Bhartiyans

Menu

गुजरातचे 'सुपर २००' देत आहे दलित मुलांना शासकीय नोकरयांसाठी प्रशिक्षण

Date : 11 Nov 2016

Total View : 378

गुजरात मधील ७ तरुणांनी मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण वर्ग सुरु केले आहेत


सारांश

गुजरात चे सुपर २०० दलित मुलांना शासकीय नोकर्यांसाठी प्रशिक्षण देत आहेत.अहमदाबाद येथील ढोलका येथे हा उपक्रम चालवला जातो. त्यासाठी सात दलित तरुण एकत्र आले आहेत आणि त्यांनी मागासवर्गीय विद्यार्थांसाठी प्रशिक्षण वर्ग सुरु केले आहेत. या सात तरुणांच्या प्रेरणादायी उपक्रमाची माहिती घेऊया.सविस्तर बातमी

तुम्ही खूप हुशार आहात का ?
तुम्ही मनापासून शिकवू शकता का ?
कुठल्याही मोबदल्याशिवाय केवळ सामाजिक जबाबदारी म्हणून तुम्ही समाजातल्या गरजू आणि गरीब विद्यार्थ्यांना मदत करू इच्छिता का ?
होय भारतातला तरुण वर्ग आता मोठ्या प्रमाणात सामाजीक उपक्रमांमध्ये भाग घेत आहे आणि हे सत्य आहे....
#Bharatiyans

बिहारच्या जगप्रसिद्ध आनंद कुमारचा आदर्श समोर ठेवून, गुजरातचे \\'सुपर २००\\' आता देत आहे दलित मुलांना शासकीय नोकरयांसाठी प्रशिक्षण.

बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हां १९५६ मधे अहमदाबाद जवळील ढोलका येथिल मिठीकुयी खेड्याला भेट दिली, तेव्हां त्यांनी पाहिलें की दलित मुलांना शाळेत प्रवेश दिला जात नव्हता.

त्यांना या गोष्टीचं खूपच दुःख झालं आणि हा जातीभेद संपविण्यासाठी त्यांनी फक्त दलित मुलांसाठी म्हणून एक शैक्षणिक संस्था स्थानिक लोकांना स्थापन करायला लावली आणि अश्या रीतीने सिद्धार्थ वसतीगृहाची स्थापना झाली.

त्यानंतर चार दशकांनी या जागी एक नवीन क्रांती झाली आहे.

त्यासाठी सात दलित तरुण आता एकत्र आले आहेत आणि त्यांनी मागासवर्गीय विद्यार्थांसाठी प्रशिक्षण वर्ग सुरु केले आहेत.

या वर्गांच्या मदतीने ही मुले स्पर्धात्मक परीक्षा उत्तीर्ण होऊन आता नक्कीच शासकीय नोकरया मिळवु शकतील.

गेल्या ४ महिन्यांमधे जवळपास २०० दलित मुले(यातील बरीच मुले पदवीधर आणि काही १२ वी पास आहेत) या मार्गदर्शनाचा उपयोग करुन घेऊन काँस्टेबल्स, पोलिस इंस्पेक्टर ,क्लार्ल्कस आणि शिक्षक या पदांसांठीच्या परीक्षांची जोमाने तयारी करत आहेत.

प्रशिक्षण वर्ग घेणाऱ्या सात तरुणांपैकी सागर जडेजा, ब्रिजेश सोनारा, नविनचंद्र टी चौहान , भारत झाला आणि दिपक सोनारा हे सर्व तरुण शासकीय नोकरी करत आहेत. हितेश गोहील वकील आहे तर हितेश जाधव पोलिस इंस्पेक्टर आहे.

हे सात तरुण आवश्यक तितकाच निधी समाजाकडुन गोळा करुन \\" स्पर्धात्मक परीक्षा अभ्यासक्रम वर्तुळ\\" (SPAV) यशस्वीपणे चालवत आहेत हे विशेष.

प्राथमिक शिक्षक असलेला सागर जडेजा म्हणतो ,\\"ही प्रेरणा त्यांना बिहार येथील \\' सुपर ३०\\' कडुन मिळाली. जिथे गरीब मुलांना I IT साठी विनामुल्य प्रशिक्षण दिले जाते. हेच रोल मॉडेल आम्ही डोळ्यांसमोर ठेवले आणि आता आमच्या \\'सुपर २००\\' चं उद्दिष्ट आहे की समाजातल्या गरीब आणि दलित मुलांना शासकीय नोकरी मिळवण्यासाठी मदत करणे.\\"

या प्रशिक्षण वर्गामधे हजारों दलितांनी शपथ घेतली की ते यापुढे मेलेल्या प्राण्यांची विल्हेवाट लावणे आणि अशा प्रकारची इतर अमानुष कामे करणार नाहीत. \\"यामुळे दलितांना समाजात बरोबरीचे स्थान मिळण्यास मदत होईल \\", असे वकील हितेश गोहील म्हणाले.

या संस्थेमधे विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परिक्षेसाठी मार्गदर्शन तसेच शारीरिक क्षमता वाढविण्यासाठी व्यायाम व मुलाखतीची तयारी करुन घेतली जाते.

सुरेंद्रनगरमधील हलवाड येथील धिरु परमार हा विद्यार्थी पोलिस सबइंस्पेक्टरच्या पदासाठी तयारी करत आहे. रोजंदारीवर काम करणारया माणसाचा हा मुलगा म्हणतो की जर माझ्यासारखे गरीब पार्श्वभूमीचे लोक पोलिस दलात आणि इतर शासकीय नोकरयांमधे सामील झाले तर ते त्यांच्यावरील अत्याचाराच्या विरुद्ध आवाज उठवु शकतील.


**टीम भारतीयन्स**
 

#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his ‘Mission 2020’ .