Bhartiyans

Menu

‘मला साडी घ्यायची नाहीये.” अस म्हणणारी स्त्री बघितलीय कधी कुणी कुठे ?

Date : 12 Nov 2016

Total View : 490

साडी घ्यायला बायका कधीच मागेपुढे बघत नाहीत. पण मग अश्याने घरात एवढ्या साड्या जमतात की त्यांचं नंतर करायचं काय हेच सुचत नाही. या समस्येवर उपाय नाहीये का ? नाहीये कसा ? आहे तर...उपाय आहे.... मानलं या स


सारांश

'युवा' नावाच्या बिनसरकारी स्वयंसेवी संस्थेची उपसंस्था असलेल्या या समूहाने, अक्षरशः कचऱ्यात जमा झालेल्या अनावश्यक वस्तूंचा वापर या विषयावर बेतलेला 'स्टोरी ऑफ स्टफ' नावाचा एक लघुपट दाखवला. तो लघुपट पाहिल्यानंतर समूहाला प्लास्टिक पिशव्यांच्या जागी साड्यांपासून बनवलेल्या कापडी पिशव्यांच्या वापराचा विचारसविस्तर बातमी

‘मला साडी घ्यायची नाहीये.” अस म्हणणारी स्त्री बघितलीय कधी कुणी कुठे ?
साडी घ्यायला बायका कधीच मागेपुढे बघत नाहीत. 
पण मग अश्याने घरात एवढ्या साड्या जमतात की त्यांचं नंतर करायचं काय हेच सुचत नाही.
या समस्येवर उपाय नाहीये का ? नाहीये कसा ? आहे तर...उपाय आहे....
मानलं या स्त्रीयांना... साड्यांचा पर्यावरणपूरक उपयोग करणाऱ्या....
#Bharatiyans

मुंबईत प्लास्टिकचा वापर कमी करायला स्त्रिया करतात साड्यांचा पुनर्वापर
एका दगडात अक्षरशः दोन पक्षी....

खारघरमधील काही स्त्रियांच्या एका समूहाने या समस्येवर एक अफलातून उपाय शोधला आहे. त्या स्त्रीया या त्यांच्या जुन्या साड्यांपासून पिशव्या तयार करतात आणि त्या पिशव्या स्थानिक फेरीवाले आणि वितरकांना पुरवतात.

या समुहाचं नाव आहे \'युवासखी\'.

या उपक्रमाद्वारे हा समूह एका बाजूने स्त्रियांना उद्योग देऊन स्त्री सशक्तीकरणास हातभार लावू इच्छितो तर दुसऱ्या बाजूने प्लास्टिक पिशव्यांना एक biodegradable आणि शाश्वत पर्याय देऊ इच्छितो.

\'युवा\' नावाच्या बिनसरकारी स्वयंसेवी संस्थेची उपसंस्था असलेल्या या समूहाने, अक्षरशः कचऱ्यात जमा झालेल्या अनावश्यक वस्तूंचा वापर या विषयावर बेतलेला \'स्टोरी ऑफ स्टफ\' नावाचा एक लघुपट दाखवला.

तो लघुपट पाहिल्यानंतर समूहाला प्लास्टिक पिशव्यांच्या जागी साड्यांपासून बनवलेल्या कापडी पिशव्यांच्या वापराचा विचार सुचला.

\'प्लास्टिक पिशव्या टाळा\' असं या प्रकल्पाचं नाव आहे.

प्लास्टिक पिशव्यांचा वापर कमी करून आणि वर त्यातून उत्पन्न मिळवण्याची सुद्धा संधी यात आहे. आमच्या समूहात अश्या खूप स्त्रिया आहेत ज्यांना कामासाठी घरातून बाहेर पडणे शक्य होत नाही पण कुटुंबाला आधार देण्यासाठी आपण काहीतरी करावं असं त्यांना मनापासून वाटतं.

ह्या उपक्रमाद्वारे स्त्री सशक्तीकरण तर नक्कीच होईल त्याचबरोबर नागरिकांमध्ये पर्यावरणाला अनुकूल सवयी बाणवायला देखील मदत होईल. 
“खारघरला एका प्राथमिक सर्वेक्षणाने या उपक्रमाची सुरुवात झाली.

तेथील दुकानदार, सुपर मार्केटचे मालक, फेरीवाल्यांशी बोलल्यावर दिवसाला जवळपास ५०० ते १००० प्लास्टिक पिशव्या लागत असल्याचं लक्षात आलं.

आम्ही पिशव्यांवर होणाऱ्या खर्चावर सुद्धा संशोधन केलं. ५० छोट्या आकाराच्या प्लास्टिक पिशव्यांच्या एका पॅकेटची किंमत सहसा ३० ते ४० रूपये असते. आम्ही १५ ऑगस्ट पर्यंत साड्या जमविणार आहोत आणि नंतर आमच्या या पहिल्या प्रकल्पाला सुरुवात करू. आम्ही खारघरमधील एका महिला सेल्फ-हेल्प समूहाकडून १००० पिशव्या शिवून घेत आहोत.\" इथल्या एक जेष्ठ महिला कार्यकर्त्या सांगतात.

“एका साडीपासून साधारणपणे १० कापडी पिशव्या शिवून तयार होतात. या पहिल्याच प्रकल्पासाठी या महिलांकडून पिशव्या विकत घेण्यासाठी दोन फेरीवाले आणि सुपर मार्केट वितरकांशी आम्ही संपर्क साधलेला आहे. वितरक प्लास्टिक पिशव्यांसाठी जेवढी किंमत मोजतात साधारण तेव्हढीच किंमत आम्ही या पिशव्यांसाठी ठेवली आहे.

\"आम्ही २/३ आठवड्यांसाठी ग्राहकांचा प्रतीसाद बघणार आहोत. ह्यात आमच्या समूहातील स्त्रिया आणि वितरक अश्या दोघांचाही फायदा आहे.

तसच मागणीनुसार, आमच्या समूहातील ज्या स्त्रियांमध्ये कौशल्य आहे आणि ज्यांना आपल्या कुटुंबाला आर्थिक मदत करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी आम्ही एक व्यावसायिक नमूना तयार करणार आहोत,\" असं सुद्धा त्यांनी पुढे सांगितलं.

एकदा खारघर मध्ये हा उपक्रम यशस्वीपणे सुरु झाला की समूहाचा विस्तार करायचा किंवा मुंबईतील इतर महिला समूहांना अश्याप्रकारचे इतर उपक्रम सुरु करण्यास प्रोत्साहीत करण्याचा समुहाचा विचार आहे.

#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his ‘Mission 2020’ .

 

 

अंजली आमोणकर

टीम भारतीयन्स

बातमी सौजन्य

डीएनए आणि गुगल