Bhartiyans

Menu

कर्नल अजय कोठीयाल यांनी देशभक्ती म्हणून १८०० युवकांना सैनिक प्रवेश परीक्षेसाठी मोफत प्रशिक्षण दिले.

Date : 10 Nov 2016

Total View : 121

दोन वर्षांत १४०० सैनिक तयार करणारे ‘द्रोणाचार्य’ कर्नल


सारांश

गेल्या महिना अखेरीस झालेल्या सर्जिकल स्ट्राईकमुळे आज देशभक्तीला एक नवे परिमाण लाभले आहे. भारतीय सेनेचे सर्वत्र कौतुक होत आहे. पण सेनेत दाखल व्हायला काय लागतं, याचा कधी विचार केलाय का तुम्ही? मेडिकल, अभियांत्रिकी, एमबीए , वकिली साठी प्रवेश परीक्षा आहेत आणि त्या परीक्षांसाठी कोचिंग क्लासेस भूछत्रा सासविस्तर बातमी

 

तुम्ही सिए, इंजिनिअरींग, मेडिकल इ. चे क्लासेस ऐकले आहेत ना? आज भेटूया अश्या एका बहादूर आणि देशप्रेमी कर्नलला ज्याने आज देशासाठी तयार होणाऱ्या सैनिकांसाठी एक मोठी सुविधा तयार केली आहे.
हा आहे दोन वर्षांत १४०० सैनिक तयार करणारा ‘द्रोणाचार्य’ कर्नल!
#Bharatiyans

 

कर्नल अजय कोठीयाल यांना आपल्या देशभक्तीच्या अभिव्यक्तीचा मार्ग मिळाला तो १८०० युवकांना सैनिक प्रवेश परीक्षेसाठी तयार करण्यात! 
आणि त्यात सुद्धा एक विलक्षण मोठी गोष्ट म्हणजे त्यातले १४०० युवक आज भारतीय सैन्यासाठी निवडले गेले आहेत.

 

गेल्या महिना अखेरीस झालेल्या सर्जिकल स्ट्राईकमुळे आज देशभक्तीला एक नवे परिमाण लाभले आहे. भारतीय सेनेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 

पण सेनेत दाखल व्हायला काय लागतं, याचा कधी विचार केलाय का तुम्ही? 
मेडिकल, अभियांत्रिकी, एमबीए वगैरे सोडा, आज काल वकिली साठी पण प्रवेश परीक्षा आहेत, आणि त्या परीक्षांसाठी कोचिंग क्लासेस भूछत्रा सारखे गल्लोगल्ली उगवलेले दिसतात. पण सेनेत प्रवेशासाठी कोचिंग क्लास असल्याचे ऐकिवात नाहीच.

 

पण कर्नल अजय कोठीयाल यांनी असा कोचिंग क्लास काढला आणि भन्नाट यशस्वी पण केला!

 

उत्तराखंडात जन्म आणि बालपण गेलेल्या कोठीवाल यांना तरुणांमधला उत्साह आणि क्षमता दिसल्या, पण त्यांच्या हे लक्षात आले की तरुणांच्या या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी त्यांना मार्गदर्शन जरूरीचे आहे.

 

\\"मी याच भागातला असल्याने खेडूत माझ्याकडे आले आणि त्यांनी मला विचारलं की मी त्यांच्या मुलांना सैन्यात भरती करू शकेल का? मी म्हणालो की मी त्यांना शारीरिक क्षमता चाचणी आणि लेखी परीक्षा यांच्यासाठी तयारी करायला मदत करू शकतो\\", कोठीयाल म्हणाले.

 

कर्नल अजय कोठीयाल हे नेहरू गिर्यारोहण संस्था, डेहराडूनचे प्राचार्य आहेत आणि त्यांना बरेच शौर्य पुरस्कार मिळाले आहेत.

 

२०१३ मध्ये कोठीयाल आणि एक प्रशिक्षक यांनी मिळून ३० तरुणांना प्रशिक्षण दिले आणि त्यातल्या २८ जणांना गढवाल रायफल्स मध्ये नोकरी मिळाली सुद्धा. आता साहजिकच ही बातमी वणव्यासारखी पसरली आणि खूप उमेदवारांनी त्यांच्याशी संपर्क साधायला सुरुवात केली.

 

\\"देशसेवा करू इच्छिणाऱ्या या मुलांमध्ये मला प्रचंड उत्साह आणि अनेकानेक शक्यता दिसल्या. पण दुर्दैवाने तरुणाईने न्हाऊन निघालेल्या या मुलांना सेना आणि पोलीस यांच्या भरतीबद्दल मात्र काही माहितीच नव्हती.

 

म्हणून आम्ही त्यांना भारतीय सैनिकांचे जीवन आणि त्याच्या जबाबदाऱ्या यांच्याबद्दल संपूर्ण माहिती देण्याचा विचार केला आणि तो प्रत्यक्षात सुद्धा आणला\\", कोठीवाल म्हणाले.

 

त्यांना मिळालेल्या प्रतिसादाने कोठीयाल यांचा हुरूप शतपटीने वाढला आणि २०१५ मध्ये त्यांनी यूथ फौंडेशन नावाने एका विना-नफा ट्रस्ट’ची स्थापना केली. याच्या अंतर्गत उत्तराखंडात विविध जिल्ह्यांमध्ये आता सहा शिबीरे यशस्वीपणे चालवली जातात.

 

ही शिबिरे जुन्या शाळा, मंदिरे वगैरेंमध्ये भरतात. फौंडेशनचे चालक श्री सुरेश नेगी यांनी या शिबीरांतल्या दैनंदिन घडामोडींची माहिती दिली. \\"सेनेचे निवृत्त प्रशिक्षक आमच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देतात.

 

कवायती आणि शिस्त सेनेतल्या सारखीच असते पण तितकी कडक नसते. आम्ही त्यांच्याकडून काम करवून घेतो, परीक्षा कशी द्यायची आणि पास कशी व्हायची, याबद्दल आम्ही सर्वांगीण मार्गदर्शन करतो आणि त्यांना इतरांना सुद्धा मदत करण्यासाठी प्रोत्साहन देतो\\", नेगी म्हणाले.

 

त्यांच्यातल्या युवाशक्तीला वाव देण्यासाठी आणि त्यांना सामाजिक दृष्ट्या जबाबदार बनवण्यासाठी ट्रस्ट त्यांना विविध कामांत सहभाग घेऊ देतो.

 

\\"आम्ही त्यांना संघभावना मजबूत करणाऱ्या आणि सामर्थ्य वाढवणाऱ्या विविध विधायक कार्यात भाग घेऊ देतो. उदाहरणार्थ एका म्हातारीचे शेत ढगफुटीने बरबाद झाले होते. तिला कुठलाच आधार नव्हता. आम्ही १०० मुलांना ते शेत पुन्हा नीट करायला पाठवले. तिला इतका आनंद झाला की तिनं त्या सर्वांना गरमागरम भात बनवून वाढला!\\" नेगी म्हणतात.

 

पण हे प्रशिक्षण मुलांसाठीच मर्यादित नाही. मुलींना पण देशसेवा करावीशी वाटतेच. म्हणून यावर्षी आश्चर्य म्हणजे ३२८ मुलींनी सुद्धा या शिबिरात प्रवेश घेतला आहे.

 

या शिबिरांमुळे तरुणांमध्ये नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्याचे प्रशिक्षण मिळते आणि त्यामुळे कदाचित ते नोकरीसाठी शहरांमध्ये जाणार नाहीत, असे नेगी यांना वाटते.

 

\\"अलीकडे उत्तराखंडात ढगफुटी आणि इतर आपत्ती आल्या आणि खूप नुकसान झालं. या उमेदवारांना सेनेत काम मिळाले की ते आपल्या पगारातून बचत करून घरी पाठवू शकतील, यामुळे त्यांचे घर तर उभारले जातेच त्यासोबत राज्याची अर्थव्यवस्था सावरायला सुद्धा याचा हातभार लागेल\\", कोठीयाल म्हणाले.

 

आपण गरजूंसाठी एक पाऊल उचलले तर इतरही लोक सहजपणे सोबत येतात असे म्हणतात. आता नामांकित इस्पितळांमधून डॉक्टर डोंगराळ भागात खेडुतांना मदत करायला पुढे आले आहेत. \\"विद्यार्थ्यांच्या मदतीमुळे डॉक्टर आणि शिक्षक मंडळी दुर्गम भागांत रुग्णांना मदत करायला जात आहेत\\", नेगी म्हणतात.

 

सुरुवातीच्या खर्चाचा भार कर्नल कोठीयाल यांनी स्वत: उचलला होता. पण यूथ फौंडेशन ला आता इतर मोठ्या ट्रस्ट मधून पण मदत मिळायला सुरुवात झाली आहे. आणि यामुळे आता या कार्याचा विस्तार झपाट्याने होतो आहे.

 

कर्नल अजय कोठीयाल, आम्हांला, ‘टीम भारतीयन्स’ना तुमचा अभिमान वाटतो आहे.

#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his ‘Mission 2020’ .

 

 

मिलिंद वेर्लेकर

टीम भारतीयन्स

बातमी सौजन्य