Bhartiyans

Menu

भारतीय सैन्यदलाला पाठबळ देणाऱ्या श्री. अजित डोवाल यांसारख्या देशभक्त, कर्तुत्ववान आणि हुशार अधिकाऱ्यांला सलाम!

Date : 11 Nov 2016

Total View : 122

उरी मध्ये पाकिस्तान-पुरस्कृत दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्यामुळे संयमाचा बांध फुटून, आपली पॉलिसी बदलून, भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये धाडसी कारवाई करून, आपल्या १८ जवानांच्या बदल्यात ३८ द


सारांश

७० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच, वेळोवेळी राजकीय शक्तींनी हात बांधून ठेवल्याने प्रत्युत्तर न दिलेल्या, भारतीय लष्कराच्या सैनिकी डावपेचांमध्ये संयमाचा, ‘लाईन ऑफ कंट्रोल’ पार न करण्याचा, अघोषित ट्रेंड सरळसरळ बदलला गेला आहे. यासाठी अत्यावश्यक असणारे राजकीय इच्छाशक्तीचे पाठबळ हे यासाठीचे प्रमुख कारण.सविस्तर बातमी

 

२९ सप्टेंबर रोजी पाकव्याप्त काश्मीर मध्ये घुसून दहशतवाद्यांचा खातमा केल्यावर सर्वच चॅनेल्सवर जेव्हढे म्हणून भारतीय सैन्यदलांतले लष्करी अधिकारी चर्चेला यायचे त्यांच्या चेहऱ्यावरचे दिसलेले विलक्षण समाधानाचे भाव आपण विसरू शकतो का?

 

उरी मध्ये पाकिस्तान-पुरस्कृत दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्यामुळे संयमाचा बांध फुटून, आजपावेतोची आपली पॉलिसी बदलून, भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये धाडसी कारवाई करून, आपल्या १८ जवानांच्या बदल्यात दुप्पटीहून जास्त म्हणजेच ३८ दहशतवादी शब्दश: ठेचून काढले.

 

७० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच, पाकिस्तानला चिरडण्याची नित्यनेमाची परंपरा असणाऱ्या, परंतु वेळोवेळी राजकीय शक्तींनी हात बांधून ठेवल्याने प्रत्युत्तर न दिलेल्या, भारतीय लष्कराच्या सैनिकी डावपेचांमध्ये संयमाचा मानला गेलेला ‘लाईन ऑफ कंट्रोल’ पार न करण्याचा अघोषित ट्रेंड सरळसरळ बदलला गेला आहे हे यावेळी सर्व जगणे उघड्या डोळ्यांनी अनुभवले.

 

यासाठी अत्यावश्यक असणारे राजकीय इच्छाशक्तीचे पाठबळ हे यासाठीचे प्रमुख कारण.

 

परंतु, भारतीय सैन्यदलांच्या बदललेल्या या भूमिकेची पहिली यशस्वी झलक मात्र ७ ऑक्टोबर २०१४ रोजीच पाहायला मिळाली जेव्हा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) श्री अजित डोवाल यांनी सीमा सुरक्षा दलाच्या प्रमुखांना बोलावून त्यांना पूर्ण ताकतीने पाकिस्तानच्या छोट्याश्या सुद्धा आगळीकीला ठोकून प्रत्युत्तर देण्यास सांगितले आणि यासाठी जे काही आवश्यक आहे ते ते सर्व करण्याची मुभा दिली.

 

यावेळी पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन झाल्यास पाकिस्तानी रेंजर्सवर \\'पाहिजे तेव्हा आणि पाहिजे तेव्हढे\\' फायरिंग करण्याचे आणि यासोबतच पाकिस्तानच्या दहशतवाद्यांना सहाय्य करणाऱ्या सर्वच गोष्टी पूर्णपणे ध्वस्त करण्याचे स्पष्ट आणि स्वच्छ मुक्ताधिकार BSF उच्चाधिकार्यांना डोवाल यांनी दिले होते.

 

\\"त्यांनी फायर केलेल्या एका गोळीचा जवाब तुम्ही दोन गोळ्या झाडून द्या.\\" असे थेट निर्देश डोवाल यांनी यावेळी दिल्याचे TOIच्या सूत्रांनी नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले.
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी अश्यावेळी आंतरराष्ट्रीय परीभाषेनुसार आवश्यक असलेल्या \\'फ्लॅग-मिटिंग्ज\\'सुद्धा न घेण्याविषयीची स्पष्ट मोकळीक BSFला दिली.

 

डोवाल यांचे \\'ऑफेंसिव्ह डिफेन्स\\'चे हे धोरण लवकरच यशस्वी परिणाम दाखवायला लागले.

 

यानंतर जेव्हा जेव्हा पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन होई तेव्हा तेव्हा भारतीय लष्कर दुप्पट ताकतीने आग ओकायला सुरुवात करी आणि मग मात्र लगेचच भीषण नुकसान झालेले पाकिस्तानी सैनिक युद्धविरामाचे झेंडे फडकवताना आढळून येत.

 

आता पाकिस्तान जेव्हा जेव्हा सीमेवर गोळीबार आणि तोफगोळे टाकायला सुरुवात करी तेव्हा तेव्हा, २०१४ साली मोदींच्या हाती भारत आल्यावर, भारतीय लष्कराने घेतलेला हा आक्रमक पवित्रा प्रकर्षाने आढळून यायला लागला.

 

गेल्या ऑक्टोबर मध्ये त्यांच्या पंजाब प्रांतातल्या पाकिस्तानी रेन्जर्सचा उच्च्चाधीकारी मेजर जनरल उमर फारुख बुर्की जेव्हा दिल्लीत BSF उच्च्चाधीकार्यान्सोबत चर्चा करायला आला होता तेव्हा पाकिस्तानी सैन्याने असेच हेवी फायरिंग सीमेवर सुरु केले होते.

 

डोवाल आणि गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी त्यावेळी सुद्धा BSFला, बेझीजक, \\'समर्पक\\' उत्तर देण्याचे सर्वाधिकार दिले होते.

 

यावेळी BSFचा प्रत्याघात इतका भीषण होता की पाकिस्तानी रेन्जर्सच्या बुर्की\\'ला घाईघाईने BSF प्रमुख श्री. डी के पाठक यांना हॉटलाईनवर कॉल करून BSFचा हा प्रतिहल्ला थांबवण्याची विनंती करावी लागली होती कारण BSFच्या या हल्ल्यांत २६ पाकिस्तानी नागरीकसुद्धा ठार झाले होते.

 

गेल्या वर्षी जून मध्ये भारतीय लष्करावर केल्या गेलेल्या गोळीबारानंतर National Socialist Council of Nagaland NSCN(K) च्या म्यानमार मधल्या कॅम्पसवर सर्जिकल स्ट्राईक करण्याची योजना ही सुद्धा ‘अथ पासून इथी’पर्यंत डोवाल यांनी आखली होती आणि पूर्णत्वास सुद्धा नेली होती.

 

गेल्या दोन वर्षांपासून भारताच्या या बदललेल्या आक्रमक धोरणामुळे भारतीय सैन्यदलांमध्ये कमालीचे चैतन्य संचारले आहे. आणि यामुळेच जर पाकिस्तानने त्यांचे छुपे युद्ध थांबवले नाही तर \\"रक्तपात सुरूच राहील...आणि भिषणतेने सुरु राहील\\" असे अनेकानेक स्पष्ट संकेत इस्लामाबादला सुद्धा थेट मिळाले आहेत.

 

\\"भारतीय जवानांनी कसे आणि किती कडवे प्र्यतुत्तर द्यावे हे आता पाकिस्तानने केलेल्या आगळीकीवर, भारतीय राजकीय पुढाऱ्यांच्या कुठल्याही वक्तव्यांवर ठरत नाही आणि यामुळेच BSF आणि भारतीय लष्कर आता पाकिस्तानने केलेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनानंतर हातावर हात घेऊन गप्प बसवले जात नाहीत. या सर्वांनाच आग ओकणारा प्रत्याघात करा असे स्पष्टपणे सांगितले गेले आहे. भारतीय सैन्यदलांसाठी हा प्रचंड मोठा मानसिकरीत्या आश्वासक असा बदल आहे.\\" असे लष्करी अधिकारी आता आनंदाने सांगतात.

 

गुरुवारी , यशस्वी सर्जिकल स्ट्राईक करून भारतीय कमांडोज आपल्या बेसवर परतल्यावर, राजौरी आणि बारामुल्ला भागांत पाकिस्तानी सैन्याने BSFच्या पोस्ट्स वर फ्रस्ट्रेशन मुळे फायरिंग सुरु केली ज्याला आत्मविश्वास अजूनच बळावलेल्या BSFने नेहेमी प्रमाणेच चोख प्रत्युत्तर दिले.

 

BSF सध्या जम्मू पासून गुजरात पर्यंत सर्वोच्च \\"operational alert\\" वर आहे.

 

BSFच्या कमांडींग ऑफिसर्स, डेप्युटी आणि इतर जेष्ठ अधिकाऱ्यांना त्यांच्या त्यांच्या अखत्यारीत येणाऱ्या सीमेवरची प्रत्यक्ष दक्ष-गस्त वाढवण्याचे आणि पाकिस्तानच्या कुठल्याही आगळीकीचे दुप्पट ताकतीने उत्तर देण्याचे स्पष्ट निर्देश दिले गेले आहेत.

 

भारताने यशस्वीपणे पार पाडलेल्या सर्जिकल स्ट्राईक मुळे जगभारत नाक ठेचला गेलेला पाकिस्तान विमनस्क अवस्थेत भारतावर हल्ला करू शकतो म्हणून डोवाल यांच्या निर्देशांवरून, पंजाब आणि जम्मू विभागातल्या सीमेवरच्या गावातले नागरिकांचे विस्थापन व्यवस्थित आणि सुरळीत व्हावे यासाठी, आत्मविश्वास उंचावलेली संपूर्ण BSF आता पूर्ण ताकतीने कंबर कसून कामाला उतरली आहे.

 

“”भारतीय सैन्यदलांचा, शत्रूला \\'पळता भुई थोडी करेल\\' असे अचाट कर्तुत्व दाखवण्याचे सामर्थ्य मनगटात असणाऱ्या भारतीय सैन्यदलांच्या मागे हिमालयाप्रमाणे उभ्या राहणाऱ्या आणि यासाठी संपूर्ण जगाला पाकिस्तान विरोधात एकसंध उभ्या करणाऱ्या भारतीय राजकीय शक्तीचा आणि श्री. अजित डोवाल यांसारख्या देशभक्त, कर्तुत्ववान आणि हुशार अधिकाऱ्यांचा \\'Team Bharatiyans\\'ला अभिमान वाटतो आहे.””

 

सव्वाशे कोटी भारतीयांसोबत \\'Team Bharatiyans\\' तुम्हा सर्वांना सन्मानाने दंडवत घालते आहे.

 

!! वंदे मातरम...भारत माता की जय....जय हिंद !!

#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his ‘Mission 2020’ .

 

 

मिलिंद वेर्लेकर

टीम भारतीयन्स

बातमी सौजन्य