Bhartiyans

Menu

ऑलिम्पिक कांस्यपदक बदलून रजतपदक मिळत असल्याचे कळल्यानंतर भारतीय पैलवान योगेश्वर दत्तची वेगळीच विनंती !

Date : 10 Nov 2016

Total View : 198

योगेश्वर दत्त या भारतीय पैलवानाने, खेळाडू म्हणून आणि त्या आधी एक उत्कृष्ट संस्कारीत भारतीय नागरिक माणूस म्हणून स्वतःला सिद्ध केलं आहे. भारतीय परम्परेचा आणि संस्कृतीचा मान जगभरात वाढवला आहे.


सारांश

आपले ऑलिम्पिक पदक कांस्य पासून रजत पदकात बदलत आहे ही बातमी कळल्यानंतर भारतीय पैलवान योगेश्वर दत्त याने ट्वीट केलं कीसविस्तर बातमी

 

\\'आपण निव्वळ एका खेळाडू’पेक्षाही किती तरी पटीने जास्त सुसभ्य संस्कारीत नागरिक आणि छान माणूस आहोत\\' हे भारतीय ऑलिम्पिक पदक विजेता खेळाडू योगेश्वर दत्त यानेनुकत्याच झालेल्या एका अत्यंत महत्वाच्या जागतिक घडामोडीमधे सिद्ध केलंय आणि भारताचा मान वाढवलाय.....
#Bharatiyans

 

२०१२ च्या लंडन ऑलिम्पिक’मध्ये प्रतिस्पर्धी रशियन पैलवान बेसिक कुदोखोवा याच्या हस्ते पराभव झाल्यानंतर योगेश्वरला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले होते.

 

२०१३ साली रजत पदक मिळवलेल्या या रशियन पैलवानाचा एका अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला.

 

वाड़ा (World Anti-Doping Agency) च्या नुकत्याच आलेल्या एका डोप टेस्ट रिपोर्ट मधे बेसिक हा पैलवान मृत्यु उपरांत अयशस्वी ठरला अणि योगेश्वर या भारतीय पैलवानाचे मेडल कांस्य वरून रजत पदकाकडे अपग्रेड करण्यात आले.

 

आपले ऑलिम्पिक पदक कांस्य पासून रजत पदकात बदलत आहे ही बातमी कळल्या नंतर भारतीय पैलवान योगेश्वर दत्त याने लगेचच ट्वीट केलं की \\" जमल्यास बेसिक यांचे पदक त्यांच्या परिवारा जवळच राहु द्यावे. 
मी एक खेळाडू म्हणून बेसिक याचा सम्मान करतो आणि मृत्युनंतर बेसिक यांचे डोप टेस्ट मधे अयशस्वी होणे हे दुःखद आहे.\\"

 

आम्हाला अभिमान आहे भारतीय योगेश्वर दत्त या पैलवानाचा, एक खेळाडू म्हणून आणि त्या आधी एक उत्कृष्ट संस्कारीत भारतीय नागरिक माणूस म्हणून योगेश्वर याने स्वतःला सिद्ध केल आहे.

 

योगेश्वर दत्त, तुम्ही भारतीय परम्परेचा आणि भारतीय सभ्यता आणि संस्कृतीचा मान जगभरात वाढवला आहे.

 

योगेश्वर दत्त या भारतीय खेळाडूला ‘टीम भारतीयन्स’चा मानाचा मुजरा...

#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his ‘Mission 2020’ .

 

.

 

मिलिंद वेर्लेकर

टीम भारतीयन्स

बातमी सौजन्य