Bhartiyans

Menu

केशकर्तनकार-व्यवसाय स्वीकारनाऱ्या शांताबाई यादव

Date : 12 Nov 2016

Total View : 458

अचानक झालेल्या पती निधनानंतर पुरुषांची परंपरागत मक्तेदारी असलेला केशकर्तनकार-व्यवसाय हा पर्याय मोठ्या धीराने स्वीकारून, कष्टपूर्वक गेली चाळीस वर्षे स्वतःचे आणि आपल्या मुलींचेही आयुष्य सावरणाऱ्या शांता


सारांश

अचानक झालेल्या पती निधनानंतर पुरुषांची परंपरागत मक्तेदारी असलेला केशकर्तनकार-व्यवसाय हा पर्याय मोठ्या धीराने स्वीकारून, कष्टपूर्वक गेली चाळीस वर्षे स्वतःचे आणि आपल्या मुलींचेही आयुष्य सावरणाऱ्या शांताबाई यादवसविस्तर बातमी

कोल्हापूर जिल्ह्यातल्या शांताबाई यादव यांनी आपल्या स्वर्गवासी नवऱ्याचा केशकर्तनकार-कामाचा उपजीविकेचा उद्योग पत्करला आणि त्या भारतातल्या पहिल्या महिला केशकर्तनकार बनल्या.

पती-पश्चात चार मुलींचे कुटुंब पोसणे का मुलींसकट आत्महत्या करणे हा आयुष्याने शांताबाईंच्यापुढे एक निर्मम आणि कर्दनकाळी चालेंज फेकला आणि एक सर्वसामान्य परंपराप्रिय ग्रामीण स्त्री असणाऱ्या शांताबाई यांनी हे आव्हान नुसते स्वीकारलेच नव्हे तर यशस्वीपणे पेलले सुद्धा.

”माझ्या चार मुलींसकट आत्महत्या करणे किंवा माझ्या पतीने मागे ठेवलेला केशकर्तनकार-कामाचा वस्तरा हाती धरणे हे दोनच पर्याय माझ्या हाती होते. मी वस्तरा हाती धरला आणि स्वाभिमानाने जगण्याचे आव्हान स्वीकारले.” ७० वर्षीय शांताबाई सांगतात.
#Bharatiyans

सकाळपासून पुरुषमंडळी तिच्या घरासमोर अक्षरशः लाईन लावून उभी असतात.
स्वतःचा नंबर लागण्याची वाट बघत.

या सत्तर वर्षीय महिलेने आयुष्यात ज्या खस्ता खात अडचणींवर मात केली आहे त्या कहाण्या गडहिंग्लज मध्ये प्रसिद्ध आहेतच.

पण त्याहूनही शांताबाई यादवची यांची ख्याती आहे ती त्यांच्या व्यावसायिक कौशल्यासाठी.

गेली तीस वर्षं शांताबाई लोकप्रिय आहेत ते त्यांच्या वस्तऱ्याच्या करामतीसाठी!

बारा वर्षांच्या असतानान शांताबाइंचे लग्न झाले. तेव्हा त्यांचे पती श्रीपती हे केशकर्तनकार काम करून उपजीविका चालवायचे. शांताबाई ऐन तिशीत असतानाच १९८४ साली श्रीपती यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. पदरी चार मुली. तेव्हा त्यांची मोठी मुलगी आठ वर्षांची आणि सगळ्यात धाकटी मुलगी कशीबशी एक वर्षांची होती. त्यानंतर त्यांच्या तीन एकर जमिनीचा दिरांनी कबजा घेतला.

आता उदरनिर्वाहासाठी दिरांवर अवलंबून राहावे, मुलींसकट आयुष्य संपवावे का पतीचा मागे राहिलेला वस्तरा उचलून कष्ट करत स्वाभिमानाने आणि आत्मसन्मानाने जगावे? 
शांताबाईंना पहिले दोन्ही पर्याय नकोसे वाटले.

\"मला कुणाचाही भार होऊन जगायचे नव्हते \" होरससगिरी मधील घरात एका गिऱ्हाईकांची दाढी करता करता शांताबाई सांगतात.

\"मी शेतमजूरी ची कामं करू लागले . \"त्या काळी मला दिवसाचे फक्त पन्नास पैसे मिळत असत.

एवढ्या कमी कमाईत पांच जणांचे पोट कसे भरावे?

अजून काय करता येईल?\" अशा विवंचनेत त्या पडल्या. संध्याकाळी रिकामा वेळ असायचा.

असाच विचार करता करता एकदा त्यांना वाटले कि असलं रडत कुढत आयुष्य घालवण्यापेक्षा आपला पारंपारिक केशकर्तनकार व्यवसाय करून पाहावा.

\"पण वस्तरा चालवणं\' बहुधा माझ्या रक्तातच असाव\" गिऱ्हाईकावरून नजर हलू न देता शांताबाई सांगतात.

\"आणि परिस्थिती अशी खडतर होती कि मला या कामात तरबेज व्हावेच लागले!\" त्या सांगतात.

हळूहळू शांताबाईंनी फारसा गाजावाजा न होईल अशा बेताने लोकांना आपल्या या सेवेबद्दल सांगायला सुरुवात केली.

आधीआधी त्या ओळखीच्या कुटुंबानाच फक्त आपली नाभिकसेवा उपलब्ध करून देत असत.

इतर केशकर्तनकारांच्या पेक्षा अर्ध्या दारात त्या हे काम करीत असत.

शेतावरून घरी आल्या कि वस्तर्याचे काम चालू.

पण , पुरुषांच्या कठोर जगात हे अजिबात सोपे नव्हते.

गावातले लोक त्यांना नावे ठेऊ लागले. त्यांची कधी आडून तर कधी समोर समोर चेष्टा, कुचाळकीकरू लागले. एका तरुण आणि त्यातही विधवा बाईने असे जगरहाटीहून कमालीचे वेगळे काम केले की बदनामी झालीच म्हणून समजावे.

पण शांताबाई अशा गोष्टीना बधणाऱ्यातल्या नव्हत्याच मुळी.

\"मला मला ताठ मानेनं जगायचं होतं , माझ्या मुलींना सुखात वाढवायचं होतं.\" त्या सांगतात.

एके दिवशी मात्रं या परिस्थितीला चांगलीच कलाटणी मिळाली.

गावातील एक सुप्रतिष्ठित गृहस्थ हरिभाऊ कडुकर यांनी गावाच्या चौकात शाताबाईंना बोलावले आणि त्यांना स्वतःची दाढी करावयाची विनंती केली.

दाढी करून होताच त्यांने सर्वाना जाहीरपणे दटावले \" या बाई स्वतःचा चरितार्थ चालवण्यासाठी हा व्यवसाय करीत आहेत. यापुढी कुणीही या महिलेबद्दल अफवा पसरवलेल्या मी खपवून घेणार नाही.\"

या प्रसंगानंतर आणि अशा जाहीर पाठिंब्यानंतर मात्र लोकांची बोलणारी तोंडे बंद झाली.

काही काळानंतर, १९८५ साली शांताबाईंनी शेतमजुरीचे काम पूर्णपणे थांबवले व त्या पूर्णवेळ नाभिक व्यवसाय करू लागल्या. तेव्हा एका वेळचे केस कापण्यासाठी शांताबाई १ रुपया घेत असत.

आपल्या लहान मुलींना शेजाऱ्यांकडे ठेवून शांताबाई आसपासच्या गावात रोज ४/५ किलोमीटर पायपीट करत फिरायच्या आणि गिऱ्हाईके मिळवत संध्याकाळी पैसे कमावून घरी परतायच्या.

आता त्यांची लोकप्रियताही चांगलीच वाढीला लागली होती.

गावातली पुरुष मंडळी तर नित्यनेमाने त्यांच्याकडेच दाढीसाठी येऊ लागली होती.

\"त्याकाळी फार थोडे लोक रोख पैसे देऊन काम करून घेत असत. बहुतांशी लोक हे माझ्या कामाचा मोबदला म्हणून मला अन्नधान्य देत.

एका वर्षाच्या कामासाठी मला प्रत्येक गिर्हाईक १० किलो धन्य देई . माझ्या मुलाबाळांच्या पोटाचा प्रश्न सुटत असे, त्यामुळे मलाही हा मोबदला चालायचा...

हळू हळू इतर गावातूनही मला कामं मिळायला लागली \" नवीन गिर्हाईकासाठी दाढीचं ब्लेड बदलता बदलता त्या सांगत होत्या.

कुणी नवीन गिर्हाईक आलं कि त्याला बसायला पाट द्यायचा, त्याच्या हातात आरसा द्यायचा आणि साबण-पाणी वगैरे दाढीची तयारी करायला लागायची हा त्यांचा कायमचा शिरस्ता असतो.

आता त्यांच्या कामाचा व्याप वाढलाय.

त्या नेहमीच्या व्यतिरिक्त इतरही कामाच्या जबाबदाऱ्या घेऊ लागल्या आहेत. उदाहरणार्थ, शेतावरील म्हशींची निगराणी करणे, वसतिगृहातील मुलांची हेअरकट करणे .\"म्हशींसाठी वेगळा ब्लेड असतो !\" \" त्यांचीही स्वच्छता ठेवावी लागते \" शांताबाई सांगतात.

आजकाल त्या हेअरकटसाठी ५० रुपये घेतात.

\"माझ्या या व्यवसायाने मला माझ्या मुलींची लग्नं करायला मदत झाली; आता मला नातवंडं आहेत. जावई घरी बोलावत असतात.\" त्या अभिमानाने सांगतात.

\" जो पर्यंत हातून काम होतंय तोपर्यंत कुणावर अवलंबून राहायची गरज नाही\" वस्तरा म्हणजे त्यांच्या स्वयंसिद्धतेच प्रतीकच जणू आहे.

गेल्या काही वर्षात त्यांच्या या आगळ्या वेगळ्य्या व्यवसायाबद्दल कीर्ती, पुरस्कार व काही सन्मान ही मिळाले .

त्यांच्या साध्याश्या कच्च्या घरात एक लोखंडी कॉट आणि एक TV एवढाच काय तो पसारा.

तिथे मिरवणारे हे पुरस्कार त्यांच्या स्वाभिमानाची ग्वाहीच जणू देत असतात.

कालौघात शांताबाइंनी कुणाचीही आर्थिक मदत न घेता आपल्या चारही मुलींची लग्न करून दिली आणि त्यांचे संसार छान मार्गी सुद्धा लावून दिले. आज त्या दहा नातवंडांच्या आजी आहेत.

त्यांच्या गिर्हाईकाची दाढी करून होता होताच मध्येच एक लहानगा त्याच्या आजोबांचा निरोप घेऊन शांताबाईंना बोलवायला तिथे येतो आणि तेव्हा शांताबाई एका प्लॅस्टिकच्या पिशवीत आपली न्हावीकामाची सामुग्री घेऊन लगबगीने निघतात.

\"आजकाल माझ्या वयामुळे मला बाहेरगावी गिर्हाईक शोधात बाहेर फिरता येत नाही आणि म्हणून मी गिर्हाईकांना घरबसल्या दाढी, हेअरकट वगैरे करून देते \" शांताबाई म्हणतात.
\"
माझ्या या केशकर्तनकार-कामाच्या पेशाने मला आणि माझ्या पोटच्या पोरींना जीवनदान दिले आणि आम्हाला सन्मानाने, ताठ मानेने जगायची संधी दिली. जोपर्यंत मी माझ्या डोळ्यांनी पाहू शकते आणि माझा हा वस्तरा माझ्या हातात नीट पकडून माझे काम करू शकते तो पर्यंत, जमल्यास अक्षरशः माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी माझे काम करणार आहे.” सत्तरीच्या शांताबाई मोठ्या अभिमानाने आणि ताठ्पणाने सांगतात.

अचानक झालेल्या पती निधनानंतर आयुष्याने आत्महत्या किंवा पुरुषांची परंपरागत मक्तेदारी असलेला केशकर्तनकार-व्यवसाय असे दोनच पर्याय समोर ठेवले असताना मोठ्या धीराने तो व्यवसाय स्वीकारून, कष्टपूर्वक गेली चाळीस वर्षे स्वतःचे आयुष्य सावरणाऱ्या आणि आपल्या मुलींचेही आयुष्य उभारून देणाऱ्या शांताबाई यादव यांचा आम्हा ‘टीम भारतीयन्स’ना अभिमान वाटतो आहे.

शांताबाई यादव या एका अती-सामान्य भारतीय स्त्रीच्या या असामान्य कर्तुत्ववान लढाईस आणि त्यांनी आयुष्याशी दिलेल्या खडतर आणि यशस्वी टक्करीस ‘टीम भारतीयन्स’चा मानाचा मुजरा.

#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his ‘Mission 2020’ .

 

डॉ. स्मिता घैसास

टीम भारतीयन्स

बातमी सौजन्य

द गोल्डन स्परो