Bhartiyans

Menu

दिवाळीमध्ये, न्यूयॉर्कमधल्या संयुक्त राष्ट्रसंघाची लाखो दिव्यांनी उजळवली गेलेली इमारत पहाण्यासाठी विलक्षण गर्दी झाली होती.

Date : 11 Nov 2016

Total View : 150

२९ डिसेंबर २०१४ रोजी झालेल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या ६९ व्या सेशन मध्ये दिवाळी या भारतीय सणाला विशेष मान्यता दिली गेली आणि दिवाळीचा हा दिवस ‘नॉन-मिटिंग-डे’ म्हणून जाहीर करण्यात आला होता.


सारांश

दिवाळी म्हणजे चांगल्याचा वाईटावर मिळवलेला विजय आहे, संयुक्त राष्ट्रसंघ हा जागतिक चांगुलपणाचा राजदूत आहे आणि म्हणूनच संयुक्त राष्ट्रसंघाने हा निर्णय घेतला आहे, असे संयुक्त राष्ट्रसंघाच्या पत्रकामध्ये म्हणण्यात आले आहे. या इमारतीचा काही भाग गेल्या जून महिन्यात भारताने चालवलेल्या अभियानासाठी जागतिक योगसविस्तर बातमी

 

संयुक्त राष्ट्रसंघाचे न्यूयॉर्क इथले हेडक्वॉर्टर शनिवारी संध्याकाळी दिवाळीच्या पहिल्या दिवसाच्या निमित्ताने उजळत्या दिव्यांच्या लखलखाटाने उजळवले गेले होते.

 

संयुक्त राष्ट्रसंघाच्या इतिहासामध्ये संयुक्त राष्ट्रसंघ (युनो) पहिल्यांदाच जगातल्या एखाद्या राष्ट्राचा एखादा महत्वाचा मोठा सण आज साजरा करतो आहे.

 

संयुक्त राष्ट्रसंघाच्या या जागतिक मुख्यालयाची ही पूर्ण इमारत इथून पुढे तिन्ही दिवशी संध्याकाळी ‘तेवणारी पणती आणि हॅपी दिवाली’ या संदेशाने उजळून निघणार आहे.

 

२९ डिसेंबर २०१४ रोजी झालेल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या ६९ व्या सेशन मध्ये एका ठरावान्वये दिवाळी या भारतीय सणाला विशेष मान्यता दिली गेली होती आणि दिवाळीचा हा दिवस ‘नॉन-मिटिंग-डे’ म्हणून जाहीर करण्यात आला होता. 
२०१६ नंतर आता दिवाळी ही ऑप्शनल सुट्टी म्हणून जाहीर करण्यात आली आहे.

 

“दिवाळी म्हणजे चांगल्याचा वाईटावर मिळवलेला विजय आहे , संयुक्त राष्ट्रसंघ हा जागतिक चांगुलपणाचा राजदूत आहे आणि म्हणूनच संयुक्त राष्ट्रसंघाने हा निर्णय घेतला आहे असे संयुक्त राष्ट्रसंघाच्या पत्रकामध्ये म्हणण्यात आले आहे.

 

संयुक्त राष्ट्रसंघाच्या या इमारतीचा काही भाग गेल्या जून महिन्यात भारताने चालवलेल्या अभियानासाठी जागतिक योग दिनाच्या निमित्ताने उजळवण्यात आला होता.

 

याचसोबत अमेरिकेतली जागतिक दर्जाची एम्पायर स्टेट बिल्डींग ही सुद्धा गेल्या १५ ऑगस्टला तिरंग्याच्या रंगांच्या दिव्यांनी सजवण्यात आली होती.
पण या प्रकारे संयुक्त राष्ट्रसंघाची संपूर्ण इमारत एखाद्या देशाच्या इतक्या महत्वाच्या सणासाठी अश्याप्रकारे नटवण्याची गोष्ट मात्र जागतिक इतिहासात पहिल्यांदाच घडते आहे.

 

न्यूयॉर्कमधल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या या लाखो दिव्यांनी उजळवल्या गेलेल्या संपूर्ण इमारतीचे फोटोज क्लिक करण्यासाठी शेकडो भारतीयांनी , अमेरिकन नागरिकांनी आणि इतर देशाच्या रहिवाश्यांनी सुद्धा विलक्षण गर्दी केली होती.

 

“आम्हां सर्व भारतीयांसाठी हे असे पाहणे हा खरच एक फार मोठा सुखद आश्चर्याचा धक्का आहे आणि आम्हां अमेरिकास्थित भारतीयांसाठी हा फार मोठा अभिमानाचा देखील विषय आहे” संयुक्त राष्ट्रसंघाच्या इमारती सोबत सेल्फी क्लीकणाऱ्या एका भारतीयाने असे भावूक उद्गार या प्रसंगी काढले.

#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his ‘Mission 2020’ .

 

 

मिलिंद वेर्लेकर

टीम भारतीयन्स

बातमी सौजन्य