Bhartiyans

Menu

कोण म्हणतं पिरीएडस स्त्री'ला शक्तिहीन आणि कलंकीत करतात ?

Date : 12 Nov 2016

Total View : 485

आज भेटूया अश्या एका भारतीय महिलेला जिने ९ राज्यातल्या हजारो स्त्रियांना स्वयंस्फूर्तीने सांगितलं, शिकवलं आणि पटवलं सुद्धा की मासिक पाळी म्हणजे कुठल्याही प्रकारचा कमीपणा नव्हे.


सारांश

आज भेटूया अश्या एका भारतीय महिलेला जिने ९ राज्यातल्या हजारो स्त्रियांना स्वयंस्फूर्तीने सांगितलं, शिकवलं आणि पटवलं सुद्धा की मासिक पाळी म्हणजे कुठल्याही प्रकारचा कमीपणा नव्हे. उर्मिला चनम , ३६ वर्षीय बेंगलोर स्थित असलेली ही आहे एक आरोग्य-रक्षक कार्यकर्ती आणि पत्रकार. जिने आघाडी उघडली आहे भारतीय महिसविस्तर बातमी

कोण म्हणतं पिरीएडस स्त्री\'ला शक्तिहीन आणि कलंकीत करतात ?
#Bharatiyans

आज भेटूया अश्या एका भारतीय महिलेला जिने ९ राज्यातल्या हजारो स्त्रियांना स्वयंस्फूर्तीने सांगितलं, शिकवलं आणि पटवलं सुद्धा की मासिक पाळी म्हणजे कुठल्याही प्रकारचा कमीपणा नव्हे.

उर्मिला चनम , 
३६ वर्षीय बेंगलोर स्थित असलेली ही आहे एक आरोग्य-रक्षक कार्यकर्ती आणि पत्रकार.

जिने आघाडी उघडली आहे भारतीय महिलांना आणि एकंदरच समाजाला मासिक पाळीच्या संदर्भात असलेल्या सर्वच गैरसमज आणि गैर चालीरीतीच्या अकारण घोळक्यातून बाहेर काढण्याची, त्यांना या विषयात पूर्णपणे शिक्षित करण्याची आणि या संदर्भातल्या स्वच्छतेसंबंधी प्रशिक्षित करण्याची....

‘Break the silence, celebrate the red droplets’, हे आहे तिच्या या धडक मोहिमेचे स्लोगन, जे घेऊन तिने नुकताच उत्तर प्रदेशातल्या अमेठीच्या गावागावांमध्ये प्रवास केला.

पाळी संबंधातली स्वच्छता, सॅनिटरी नॅपकिन आणि स्वच्छतागृहे वापरण्या संदर्भातली माहिती या विविध विषयांवर यावेळी ती काम करत होती राजीव गांधी महिला विकास प्रतिष्ठानच्या महिला Self Help Groups (SHGs) सोबत आणि Accredited Social Health Activists (ASHAs) या कार्यक्रमांतर्गत काम करणाऱ्या आरोग्य-सेवकांसोबत.

पाळी संदर्भातल्या चुकीच्या मान्यतांना योग्य शिक्षणाच्या मदतीने दूर करणे आणि ग्रामीण महिलांच्या मनात या विषयी आत्मविश्वास निर्माण करणे हे आहे उर्मिलाचे गेल्या पाच वर्षांपासूनचे मिशन.

२०१२ साली उर्मिला निर्मल भारत अभियानची फेलोशिप घेऊन, आरोग्यरक्षणार्थ घ्यायची खबरदारी आणि सॅनिटेशन संदर्भात ग्रामीण स्तरावार प्रत्यक्ष सुरु असलेली परिस्थिती पहाण्यासाठी, समजून घेण्यासाठी आणि या विषयावर लिहिण्यासाठी भारतातल्या अनेकानेक राज्यांमध्ये फिरली.

आणि तेव्हापासून आजपावेतो तिने मागे वळून पाहिलेले नाही.

मणिपूर मध्ये जन्मलेल्या आणि आता बेंगलोर मध्ये राहत असलेल्या उर्मिलाने तळागाळातल्या महिलांच्या अनेकानेक प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी प्रसार माध्यमांचा यथायोग्य वापर आजपावेतो केला आहे हे विशेष.

वर्तमानपत्रांच्या माध्यमातून सुरुवातीला लिहिणारी उर्मिला आता या प्रश्नांच्या सोडवण्यासाठी डिजिटल माध्यमांचा परिपूर्ण उपयोग करू लागली आहे.

आणि म्हणूनच फेसबुक, ट्विटर, यु ट्यूब इत्यादी माध्यमांमुळे आता तिच्या या महिला सक्षमीकरण मिशनला जबरदस्त वेग प्राप्त झाला आहे.

यामुळेच तिच्या सध्याच्या या अत्यंत महत्वाच्या ‘red droplets’ या अभियानाला विलक्षण गती आणि सुस्पष्ट दिशा मिळाली आहे.

तिच्या भारतातल्या याच अभियानाच्या यशामुळे World Pulse.com या जागतिक सोशल नेट्वर्किंग संस्थेने तिला Voices of Our Future (VOF) हा आंतरराष्ट्रीय सन्मान प्रदान केला.

१९० देशांतल्या महिलांना त्यांचे प्रश्न आणि समस्या मांडण्यासाठी मंच देणारी ही संस्था महिलांच्या आंतरराष्ट्रीय आवाजाला बळ देऊन महिलांचे जीवन सर्वच बाबतीत सुखकारक होण्यासाठी प्रयत्न करण्याचे काम करते.

उत्तर प्रदेश असो , बिहार असो वा उर्मिलाचे स्वतःचे मणिपूर असो, एखाद्या प्रदेशाच्या सांस्कृतिक अडचणी आणि अडथळे लक्षात ठेवूनच त्या प्रदेशातल्या लोकांच्या वागणुकीत बदल कसा आणता येईल हा प्रश्न उर्मिलाला नेहेमीच भेडसावत असे.

विशेषकरून महिलांच्या वागणुकीमध्ये या संदर्भात कसा बदल आणता येईल याचा विशेष अभ्यास तिने केला.

एकेकाळी घरगुती अत्याचाराचा यशस्वीपणे सामना केलेल्या उर्मिलाला त्या विषयाची निट अशी जाण आहे आणि म्हणूनच एका महिलेला सर्वमान्य मान्यता बदलून दुसरी भूमिका स्वीकारताना येणाऱ्या अडचणींची व्यवस्थित कल्पना उर्मिलाला आहे.

उर्मिलाच्या मते एखाद्या महिलेवर असलेला दबाव हा तिहेरी असतो, एक म्हणजे अशिक्षितपणा , दुसरे म्हणजे गरिबी आणि तिसरे म्हणजे पुरुषसत्ताक पद्धती.

मासिक पाळीच्या अवतीभवती ‘कलंक’ स्वरूपात असलेली चुकीची समाजभावना संपवण्यासाठी चळवळ उभी करणारी उर्मिला म्हणते की भारतातल्या थोड्या थोडक्या नव्हे तर तब्बल २३% मुली वयात आल्यावर आणि मासिक पाळी सुरु झाल्यावर, निव्वळ सॅनिटेशनच्या सुविधा शाळेत नसल्याने , शिक्षण व्यवस्थेतून बाहेर पडतात तर कश्याबश्या १२% महिला सॅनिटरी पॅडस वापरतात हे धक्कादायकच आहे.

उर्मिला म्हणते की पंजाब मध्ये ग्रामीण अशिक्षित महिला वाळलेला पेंढा वापरतात, मणिपूर मध्ये तिने एका महिलेला पॉलीथीनची पिशवी वापरताना पहिले होते, बऱ्याचजणी आज सुद्धा वापरलेले टिशू-पेपर्स वापरतात.

आंध्र प्रदेशातल्या कुप्पम मध्ये तर तिने पहिले की मासिक पाळी सुरु असलेल्या गावातल्या सर्वच महिलांना गावाबाहेर एका झोपडीत त्या दिवसांत ठेवले जाते आणि या वेळी त्या महिलांच्या वैयक्तिक स्वच्छतेविषयी कुणालाच देणेघेणे नसते. 
जेव्हा भूक लागते तेव्हा या महिलांना घरी येण्याची परवानगी असते पण त्यांनी जेवायचे असते ते मात्र घराच्या बाहेरच उभे राहून.

उर्मिलाने सुरु केलेल्या ‘Break the Silence’ या अभियाना अंतर्गत उर्मिलाने सोशल मिडीयाचा पूर्ण उपयोग करून घेतला असला तरी फिल्ड वर काम करताना मात्र ती शाळा शाळांमध्ये आणि सामाजिक कार्यक्रमांमध्ये सुद्धा जाते आणि मोठ्या प्रमाणात लोकांपर्यंत पोचून त्यांना या विषयाची यथोचित माहिती देऊ करते जेणेकरून मासिक पाळीमुळे मुलींची शाळा, शिक्षण, काम आणि महत्वाकांक्षा धोक्यात येणार नाही.

शाळांमध्ये उर्मिला पुरुष शिक्षकांशी सुद्धा या विषयाच्या माहितीसाठी आणि या पुरुषांनी सुद्धा या विषया संदर्भात संवेदनशील दृष्टीकोन अवलंबावा म्हणून संवाद साधते. यापुढे या पुरुष शिक्षकांना या विषयात प्रशिक्षित करून त्यांना ही या प्रोसेस मध्ये आणण्याचा तिचा मनसुबा आहे हे कौतुकास्पद.

गोष्टी हळूहळू, पण सर्वदूर निश्चितपणे बदलत आहेत असे उर्मिलाचे म्हणणे आहे.

मासिक पाळी आणि महिलांचे स्वछ्तापूर्ण कम्फर्टेबल राहणीमान आणि यामधून त्यांचे हितकारक जीवनमान आणि त्याचा उंचावणारा स्तर या विषयात, पेटून उठून , निरंतर स्वयंस्फुर्तीने काम करणाऱ्या उर्मिला चनम हिचा ‘टीम भारतीयन्स’ ला अभिमान वाटतो आहे.

उर्मिला चनम या भारतियन’ला ‘टीम भारतीयन्स’चा मानाचा मुजरा.

#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his ‘Mission 2020’ .

 

 

मिलिंद वेर्लेकर

टीम भारतीयन्स

बातमी सौजन्य

फोलोमोजो.कॉम