Bhartiyans

Menu

उत्तम शिक्षकांचं वरदान मिळालेलं गाव

Date : 11 Nov 2016

Total View : 390

सेवाभावी शिक्षक आणि त्यांनीच उभारलेली शिक्षण संस्था. येथील लोकांच्या दृष्टीने शिक्षादान हे एक उद्दात्त सामाजिक कार्य आहे आणि तरुणवर्ग शिक्षक होण्यासाठी काही काळ थांबायला सुद्धा तयार असतात, असं हे अनोख


सारांश

सेवाभावी शिक्षक आणि त्यांनीच उभारलेली शिक्षण संस्था. येथील लोकांच्या दृष्टीने शिक्षादान हे एक उद्दात्त सामाजिक कार्य आहे आणि तरुणवर्ग शिक्षक होण्यासाठी काही काळ थांबायला सुद्धा तयार असतात, असं हे अनोखं गाव आणि त्यातील सेवाभावी लोक.सविस्तर बातमी

आपल्या वैदिक ग्रंथांमध्ये विद्यादान हे सर्वश्रेष्ठ दान सांगितले आहे. ह्या वाचनाचा खरा अर्थ जगणारं इंचाल गाव आणि त्यातील रहिवास्यांची शिक्षणावर असलेली श्रद्धा बघून थक्क व्हायला होत. ह्या गावातील रहिवास्यांना भारतीयनस् संघाकडून विनम्र अभिवादन!!

तालुक्यापासून ४१ किमी दूर असलेलं निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या इंचाल गावात, ज्याची लोकसंख्या साधारण ६००० आहे, त्या गावात ६०० हुन अधिक सुजाण नागरिकांनी शिक्षकी पेशा निवडला आहे. कर्नाटकातील वेगवेगळ्या गावांमध्ये हे शिक्षक कार्यरत आहेत. त्यांतील बरेचसे शिक्षक सरकारी अनुदानावर चालणाऱ्या शाळांमध्ये शिकवतात आणि काही खाजगी शाळांमध्ये विद्यादान करतात. आश्चर्य म्हणजे काही तरुणांना शिक्षकी प्रशिक्षण घेतल्या नंतर शिक्षक बनण्यासाठी वाटही पाहावी लागते, पण ते योग्य संधी मिळेपर्यंत थांबायला तयारही असतात.

इंचाल मधील लोकांच्या दृष्टीने शिक्षादान हे एक उद्दात्त सामाजिक कार्य आहे. शब्बीर मीराजन्नावर ह्याच्या कुटुंबात सर्वात जास्त म्हणजे १३ शिक्षक आहेत. ते स्वतः बैलहोंगळ तालुक्याचे \\"कर्नाटक स्टेट प्रायमरी टीचर अससोसिएशन\\" चे सचिव आहेत. सरासरी बघायला गेलं तर, प्रत्येक घरात ५ तरी शिक्षक आहेत.

सवदत्ती ब्लॉक एडुकेशन ऑफिसर असलेले एस. एल. भजंत्री म्हणतात कि, \\"इंचल गावातील बहुतांशी लोकांनी शिक्षकी पेशा स्वीकारला आहे. आणि शेती हा त्यांचा दुसरा पर्यायी व्यवसाय आहे.\\"

इंचाल गावकरी ह्या कार्याचं सर्व श्रेय शिवानंद भारती स्वामीजींना देतात!!

१९७० मध्ये इंचाल गावात फक्त ८ शिक्षक आणि १ प्रार्थमिक शिक्षक होते. ज्या विध्यार्थ्यांना पुढील वर्गातील शिक्षण घ्यावे वाटायचे त्यांना बरेच किलोमीटर पायपीट करत बैलहोंगळ तालुक्यात जावं लागे. शैक्षणिक संस्थाच्या उणीवेमुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना शिक्षणातून आयुष्य उभारण्याच्या संधीला मुकावं लागलं आणि खासकरून मुलींना शिक्षणापासून वंचित राहावं लागत होत.

ह्या भीषण समस्येचा भविष्यातील परिणाम ओळखून शिवानंद भारती स्वामीजींनी बाहेर गावांतील काही सेवाभावी शिक्षकांना हाताशी धरून गावामध्ये एक शिक्षण संस्था प्रस्थापित केली आणि उच्च शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली.

१९८४ साली रूरल टीचर्स ट्रैनिंग सेन्टर सुरु करण्यात आले. हि संस्था गावातील मुलांना मोफत शिक्षण देऊ लागली. ह्या नंतर प्रसाद निलायम उभारण्यात आले, जिथे ह्या विद्यार्थ्यांना मोफत अन्न वाढले जायचे. ह्या द्रष्ट्याच्या प्रयत्नांना लवकरच यश मिळाले, गावाचा साक्षरता प्रमाण वाढू लागलं, आणि जास्तीतजास्त विद्यार्थी शिक्षकी प्रशिक्षण घेऊ लागले. लवकरच ह्या गावाचा शिक्षकी व्यवसायात उच्चांक वाढू लागला.

आज इंचाल गावामध्ये, एक प्रार्थमिक आणि माध्यमिक विद्यालय आहे, एक कनिष्ठ महाविद्यालय, एक पदवी महाविद्यालय आहे ज्यात कला, वाणिज्य, आणि विज्ञान ह्या शाखा आहेत. एक संस्कृत विद्यालय आणि BAMS (Bachelor of Ayurvedic Medicine and Surgery) सुद्धा आहे.

#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his ‘Mission 2020’ .

 

 

 

 

मिलिंद वेर्लेकर

टीम भारतीयन्स

बातमी सौजन्य