Bhartiyans

Menu

खेड्यापाड्यात सौरदीपांचा प्रकाश आणणाऱ्या महिला

Date : 11 Nov 2016

Total View : 511

उदयपूरमधील छोट्या खेड्यापाड्यांत सौरदीपांचा प्रकाश आपल्या कर्तृत्वाने प्रकाशमान करणाऱ्या कुठलीही डिग्री न घेतलेल्या अभियंता महिला! दुर्गम खेड्यापाड्यात राहणाऱ्या महिलांना स्वयंरोजगार ह्या उपक्रमामुळे


सारांश

उदयपूरमधील छोट्या खेड्यापाड्यांत सौरदीपांचा प्रकाश आपल्या कर्तृत्वाने प्रकाशमान करणाऱ्या कुठलीही डिग्री न घेतलेल्या अभियंता महिला! दुर्गम खेड्यापाड्यात राहणाऱ्या महिलांना स्वयंरोजगार ह्या उपक्रमामुळे मिळाला.सविस्तर बातमी

असफलता एक चुनौती है, इसे स्वीकार करो,
क्या कमी रह गई, देखो और सुधार करो।
जब तक न सफल हो, नींद चैन को त्यागो तुम,
संघर्ष का मैदान छोड़ कर मत भागो तुम।
कुछ किये बिना ही जय जय कार नहीं होती,
कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। - हरिवंशराय बच्चनजींच्या ह्या पंक्तींप्रमाणे राजस्थानमधील संघर्ष करून छोट्या खेड्यापाड्यांत सौरदीपांचा प्रकाश आपल्या कर्तृत्वाने प्रकाशमान करणाऱ्या ह्या महिलांचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे! अश्या ह्या भारतीय माता भगिनींना आमचा मानाचा सलाम!!

उदयपूरमधील ह्या महिलांची कार्यक्षमता आणि कार्यप्रणाली पाहून मन थक्क व्हायला होतं. ह्या \\'महिला अभियंता\\' किती सफाईने व्होल्टमीटर तपासतात आणि अत्यंत सहज पण सावधपणे LED बल्ब किंवा सौरपत्रे (solar panels) सोलडेरिंग मशीनच्या साहाय्याने लावतात, हे बघताना अत्यंत कौतुक वाटते. आणि जेव्हा आपल्याला हे कळतं कि ह्यांतील बहुतांशी महिलांनी शाळेत कधीही पाऊलसुद्धा टाकलेलं नाहीये किंवा कधी विज्ञानाचा अभ्यास देखील त्यांच्या आयुष्यात आलेला नाहीये तेव्हा मन अचंबित होऊन जातं.

परंतु, सौरदिप (solar lamps) उत्पादनाच्या कार्याने ह्या महिलांना जणूकाही अभियंताच केलं आहे आणि पुढील तीन महिन्यांत ६०,००० सौरदिप बनविण्याचं लक्ष्य त्यांच्यासमोर आहे.

दूंगारपूर येथील वेगवेगळ्या सेल्फ-हेल्प (Self Help Groups SHGs) समूहांमधून एकसंधपणे कार्यरत असणाऱ्या ह्या २०० महिलांचं सैन्य \\'राजस्थान ग्रामीण आजीविका विकास परिषद (राजीविका)\\' नावाच्या संस्थेखाली हे विक्रमी कार्य करीत आहेत. तालुका प्रकल्प व्यवस्थापक असलेल्या विनोद पानेरींनी सांगितलं कि, \\"हे सौरदीप बनविण्यासाठी राजीविकाने IIT मुंबई शी सामंजस्य करार (MOU) केले आहे. IIT मुंबई मधील काही तज्ज्ञांनी ८० महिलांना तांत्रिक शिक्षण दिले. ह्यात प्रामुख्याने पूणाली, झोनथरीं, बिलादी आणि अंतरी ह्या गावांतील महिला सहभागी होत्या, नंतर ह्यांनी आपापल्या प्रदेशांतील महिलांना प्रशिक्षण दिले.\\"

IIT मुंबई ह्या प्रकल्पासाठी लागणारा सर्व कच्चा माल ह्या महिलांना पुरवते आणि कौतुकाची बाब म्हणजे विजेचा सऱ्हास वापर नसताना ह्या महिला सौरदीप नुसते बनवित नाहीत तर ह्या मालाची बांधाबांध आणि वितरण, विपणन व्यवस्थाही उत्तमरीत्या पाहतात.

पानेरी पुढे कौतुकाने सांगतात कि, \\"ह्या प्रकल्पाने येथील महिलांना हरित ऊर्जेच्या उद्योजिकाच बनविले आहे. ह्या महिलांच्या चमुनेच सर्वेक्षण करून कुठल्या गावांमध्ये सौरदीपांची गरज व मागणी आहे ते शोधून काढले आणि मग ६०,००० सौरदीप बनविण्याचे लक्ष्य निश्चित केले.\\"

ह्या संपूर्ण प्रकल्पामुळे १.२ कोटींचा फायदा ह्या सेल्फ-हेल्प (Self Help Groups SHGs) समूहांना होणार आहे. मांडेल उपाली गावात राहणाऱ्या ललिता देवी म्हणाल्या, \\"आमचा स्वतःचा व्यवसाय आम्ही प्रस्थापित करून तो वाढवू असं कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं आणि आता आम्ही एक सौरदीप बनविणारा कारखाना चालवतो, ह्याचा आम्हाला अत्यंत अभिमान वाटतो.\\"

राजस्थान व्यतिरिक्त इतर प्रांतांमध्येहि IIT मुंबईने गावांतील महिलांना रोजगार मिळवून देण्यासाठी हा प्रकल्प राबविण्याचे ठरविले आहे.

ह्या पूर्वीही ह्या प्रकल्पाने भारतातील काही दुर्गम खेड्यापाड्यात प्रकाश आणला होता. Frontier Markets च्या अजैता शाह ह्यांनी \\"सोलार सहेली\\" नावाचा प्रकल्प उभारला होता आणि त्या अंतर्गत खेड्यातील गरजू महिलांना सक्षम बनविण्यासाठी हा उपक्रम राबविला होता. सोलार सहेली अंतर्गत आत्तापर्यंत १० दशलक्ष घरांमध्ये ५ दशलक्ष सौरदीप विकले गेले आहेत.

आपले आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदींनी आपल्या \\"मन कि बात\\" ह्या कार्यक्रमामधून उत्तर प्रदेशातील, बेरी दारियावान गावातील श्रीमती नूर जहान ह्यांचे आपल्या गावात सौरदीप कारखाना चालू केल्याबद्दल कौतुक केले होते. हे सौरदीप त्यांनी गावागावांत एका महिन्यासाठी निव्वळ १००/- किंवा प्रतिदिन ३ ते ४ रुपये इतक्या माफक दरात भाडेतत्वावर देण्यास सुरुवात केली.

मोदीजींनी तिचं कौतुक करताना सांगितलं कि हवामानात होणारे बदल आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या समस्या ह्यांवर मात करण्यासाठी अक्षय ऊर्जेचा (renewable energy) वापर कसा करता येईल ह्यासाठी तरुण पिढीला व महिलांना श्रीमती नूर जहान ह्यांचे काम खूपच प्रेरणादायी आहे.

#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his ‘Mission 2020’ .

 

 

 

मिलिंद वेर्लेकर

टीम भारतीयन्स

बातमी सौजन्य