Bhartiyans

Menu

“एका स्वच्छतागृहाची साहसी गोष्ट”

Date : 11 Nov 2016

Total View : 458

सर्व सामाजिक बंधनं तोडून, मंगळसूत्र गहाण टाकून, लग्न करून गेलेल्या घरात शौचालय बांधणारी बिहारी महिला.


सारांश

सर्व सामाजिक बंधनं तोडून, मंगळसूत्र गहाण टाकून, लग्न करून गेलेल्या घरात शौचालय बांधणारी बिहारी महिला. शौचालयांचा अभाव हा ग्रामीण भागातील अत्यंत गंभीर मुद्दा आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या अनेक समस्या ह्यांवर मात करण्यासाठी भारतीय दुर्गा उभ्या राहिल्या आणि येनकेन मार्गाने पैसे उभे करून ह्या समस्येवर तोडगासविस्तर बातमी

एका विवाहित स्त्रीसाठी अतंत्य प्रिय असणाऱ्या मंगळसुत्राला गहाण टाकून अत्यंत मूलभूत गरजेसाठी म्हणजेच शौचालय बांधण्यासाठी ह्या महिलांनी सामाजिक बंधनं बाजूला ठेवून केलेल्या धाडसाला आमचा सलाम!

पुरुष किंवा स्त्री शौचालयांचा अभाव हा ग्रामीण भागातील अत्यंत गंभीर मुद्दा आहे, पुरुष अगदी स्पष्ट कारणांमुळे ह्या समस्येवर मात करू शकतात पण स्त्रियांसाठी हा एक गंभीर मुद्दा आहे. भारताच्या १.२ अब्ज लोकसंख्येच्या जवळ जवळ अर्ध्या प्रमाणावर लोकांच्या घरी शौचालय नसल्याने त्यांना मलविसर्जनासाठी उघड्यावर जावे लागते.

पैसे जमवून घरात शौचालय बांधण्याच्या कामासाठी, बिहारमधील फूल कुमारी या महिलेने बेधडकपणे आपले \\'मंगळसूत्र\\' गहाण टाकले. हि घटना बिहार मध्ये रोहतास तालुक्यात बाराहखन्न गावात घडली.

उघड्यावरील मालविसर्जनामुळे येथील गावांत एक प्रकारची दहशत निर्माण झाली कारण ह्या प्रक्रियेमुळे गावातील लोकांना सर्पदंश, विनयभंग अश्या भयंकर घटनांनी, आणि स्वच्छतेअभावी उद्भवणाऱ्या आरोग्य विषयक समस्यांनी बेजार करून टाकलं, त्यांचं दैनंदिन जीवन विस्कळीत होऊ लागलं. ह्या सर्व गंभीर घटनांमुळे फूल कुमारीने अजिबात संकोच न बाळगता आपल्या घरच्यांचं आणि स्वतःच आरोग्य सांभाळण्यासाठी व घरात शौचालय बांधण्यासाठी आपलं सौभाग्याचं वाण असलेलं मंगळसूत्र गहाण टाकले.

आपल्या घरच्यांच्या विरोधाला भांडून तिने हे कार्य हाती घेतलं व आपल्या राहत्या घरात एक शौचालय बांधून घेतलं.

खरंच! घरात शौचालय बांधण्यासाठी आपल्या कुटुंबाकडून विरोध व्हावा हे खूप खेदजनक आहे!

फूल कुमारीची हि कणखर भूमिका पाहून रोहतास जिल्हा प्रशासनाने तिला सार्वजनिक स्वच्छता अभियानाचे मुख्य प्रतिनिधी (brand ambassador) बनवले.

फुल कुमारी सारख्याच अनेक महिला वेगवेगळ्या राज्यात कार्यरत होत्या. 
१६ ऑगस्ट, २०१४ रोजी उत्तर प्रदेशातील, ख़ुशी नगर जिल्ह्यात शौचालयाच्या अभावामुळे ६ हिंदू व मुस्लिम महिलांनी मिळून आपल्या सासरच्या माणसांच्या विरुध्द बंड पुकारले. ह्या महिलांनी पुढचे पाऊल उचलत, शौचालय घरात बांधल्या खेरीज आपण सासरी येणार नाही अशी कणखर भूमिका घेतली. ह्या मागणीसाठी घरच्यांचा निषेध करत नीलम शर्मा, सकीना, सीता, नजरुम निसा, आणि कलावती ह्या महिलांनी आपापले सासरचे घर सोडले.

सामाजिक समस्यांवर व सार्वजनिक स्वच्छतेवर कार्यरत असणाऱ्या सुलभ इंटरनॅशनल ह्या संस्थेने या महिलांच्या धाडसाला पाठिंबा देत त्यांना शौचालय बांधून दिले.

२०१२ मध्ये, उत्तर प्रदेशातील, महाराजगंज जिल्ह्यातील २१ वर्षीय प्रियांका भारतीने असेच साहस दाखवत, पण नम्रतेने आपल्या सासरच्यांकडून होणार अपमान सहन करतच प्रतिज्ञा केली कि घरात शौचालय बांधल्याखेरीज ती सासरी परत येणार नाही. हे सर्व करताना ती पूर्वापार चालत आलेल्या नियमांना आव्हान देत होती आणि एक नवा आदर्श बाकी महिलांसमोर उभा करत होती.

ह्या तिच्या अमूल्य हिम्मत आणि निर्धारासाठी सुलभ इंटरनॅशनल संस्थेने तिला २ लाख रुपयांचं बक्षीस देऊन पुरस्कृत केले व तिच्या सासरी एक शौचालय बांधून दिले.

कठीण परिस्थितून मार्ग काढून, कोणाच्याही विरोधाला न जुमानता बेधडकपणे सत्याच्या मार्गावरून चालून आपले ध्येय साध्य करणाऱ्या या क्रांती विरांगनांना आमच्या भारतीयनस् टिमचा मानाचा मुजरा!!!

#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his ‘Mission 2020’ .

 

 

 

 

मिलिंद वेर्लेकर

टीम भारतीयन्स

बातमी सौजन्य