्या वेळी हे रामप्रसाद हॉटेल या शेकडो विद्यार्थ्यांचे तारणहार ठरते. जेव्हा विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या दुपारच्या जेवणाची कल्पना सरकारच्याही डोक्यात नव्हती तेव्हापासूनच आताचे मालसविस्तर बातमी

 

आज जिथे १० रुपयात एक कपभर चहा सुद्धा मिळणे मुश्कील असते तिथे हे मेंगलोरीअन हॉटेल विद्यार्थ्यांना दुपारचे जेवण देते आहे फक्त १० रुपयात...गेली तब्बल ७८ वर्षे....एका वंदनीय सामाजिक जाणीवेतून....
#Bharatiyans

 

दुपारी जेवणाच्या वेळी दक्षिण कर्नाटकातल्या मेंगलोर मैसूर ही शहरे जोडणाऱ्या महामार्गावर असलेल्या सुलीया शहराच्या मध्यभागी असलेली श्रीरामपेट, विद्यार्थ्यांच्या आवाजाने आणि हालचालीने अचानक गजबजून उठते. ही प्रचंड गर्दी या विद्यार्थ्यांच्या कुठल्याही कार्यक्रमाची नसते तर हे विद्यार्थी एक तर जात असतात किंवा जावून बाहेर येत असतात... पोटभर जेवून...हॉटेल रामप्रसाद मध्ये...तेही फक्त १०/- रुपयात...

 

‘सरल्या हॉटेल’ किंवा \\'रामप्रसाद\\' म्हणून प्रसिद्ध असलेलं हे हॉटेल श्री सुंदर सरल्या या सद्गृहस्थाचे आहे.

 

तब्बल ७० वर्षांपासून हजारो लोकांची क्षुधाशांती करून त्यांना तृप्त करणारे हे साधेसेच हॉटेल केवळ एकाच महत्वाच्या गोष्टीसाठी लोकांच्या चांगलेच ‘चांगल्या’ स्मरणात राहते..आणि ती गोष्ट म्हणजे इथले अत्यंत स्वस्त असणारे स्वादिष्ट जेवण...कृतार्थ करणारे जेवण....आणि तेही अतोनात स्वस्त....

 

शहराच्या या मालंड भागात शिकायला येणाऱ्या विद्यार्थ्यांना दुपारी जेवण्यासाठी खास वेळ काढून घरी जाण्याचा ऑप्शन नसतो आणि अश्या वेळी हे रामप्रसाद हॉटेल या शेकडो विद्यार्थ्यांचे तारणहार ठरते.

 

जेव्हा विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या दुपारच्या जेवणाची कल्पना सरकारच्याही डोक्यात नव्हती तेव्हापासूनच आताचे मालक सुंदर सरल्या यांचे वडील वेंकटरामन सरल्या हे इथे १९३८ पासून १ रुपयाला चार जेवणे देत आहेत हे विशेष.

 

मुळचे केरळचे असणारे सरल्या कुटुंब सुलीया मध्ये १९३८ साली आले आणि त्यांनी त्यावेळी इथे गवताच्या झोपडीत हॉटेल सुरु केले.

 

जेव्हा ४६ वर्षांपूर्वी सुंदर सरल्या यांनी या हॉटेलमध्ये लक्ष द्यायला सुरुवात केली तेव्हा त्यांनी हीच सेवा पुढे ही सुरु ठेवली.

 

पण आता बदललेल्या किमती प्रमाणे आणि महागाई वाढल्यामुळे आता जेवणाच्या किमती मात्र वाढल्या आहेत. 
पण किती वाढल्या आहेत ?

 

\\"हे हॉटेल आणि विद्यार्थ्यांना स्वस्त जेवण अस आम्ही जेव्हा इथे सुरु केलं तेव्हा इथे एका जेवणाची किंमत होती २५ पैसे म्हणजेच चार आणे.\\" सुंदर सांगतात.

 

आधी १ रुपयात चार जेवणे मिळायची, नंतर ती तीन मिळू लागली, नंतर दोन आणि नंतर एक जेवण १ रुपयाला मिळू लागले.

 

अगदी अलीकडे म्हणजे निव्वळ २ वर्षांपूर्वी सुंदर सुरल्या हे ५ रुपयात एकवेळचे जेवण विद्यार्थ्यांना देत होते.

 

आणि आता हे पूर्ण जेवण मिळते फक्त, फक्त आणि फक्त १० रुपयांत....

 

आणि या जेवणात फक्त भात आणि सांभार इतक्याच गोष्टी असतात असे नाही तर त्या सोबत इथे रसम, आमटी आणि टाक सुद्धा असते हे विशेष.

 

“एवढ्या कमी किमतीत विद्यार्थ्यांना तुम्ही जेवण कसे देऊ शकता आणि हे तुम्हाला परवडतेच कसे?” असं विचारलं असता सुंदर सरल्या म्हणतात,” मी काहीच वेगळे करत नाहीये. मी माझ्या वडलांचा वारसा पुढे सुरु ठेवला आहे इतकच काय ते बास माझ क्रेडीट.\\"

 

\\"आज काम करणे आणि कष्ट करत जेवण मिळवणे हे विद्यार्थ्यांना अशक्यप्राय आहे. काम करणार का, अभ्यास करणार का जेवण करण्यासाठीचे पैसे कमावणार. माझ्या वडलांनी ही अडचण ओळखून या विद्यार्थ्यांना इतक्या कमी पैशांत सुग्रास जेवण देण्याची परंपरा सुरु केली आणि मी ती पुढे सुरु ठेवली आहे एव्हढेच.” सुंदर पुढे सांगतात.

 

हॉटेल रामप्रसाद रोज शेकड्याने लोकांना जेवायला घालते आणि यातले किमान निम्मे ग्राहक हे शिकणारे विद्यार्थी असतात.

 

“हे सगळ परवडतं कसं ?” अस विचारल्यावर सुंदर म्हणतात, “इथून जर कुणी जेवण आमच्याकडून घरी पार्सल करून घरी नेले तर मात्र आम्ही ४० रुपयेच घेतो जो नेहेमीचा सामान्य दर आहे. आणि यासोबतच आमच्या हॉटेलमध्ये मिळणारे बाकीचे पदार्थ हे पैशांच्या बाबतीत इतर हॉटेलांच्या तुलनेतच आहेत. या बाकीच्या केटरिंग मध्ये आम्हाला बऱ्यापैकी फायदा होतो आणि म्हणूनच आम्ही विद्यार्थ्यांना इतक्या अत्यल्प दारात पोट भरेल इतके जेवण देऊ शकतो.”

 

आता सुंदर यांचा मुलगा राघवेंद्र सरल्या या हॉटेलची कमान सांभाळण्याच्या प्रोसेस मध्ये आहे. दुसरा मुलगा दुसरा कुठलातरी धंदा-व्यवसाय करतो.

 

“आम्ही सर्व सुखात आहोत. आमच्या वाड-वडलांनी सुरु केलेली क्षुधाशांतीची परंपरा आम्ही मंलावून सर्वच पुढच्या पिढ्या त्यांच्या पावलांवर पाउल टाकून चालवतो आहोत. आणि याचा आम्हाला अभिमान आहे.

 

अत्यल्प किमतीत विद्यार्थ्यांना पोटभर जेवण देण्याची ही आमच्या घराची परंपरा अशीच सुरु राहणार आहे आणि आजपर्यंत देवाने आमचे कधीच कुठलेच नुकसान केलेले नाही आणि देव ते कधी करणारही नाही.” सुंदर सरल्या सांगतात.

 

महागाईचा आगडोंब उसळळेला असताना शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अगदीच परवडेल इतक्या स्वस्तात, प्रसंगी आपल्या खिशाला कात्री लावून, सुग्रास जेवण पुरवणाऱ्या या सरल्या कुटुंबियांना \\'टीम भारतीयन्स\\'चा मानाचा मुजरा....

#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his ‘Mission 2020’ .

 

 

मिलिंद वेर्लेकर

टीम भारतीयन्स

बातमी सौजन्य