Bhartiyans

Menu

कर्नाटकातील शिमोगा येथील संपूर्णपणे संस्कृत बोलणारं मत्तुर गाव

Date : 12 Nov 2016

Total View : 459

कर्नाटकातील शिमोगा येथील मत्तूर शाळेसमोरील सरस्वतीची भव्य मूर्ती आणि संस्कृत भाषेतील फलक ही या गावाची ओळख म्हणावी लागेल!


सारांश

कर्नाटकातील शिमोगा येथील संपूर्णपणे संस्कृत बोलणाऱ्या मत्तुर गावातल्या कुठल्याही घरात प्रवेश करा आणि तुमचे मितभाषी मृदू स्वागत होईल या वाक्यांनीच.. विशेष म्हणजे इथल्या प्रत्येक कुटुंबात किमान एक तरी IT व्यावसायिक आहेच आहे. सविस्तर बातमी

”भवत: नाम किम?”(आपले नाव काय?) ,”कथम् अस्ति?”(आपण कसे आहात?), “कॉफी वा चायं, किम इच्छति भवान?”( काय घेणार-चहा का कॉफी?)
कर्नाटकातील शिमोगा येथील संपूर्णपणे संस्कृत बोलणाऱ्या मत्तुर गावातल्या कुठल्याही घरात प्रवेश करा आणि तुमचे मितभाषी मृदू स्वागत होईल या वाक्यांनीच.... 
विशेष म्हणजे इथल्या प्रत्येक कुटुंबात किमान एक तरी IT व्यावसायिक आहेच आहे. 
#Bharatiyans
कर्नाटकातील शिमोगा येथील मत्तूर शाळेसमोरील सरस्वतीची भव्य मूर्ती आणि संस्कृत भाषेतील फलक ही या गावाची ओळख म्हणावी लागेल!

हिरवीगार शेते , साधीशीच पण टुमदार काँक्रीटची दाटीवाटीने वसलेली घरे , आणि सुपारी पोफळीच्या बागांनी नटलेल्या या गावात वयाच्या दहाव्या वर्षापासूनच मुलांना संस्कृत भाषेचे शिक्षण देण्यात येते.

काहीसे अलिप्तपणे आयुष्य जगणारे संकेती समुदायातील लोक सुमारे ६०० वर्षांपूर्वी केरळमधून येथे स्थायिक झाले.

त्यांची जीवनशैली मुख्यतः संस्कृत भाषेभोवतीच केंद्रित आहे .

\"अहं गच्छामि” सारखी अनेक वाक्ये आणि इतर संस्कृत शब्दप्रयोग इथे जीन्स व टी शर्ट्स घालून मोबाईल फोनवर बोलणाऱ्या मुलांच्या संभाषणातून सर्रास ऐकू येतात .

संस्कृत सारखी प्राचीन भाषा बोलणारे हे अत्याधुनिक पेहेरावातील लोक म्हणजे आपली प्राचीन परंपरा आणि आधुनिक जीवनशैलीचा सुंदर संगमच जणू!

जर्मन भाषेऐवजी संस्कृत सक्तीचे करण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयाचे हे लोक अर्थातच स्वागत करतात. कारण त्यांच्या मते संस्कृत आणि वेदांचे शिक्षण आपल्याला परिपूर्ण आयुष्य जगण्यास समर्थ बनवू शकते.

\"उत्तम समृद्ध कौटुंबिक जीवन जगताना सूक्ष्म तत्वज्ञानाची गोडीही निर्माण करू शकणारे असे हे शिक्षण आहे\" सिस्को मधील नोकरी सोडून कापड दुकान चालवत असलेला मधुकर हा सॉफ्टवेअर इंजिनिअर युवक इथे सांगतो.

मत्तुर मधील प्रत्येक कुटुंबात किमान एक तरी IT व्यावसायिक आहे. कित्यकजण परदेशी स्थायिक आहेत. पण गावातील धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमात ते आवर्जून हजेरी लावतात.

\"आमचे अख्खे गाव हे एखाद्या एकत्र कुटुंबासारखेच एकसंध आहे. गावात गुन्हेगारी जवळजवळ नाहीच! मालमत्तेसंबंधी तंटे बखेडे कोर्ट कचेर्या तर माहीतही नाहीत !\" 
यदु नावाचा दुसरा सॉफ्टवेअर मधला युवक व्यावसायिक सांगत होता.

हे सर्व चित्र जरी सुंदर असले तरी गावातील जातीव्यवस्था मात्र अत्यंत कर्मठ स्वरूपाची आहे. कित्येक वर्षांची परंपरा मोडून या वर्षी एका युवकाने उत्तर हिंदुस्थानी मुलीशी विवाह केला. \"तेही तो साधन कुटुंबातील असल्याने करू शकला. बाकी सर्वसाधारण लोकांनी असे काही केले तर ते बहिष्कृत होतील\" शाळेतील शिक्षक सांगत होते. या बाबतीत गावातील जुने कर्मठ लोक आणि तरुण पिढीत मोठे मतभेद आहेत. तरुणांना ही जातीची बंधने थोडी सैल व्हावीत असे साहजिकच वाटते. \"त्या लोकांच्या घरी जायला सुदधा आज काल लोक कचरतात. \"

या त्रुटी जरी असल्या तरी शैक्षणिक विक्रमाबद्दल मात्र बोट ठेवायला जागा नाही अशी येथील शाळेची कामगिरी आहे .

वर्षानुवर्षे येथील मुले शैक्षणिक क्षेत्रात चमकत आहेत. संस्कृत व वेदांच्या शिक्षणामुळेच आपण अभ्यासात प्रगती करू शकलो असे येथील बहुतेक इंजिनिअर्स चे मत आहे.

आधुनिक व पाश्चिमात्य संस्कृती वर टीका करणारे हे लोक त्या जीवनशैली चे फायदे मात्र घेताना दिसतात. मोबाईल फोन व इतर साधने सर्रास वापरात असताना आधुनिकतेवर एवढा रोष का ? 
याचे उत्तर त्यांच्याकडे नाही.

असे काही प्रश्न विचारले असता त्या प्रश्नाचे उत्तर देण्याऐवजी हे लोक संस्कृत चे गुणगान करताना दिसतात.

त्यांच्या मते आजचे जगात अंधपणे संस्कृत चा पाठपुरावा करण्याऐवजी जर डोळसपणे संदर्भपूर्वक संस्कृत भाषा शिकवली गेली तर त्याचे फायदे सर्वाना मिळू शकतील.

तंत्रज्ञानाच्या फायद्यांकडे लक्ष वेधले असता मधुकर हा तरुण म्हणाला \" आपल्या संस्कृतीमध्येही या गोष्टी पूर्वी होत्या कालौघात त्या लुप्त झाल्या. आपण आपली विज्ञानालालसा गमावून बसलो... \"

बहुतेक तरुण हे इथल्या अलिप्त जीवनपद्धतीत सुखी आहेत. त्यांच्या मते जर या परंपरांपासून ते दूर गेले तर आजचे शांततापूर्ण व सौहार्दपूर्ण जीवन ते गमावून बसतील. 
आणि सर्वसामावेशकतेसाठी एवढी किंमत मोजावयाची आज तरी त्यांची मानसिकता नाही!

#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his ‘Mission 2020’ .

 

 

डॉ. स्मिता घैसास

टीम भारतीयन्स

बातमी सौजन्य

इकोनॉमिक टाईम्स