Bhartiyans

Menu

खूब लडी़ मर्दानी वह तो...........झांसी वाली रानी थी ।

Date : 11 Nov 2016

Total View : 376

हरयाणा येथे पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलींना सोडवण्यासाठी बंगालच्या २ रणरागिणीनी जीवाची बाजी लावली.


सारांश

अवैध मानवी व्यापाराच्या विरोधात बंगाल च्या २ महिला पोलिसांनी हरयाणा येथील संतप्त जमावाशी सामना केला. इथल्या मुलांशी लग्न करण्यासाठी बाहेरील राज्यांमधुन मुली पळवून आणल्या होत्या. हावडा येथिल सांकरेल पोलिस स्टेशनच्या सब इंस्पेक्टर पियाली घोष आणि काॅंन्स्टेबल मधुमिता दास यांनी हे दिव्य पार पाडले.बंगालसविस्तर बातमी

खूब लडी़ मर्दानी वह तो...........झांसी वाली रानी थी ।
२ महिला पोलिसांनी अवैधरीत्या होणारया महिला व्यापाराच्या विरोधात असाच शौर्यपूर्ण लढा दिला.
बंगालच्या २ महिला पोलिसांना, अवैधरीत्या पळवुन नेलेल्या अल्पवयीन मुलींना सोडवण्यासाठी, हरयाणा येथिल ६०० लोकांच्या संतप्त जमावाशी एकहाती सामना करावा लागला जो त्यांनी केला आणि शेवटी जीवाची बाजी लावत त्या मुलींना सोडवले.
#Bharatiyans

या जमावाला पांगविण्यासाठी हरयाणा पोलिसांना शेवटीं हवेत गोळीबार करावा लागला. परंतु या प्रक्षुब्ध जमावाशी मुकाबला करुन बंगालच्या या रणरागिणींनी ३ अल्पवयीन मुलींची सुटका केलीच.

या तिन्ही मुली इतर राज्यांमधुन, इथल्या मुलांशी लग्न करण्यासाठी, हरयाणात पळवुन आणलेल्या होत्या. 
आजवरच्या लोकसंख्या गणनेनुसार हरयाणा येथे स्त्री -पुरुष गुणोत्तर १००० पुरुषांमागे केवळ ८८७ स्त्रिया असे आहे.

हावडा येथिल सांकरेल पोलिस स्टेशनच्या सब इंस्पेक्टर पियाली घोष आणि काॅंन्स्टेबल मधुमिता दास यांनी हे दिव्य पार पाडले.

TOI शी बोलताना घोष म्हणाल्या,\\\\\\\\"या तिन्ही मुलींची सुटका करुन आम्ही आमचं कर्तव्य बजावलं. महिलांच्या अवैध व्यापाराच्या विरोधात काम करणारया \\\\\\\\'शक्ती वाहिनी \\\\\\\\' या NGO ची आम्हाला खूप मदत झाली. हरयाणा मधे आम्ही टाकलेल्या छाप्यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी पाठींबा दिला परंतु हरयाणा पोलिसांची फारशी मदत आम्हाला लाभली नाही .हा आमचा हरयाणा मधला पहिलाच छापा होता आणि इथे यशस्वी होण्यासाठी संपूर्ण तयारीनिशी येणे गरजेचे आहे, हे आम्हाला कळले.\\\\\\\\"

घोष ,दास आणि २ पुरुष काॅन्स्टेबल्स संशयितांचा पाठलाग करत बंगाल मधुन निघाले. २० आॅगस्ट रोजी हावडा येथे त्यांनी मेहफिजा नामक संशयित महिलेला अटक केली होती. तिच्याकडुन ही भयानक बातमी मिळाली की तिने सांकरेल इथल्या एका १५ वर्षीय बालिकेला हरयाणातल्या एका मागास खेड्यात एकाच वेळीं १० पुरुषांशी लग्न करण्यासाठी विकले होते.

जेव्हां या बहादुर महिला पोलिस तिथे पोहचल्या तेव्हां ६०० खेडुतांचा प्रक्षुब्ध जमाव त्यांना प्रतिकार करण्यासाठी तिथे जमला होता. त्यांचा आरोप होता की पोलिस त्यांच्या बायकांना पळवुन नेण्यासाठी आले आहेत.

सर्व संकटांवर मात करुन घोष आणि दास यांनी हरयाणा मधिल पालवाल आणि उत्तर प्रदेश मधल्या कमरगाव इथल्या अवैध मानव व्यापार करणारया ९ गुन्हेगारांना अटक केली आणि ३ अल्पवयीन मुलींना बंगालला नेऊन सुखरुपपणे त्यांच्या कुटुंबांच्या हवाली केले.

या भयाण परिस्थितीला जबाबदार कोण?

स्त्री-भृण-हत्या ही समाजाला लागलेली कीड़ आहे. तिचा वेळीच नायनाट केला नाही तर संपूर्ण देशात अराजक माजायला वेळ लागणार नाही.

मुलगा वंशाचा दिवा असेल तर,
मुलगी वंशाची \\\\\\\\'अत्यावश्यक\\\\\\\\' अशी पणती आहे....नक्कीच आहे.


** Team Bharatiyans **

#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his ‘Mission 2020’ .

 

 

सुमेधा देशपांडे

टीम भारतीयन्स