Bhartiyans

Menu

पुस्तक-विक्रीचा व्यवसाय करणारा मुंबईचा संतोष पांडे बनला लेखक

Date : 10 Nov 2016

Total View : 434

संतोष पांडे या फक्त ७ वी शिकलेल्या माणसाने लिहिलेले पुस्तक ॲमेझॉनच्या ‘बेस्ट-सेलर’ यादीत दुस-या क्रमांकावरही पोहोचू शकत


सारांश

परिस्थितीमुळे शिक्षण मिळालं नाही तरीही सामान्य माणूसही कल्पक कष्ट करून मोठा होऊ शकतो, याच 'अतिसामान्य' माणसाने लिहिलेलं एक पुस्तक ॲमेझॉनच्या ‘बेस्ट-सेलर’ यादीत दुस-या क्रमांकावरही पोहोचू शकत याचं उत्तम उदाहरण म्हणजे इयत्ता सातवी शिकलेला, रस्त्यावर पुस्तक-विक्रीचा व्यवसाय करणारा मुंबईचा संतोष पांडे.सविस्तर बातमी

            शिक्षण महत्वाचं आहेच पण परिस्थितीमुळे शिक्षण मिळालं नाही तरीही सामान्य माणूसही कल्पक कष्ट सातत्याने करून मोठा होऊ शकतो, निव्वळ मोठाच होऊ शकतो नव्हे तर याच \\'अतिसामान्य\\' माणसाने लिहिलेलं एक पुस्तक ॲमेझॉनच्या ‘बेस्ट-सेलर’ यादीत दुस-या क्रमांकावरही पोहोचू शकत याचं उत्तम उदाहरण म्हणजे फक्त इयत्ता सातवी शिकलेला, रस्त्यावर पुस्तक-विक्रीचा व्यवसाय करणारा मुंबईचा संतोष पांडे. 
#Bharatiyans

आपल्या भाषेत एक म्हण आहे \\'जिथे पिकतं तिथे विकलं जात नाही!\\' 
पण जिथे जे विकलं जातं तिथेच ते पिकायला लागलं तर?

हो हे शक्य आहे! 
ही गोष्टं आहे पार्ल्याच्या संतोष पांडे ह्या पुस्तक-विक्रेत्या \\'लेखकाची\\' !

वयाच्या तेराव्या वर्षी संतोष उत्तरप्रदेशहून मुंबईत आला.

मोठ्या दोन बहिणींची लग्नं झाल्यावर शाळेची ६ रुपये फी भरणंही शक्य नव्हतं. पण निदान लहान भावाचं तरी शिक्षण व्हावं याविचाराने आई बाबांनी संतोषला मुंबईत पाठवलं. हा लहान भाऊ आता इंजिनीअर आहे.

मुंबईत मावशीकडे राहून मावस भावंडांच्या पुस्तकांच्या होलसेलच्या व्यवसायात काम करायला त्याने सुरुवात केली.

लगेचच वयाच्या चौदाव्या वर्षी संतोषचं गावतल्याच एका मुलीशी लग्नं झालं. 
पण हा मुंबईतच होता.

स्वत:चा व्यवसाय सुरु करावा या विचाराने त्याने रद्दीच्या दुकानातून पुस्तकं विकत घेऊन ती विकायला सुरुवात केली.

आधीच्या व्यवसायामुळे कुठली पुस्तकं खपतात आणि कुठली नाही याची जाणीव त्याला होती. आणि याच्याच भरवश्यावर त्याने स्वत:चा पुस्तकांचाच व्यवसाय सुरु केला.

पण \\'ऊपर नीचे- नीचे ऊपर सैर चले जीवन की...\\' असं म्हटल्याप्रमाणे जसं जसं सगळं छान होत होतं तसंच चक्रनियमाप्रमाणे संकटही आलंच...

अचानक एक दिवस संतोषचं आणि त्याच्या रांगेतल्या सगळ्यांची दुकानं फोडली. संतोष अक्षरश: उध्वस्तं झाला. 
त्याच्या डोक्यावर दोन लाखाचं कर्ज झालं.

याच चिंतेत असताना तो पुन्हा गावाला गेला.

आणि या चितांतून रामच मार्ग काढू शकतो या विश्वासाने त्याने रामायण वाचायला सुरुवात केली.

आणि त्याला सापडू लागला कर्माचा सिद्धांत!

राजाच्या पोटी जन्माला आलेला राम जंगलात जातो... आणि गरीब ब्राह्मणाच्या घरात जन्मलेला रावण सोन्याच्या लंकेत! का ना असं? आणि कसं काय?

या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी त्याने आणखी पुस्तकं वाचायला सुरुवात केली.

आणि या सगळ्या शोधवाटेत नकळतपणे \\'कर्मयान\\' त्याला सापडत गेलं.

हिंदीतून त्याने लिहायला सुरुवात केली. आणि त्याच्याचकडून पुस्तकं घेऊन जाणारे त्याचे एक गि-हाईक विनोद चेरियन या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद करण्यासाठी तयार झाले.

दररोज ऑफिस सुटल्यावर रात्री दहा ते बारा-एक पर्यंत एका हॉटेलमधे बसून या दोघांनी या पुस्तकाचं काम पूर्ण केलं.

आणि आज संतोषचं हे \\'fictional\\' पुस्तक ॲमेझॉनच्या best seller यादीत दुस-या क्रमांकावर आहे.

\\'हे सगळं कसं झालं?\\' या प्रश्नाचं उत्तर तो \\'प्रारब्ध\\' असंच देतो!

संतोष आणखी दोन पुस्तकं लिहित आहे.

त्याच्याशी बोलताना बोलता बोलता एकदा तो एक वाक्य बोलून गेला... पण त्यातून त्याच्या विचारांची आणि जाणीवांची प्रगल्भता सांगून गेला.

तो म्हणाला, \\'पावसाळ्यात एखाद्दा अचानक पाऊस आला आणि आपल्याकडे छत्री नसेल, तर आपण चिंब भिजून जातो. पण एकदा कळलं की आधी छत्री न आणल्यामुळे आपण भिजलो आहोत त्यामुळे यापुढे आपल्याला छत्री घ्यायची आहे की मग पावसामुळे भिजायला होत नाही.

तसंच जन्मांचं आहे अहो! 
एकदा कळलं की आपण आत्ता जे भोगतोय किंवा उपभोगतोय ते आपल्या मागच्या जन्मीच्या पाप-पुण्याचं फलित आहे. की या जन्मात सत्कृत्य करण्याची बुद्धी होतेच... पुढच्या जन्मासाठीचे savings म्हणून... फक्तं ती जाणीव महत्वाची हो!\\'

संतोषचं हे बोलणं ऐकून माझ्या अंगावर काटा आला... \\'मी लिहते, मी लिहते\\' ही हवा मात्रं त्या काट्यासरशी निघून गेली!

संतोषच्या कर्तुत्व भरारीला ‘टीम भारतीयन्स’चा मानाचा मुजरा....

श्रुती आगाशे
**टीम भारतीयन्स**

#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his ‘Mission 2020’ .

 

श्रुती आगाशे

टीम भारतीयन्स

बातमी सौजन्य

---