Bhartiyans

Menu

१० लाख भारतीय निमलष्करी जवानांना मिळणार हाय-टेक आणि वजनाला हलके बुलेटप्रुफ कॉम्बॅट हेल्मेट

Date : 12 Nov 2016

Total View : 136

१० लाख भारतीय निमलष्करी जवानांना मिळणार हाय-टेक आणि वजनाला हलके बुलेटप्रुफ कॉम्बॅट हेल्मेट .अगदी जवळून म्हणजे २० मीटर अंतरावरून झाडलेली ७.६२ एमेम अथवा ९ एमेम बंदुकीची गोळी सुद्धा हे अत्याधुनिक स्पेशल


सारांश

१० लाख भारतीय निमलष्करी जवानांना मिळणार हाय-टेक आणि वजनाला हलके बुलेटप्रुफ कॉम्बॅट हेल्मेट #Bharatiyans अगदी जवळून म्हणजे २० मीटर अंतरावरून झाडलेली ७.६२ एमेम अथवा ९ एमेम बंदुकीची गोळी सुद्धा हे अत्याधुनिक स्पेशल हलके हेल्मेट सहजपणे विश्वासाने रोखू शकते. येव्हढेच नव्हे तर दुरून मारलेले दगड सुद्धासविस्तर बातमी

१० लाख भारतीय निमलष्करी जवानांना मिळणार हाय-टेक आणि वजनाला हलके बुलेटप्रुफ कॉम्बॅट हेल्मेट 
#Bharatiyans

अगदी जवळून म्हणजे २० मीटर अंतरावरून झाडलेली ७.६२ एमेम अथवा ९ एमेम बंदुकीची गोळी सुद्धा हे अत्याधुनिक स्पेशल हलके हेल्मेट सहजपणे विश्वासाने रोखू शकते.

येव्हढेच नव्हे तर दुरून मारलेले दगड सुद्धा या हेल्मेटमध्ये सुरक्षित असलेल्या सैनिकांना काहीच होवू देणार नाही.

तसेच कम्युनिकेशनची सर्व अत्याधुनिक साधने या हेल्मेट मध्ये लावता येणार आहेत.

विशेष म्हणजे वजनाला हलके असे हे हेल्मेट रात्रंदिवस जरी डोक्यावर राहिले तरीही सैनिकांची मान आता यामुळे दुखणार नाही.

आणि म्हणूनच या सगळ्याच वैशिष्ट्यांनी हे हेल्मेट भारतीय निमलष्करी दलांचे प्रत्यक्ष युद्धभूमीवर मनोधैर्य खूप वाढवणार आहे.

सध्या हे जवान वापरत असलेले १.५० किलोचे हेल्मेट हे अवजड तर आहेच पण बुलेटप्रुफ सुद्धा नाही आणि त्यामुळे अतिरेक्यांना भिडत असताना आपले डोके सांभाळत सांभाळत आपल्या सैनिकांना हे दिव्य पार पडावे लागते.

एवढ्या मोठ्या प्रमाणात ही अत्याधुनिक सुसज्ज हेल्मेट्स विकत घेणे म्हणजे सरकारी तिजोरीवर मोठा बोजा असणार आहे आणि म्हणूनच सरकारी अधिकाऱ्यांनी या खरेदीबाबत नापसंती दर्शवली आहे.

परंतु, सैनिकांचा जीव हा पहिली प्रायोरिटी आहे असे म्हणत सरकारने ही हेल्मेट्स विकत घ्याला परवानगी दिली आहे.

#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his ‘Mission 2020’ .

 

 

मिलिंद वेर्लेकर

टीम भारतीयन्स

बातमी सौजन्य

इंडिया टाईम्स