Bhartiyans

Menu

जागतिक स्पर्धेत गोल्ड मेडल मिळवणाऱ्या १०० वर्षांच्या भारतीय आजी

Date : 12 Nov 2016

Total View : 388

ब्रिटीश कोलंबिया येथे घेतली जाणारी ही स्पर्धा ही तिशीच्या वरच्या खेळाडूंसाठीची जगातील एकमेव क्रिडास्पर्धा आहे.१०० वर्षांच्या 'मन कौर' ह्या त्यांच्या वयाच्या स्पर्धकांमधे या स्पर्धेत एकमेव महिला धावपटू


सारांश

ब्रिटीश कोलंबिया येथे घेतली जाणारी ही स्पर्धा ही तिशीच्या वरच्या खेळाडूंसाठीची जगातील एकमेव क्रिडास्पर्धा आहे.१०० वर्षांच्या 'मन कौर' ह्या त्यांच्या वयाच्या स्पर्धकांमधे या स्पर्धेत एकमेव महिला धावपटू होत्या.सविस्तर बातमी

वाटतंय तुम्हाला, जागतिक स्पर्धेत गोल्ड मेडल मिळवणाऱ्या या भारतीय आजी १०० वर्षांच्या आहेत म्हणून ????
रोज सकाळी अलार्म स्नूझवर टाकणा-या, “पाऊस पडतोय, मित्र/मैत्रिण नाहीये, कंटाळा आलाय, झोप नाही झालीये” अशी स्वत:लाच कारणं देऊन व्यायामापासून पळणा-या आपल्यासाठी खास:- 
आज भेटूया कौर आज्जीन्ना, ज्या रोज संध्याकाळी चंदिगढमधे ५ किंवा १० किलोमीटर अशी लहान लहान अंतरं धावून पार करत त्यांच्या धावण्याचा सराव अजूनही करतात.
#Bharatiyans

१०० वर्षांची तरुणी \'मन कौर\' ह्या त्यांच्या वयाच्या स्पर्धकांमधे या स्पर्धेत एकमेव महिला धावपटू होत्या.

बरची, गोळाफेक आणि १०० मीटर डॅशमधे कौर यांनी सुवर्ण पदक पटकवले आहे.
जगभरातील विविध क्रिडा स्पर्धांमधे त्यांनी आत्तापर्यंत २० पदकं मिळवली आहेत.

अमेरिकेतील मास्टर्स खेळामधे १०० मीटरचे अंतर केवळ दिड मिनिटांत धावून भारतीय धावपटू मन कौर यांनी सुवर्णपदक पटकवले आहे.

भारतातीलच नव्हे तर संपूर्ण जगभरातील खेळाडूंसाठी आणि खेळाडू नसलेल्यांसाठीही मन कौर ह्या मोठ्या प्रेरक ठरल्या आहेत.

कौर यांनी १०० मीटर अंतर धावून संपवलं तेव्हा त्यांचं कौतुक करण्यासाठी उभे असलेले \' चिअर लीडर्स\' हेही सगळे ७०-८० वर्षांचे तरूण होते! 
या जगात काहीही होऊ शकतं!

ब्रिटीश कोलंबिया येथे घेतली जाणारी ही स्पर्धा ही तिशीच्या वरच्या खेळाडूंसाठीची जगातील एकमेव क्रिडास्पर्धा आहे.

कौर यांची उर्जा आणि उत्साह संपूर्ण जगाला थक्क करणारी आहे.

कौर यांचा ७८ वर्षांचा मुलगा गुरुदेव सिंघ यांनी सांगितल्यानुसार, ही स्पर्धा जिंकल्यानंतर कौर आज्जीला अगदी लहान मुलासारखा आनंद झाला होता.

लहान मुल एखाद्या स्पर्धेत बक्षिस मिळवतं तेव्हा त्याला जसं सगळ्यांना सांगायचं असतं तसंच कौर आज्जीला भारतात येऊन सगळ्यांना तिच्या यशाबद्दल सांगायचं होतं...

आज्जीने १ मिनिट २१ सेकंदात १०० मीटर धावपट्टी धावून संपवल्यावर हसत हसत आपले दोन्ही हात वर करुन तिचा आनंद साजरा केला.

वृद्धावस्था म्हणजे दुसरं बालपणच असतं असं म्हणतात ते कौर आज्जीने तिच्या यशानेही सिद्ध केलं आहे.

जिंकल्यावर एक क्षण दिर्घ श्वास घेऊन तिच्या मुलाकडून ती पोटभर पाणी प्यायली. प्रचंड उर्जा आणि आनंद यामुळे त्याक्षणी काहीच बोलणं तिला शक्य झालं नाही.

७८ वर्षांच्या कौर आज्जीच्या मुलानेही या स्पर्धेत भाग घेतला होता. त्याच्या सुचवण्यामुळेच आज्जीने वयाच्या ९३ व्या वर्षी धावायला सुरुवात केली.

त्यावेळी तिला कुठलीच शारिरीक समस्या नव्हती आणि आत्ताही नाहीये. गुडघेदुखी नाही की काही हार्ट प्रॉब्लेम नाही.

सेंच्युरी मारलेल्या या भन्नाट तरुणीस ‘टिम भारतीयन्स’चा मानाचा मुजरा !

You Are \'Forever Young\' ग आज्जी !

#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his ‘Mission 2020’ .

 

 

श्रुती आगाशे

टीम भारतीयन्स

बातमी सौजन्य

इंडियन एक्स्प्रेस