Bhartiyans

Menu

या भल्या इंजिनिअर तरुणाकडे त्याची सरकारी नोकरी होती पण मुळात शेतकऱ्याच्याच कुटुंबातला असणारा तो त्यात अजिबातच समाधानी नव्हता, सरते शेवटी नोकरी सोडून तो शेती करू लागला आणि आता हा तरुण करोडोंमध्ये खेळू

Date : 12 Nov 2016

Total View : 106

चला मित्रांनो आज भेटूया जैसलमेरच्या हरीश धनदेवला, हरीशची ही गोष्ट आजकालच्या तरुणाईला शब्दशः भुरळ पाडणारी आणि तरुणांच्या तसेच पालकांच्या समोर दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक ठरणारी अशीच आहे.


सारांश

चला मित्रांनो आज भेटूया जैसलमेरच्या हरीश धनदेवला, हरीशची ही गोष्ट आजकालच्या तरुणाईला शब्दशः भुरळ पाडणारी आणि तरुणांच्या तसेच पालकांच्या समोर दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक ठरणारी अशीच आहे. भारतात आज शेती हा उद्योग करिअर म्हणून निवडणाऱ्या लोकांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असतानाच हरीश धनदेव या २४ वर्षीसविस्तर बातमी

या भल्या इंजिनिअर तरुणाकडे त्याची सरकारी नोकरी होती पण मुळात शेतकऱ्याच्याच कुटुंबातला असणारा तो त्यात अजिबातच समाधानी नव्हता, सरते शेवटी नोकरी सोडून तो शेती करू लागला आणि आता हा तरुण करोडोंमध्ये खेळू लागला आहे....
#Bharatiyans

चला मित्रांनो आज भेटूया जैसलमेरच्या हरीश धनदेवला, 
हरीशची ही गोष्ट आजकालच्या तरुणाईला शब्दशः भुरळ पाडणारी आणि तरुणांच्या तसेच पालकांच्या समोर दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक ठरणारी अशीच आहे.

भारतात आज शेती हा उद्योग करिअर म्हणून निवडणाऱ्या लोकांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असतानाच हरीश धनदेव या २४ वर्षीय इंजिनिअर तरुणाने २०१३ साली त्याची सरकारी नोकरी सोडली आणि त्याच्या स्वतःच्या शेतीमध्ये कोरफड लागवडीला सुरुवात केली.

आज, तो किमान दीड ते दोन करोड रुपयांचा टर्नओव्हर असणाऱ्या एका कंपनीचा मालक आहे.

२०११ च्या लोकगणनेनुसार भारतात आजमितीस १२ कोटी ७६ लाख शेतकरी आहेत ज्यांच्यासाठी शेती हा मुख्य व्यवसाय आहे. हे एकूण लोकसंख्येच्या दहा टक्क्यांपेक्षा ही कमीच आहेत.

अलीकडच्या जनगणनेनुसार १९९१ च्या भारतातील शेती हा मुख्य व्यवसाय असणाऱ्या शेतकऱ्यांच्या एकूण संख्येच्या तुलनेत आज सुमारे १ कोटी पन्नास लाख एवढी घट झाली असून २००१ च्या तुलनेत ७७ लाख एवढी घट झाली आहे. 
म्हणजेच या संख्येत गेल्या वीस वर्षांपासून दर दिवशी २०३५ शेतकऱ्यांच्या संख्येची घट होत आहे.

हरीश सरकारी नोकरीत असताना एकदा दिल्ली इथे एका शेती संबंधातल्या प्रदर्शनाला सहजच भेट द्यायला गेला होता आणि हाच त्याच्या आयुष्यातला टर्निंग पोइंट ठरला.

परत आल्यावर त्याने सरकारी नोकरी सोडली, आपल्या शेतात कोरफड लावली आणि आता त्याने \'Naturelo Agro\' नावाची जैसलमेर पासून ४५ किलोमीटर अंतरावर असलेया धैसार इथे स्वतःची कंपनी सुरु केली आहे.

थरच्या वाळवंटामध्ये असलेल्या त्याच्या शेतीत प्रचंड मोठ्या प्रमाणावर उगवलेली कोरफड तो आता रामदेव बाबांच्या ‘पतंजली फूड प्रोडक्ट्स’ला सप्लाय करतो आणि ‘पतंजली’ त्यापासून मोठ्या प्रमाणावर कोरफड ज्यूस आणि इतर गोष्टी तयार करतात ज्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणावर केवळ भारतातच नव्हे तर जगभरातून मागणी आहे.

थरच्या वाळवंटामध्ये उगवलेल्या कोरफडीचा स्तर इतक्या उच्च दर्जाचा आहे कि देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सुद्धा या कच्च्या मालाला भरपूर मागणी आहे.

पतंजली मधल्या विशेषज्ञांना हरीशने शेती करून उगवलेल्या कोरफडीचा दर्जा इतका भावला कि त्यांनी त्याच्या कडचे सगळेच्या सगळे पिक तर घेतलेच परंतु पुढील पुरवठ्यासाठी सुद्द्धा आगाऊ मागणी नोंदवून टाकली.

हरीशने घेतलेली रिस्क योग्य ठरली होती.

हरीश म्हणतो कि जैसलमेर नगरपालिकेत त्याच्याकडे ज्युनिअर इंजिनिअरची नोकरी होती पण त्याचे अंतस्थ हृदय नेहेमीच त्याला दुसर काहीतरी करावं असच सांगत होतं. म्हणून त्याने नोकरी सोडली.

त्याच्याकडे शेती होतीच आणि मुख्य म्हणजे पाणी सुद्धा होतं, फक्त कल्पनाशक्ती मात्र नव्हती.

त्याला काहीतरी नवीन उगवायच होतं.

त्याने त्याच्या शेतीमध्ये \'babie densis\' नावाची कोरफड घेतली. ही कोरफड इतकी चांगली आहे कि अमेरिका, ब्राझील आणि हॉंगकॉंग मध्ये सुद्धा याला मोठी मागणी आहे.

सुरुवातीला त्याने साधारण या जातीच्या कोरफडीची ८०,००० रोपे लावली आणि हळूहळू आता त्याने या रोपांची संख्या ७,००,००० हून अधिक वाढवली आहे.

हरीश म्हणाला कि गेल्या वर्षी त्याने हरिद्वार इथल्या ‘पतंजली’ कारखान्याला १२५-१५० टन कोरफडीचा गर पाठवला आहे.

सरकारी नोकरीत असतानाच त्याचे वडील निवृत्त झाले आणि त्यांनी शेती सुरु केली. हरीशने सुद्धा त्यांच्या सोबत थोडी धोडी शेती करायला सुरुवात केली पण आत्ता सुद्धा पूर्णवेळ शेती करावी असा त्याचा विचार नव्हता.

पण याचवेळी हुशार हरीशने एक निरीक्षण मात्र नक्की केलं होतं कि अनेक शेजारपाजारचे शेतकरी काबाड कष्ट करतात पण स्मार्ट शेती करत नाहीत आणि म्हणूनच ते यशस्वी होत नाहीत.

“ मला तीन लाकुडतोड्यांची एक गोष्ट आठवते. त्या तिघांना एक कुऱ्हाड दिली होती आणि तीन तासात एक झाड तोडायला सांगितले होते. 
त्यापैकी दोघांनी हातात कुऱ्हाड आल्या आल्या झाड तोडायला सुरुवात केली. 
पण तिसऱ्या लाकूड तोद्याने मात्र हातात कुऱ्हाड आल्या आल्या आधीचे दोन तास कुऱ्हाडीला व्यवस्थित धार लावली आणि मग सपासप झाड तोडले. 
तो शेवटचा तिसरा लाकूड तोड ती पैज जिंकला.

तुम्हाला तुमचा रस्ता निट प्लान करावा लागतो आणि मगच स्मार्टपणे कामाला सुरुवात करावी लागते हे नक्की.

माझ्या आजूबाजूचे जे शेतकरी मी पाहत होतो त्यांच्याकडे हे कौशल्य नव्हते आणि हाच त्यांचा मोठा ड्रॉबॅक होता.” हरीश म्हणतो.

हळू हळू हरीशने इंजिनिअरचे शिक्षण घेताना जो पेशन्स आणि स्किल्स शिकली होती त्या सर्वांचाच अवलंब करत करत शेती सुरु केली.

त्याला त्याच्या स्वतःवर पूर्ण विश्वास होता पण सरकारी नोकरी सोडताना मात्र असते तशी धाकधूक त्याच्या ही मनात होतच होती.

या वेळी त्याने शेती करण्याचा निर्णय आणि ही प्रेरणा त्याची मोठी बहिण, अंजना मेघवाल हिच्याकडून घेतली.

दोघा मुलांची आई असलेल्या अंजनाचे पती २०११ साली एका कार अपघातात मरण पावले होते. ती स्वतः सुद्धा ९ महिने हॉस्पिटल मध्ये तिच्या जखमांशी लढत लढत मृत्यूशी झुंझत होती.

पण तिने यातून सुद्धा सावरत तिचे आयुष्य \'पुनश्च हरिओम\' म्हणत उभे केले आणि आज अंजना जैसलमेरची मेयर आहे.

“माझी मोठी बहिण ही माझी खूप मोठी प्रेरणा आहे. आयुष्यात मोजूनमापून, तावून सुलाखूनआलेल्या संधी या घ्यायच्याच असतात आणि जर तुम्ही पूर्ण सर्वस्व झोकून काम केले तर तुमच्या यशाची पूर्ण खात्री असतेच असते हे मी माझ्या मोठ्या बहिणीकडून शिकलो.” हरीश मोठ्या अभिमानाने सांगतो.

नोकरी सोडून शेती करायला सुरुवात केल्या केल्या त्याने पहिले काम केले आणि ते म्हणजे शासकीय शेती विभागात जावून् त्याने आपल्या स्वतःच्या जमिनीचा कस आणि जमिनीचा प्रकार यांची त्याने शास्त्रीय पद्धतीने चाचणी करून घेतली.

“शेती विभागाने योग्य त्या चाचण्या करून बाजरी, मुग, गवार यांसारखी कमी पाणी लागणारी पिके घ्यायची सुचना केली. आम्ही मुळात कोरफडाची शेती करत असूनही त्यांनी कोरफड घेण्याची सुचना कधीच केली नव्हती कारण जैसलमेर इथे कोरफडीला अजिबात मागणी नव्हती.” हरीश म्हणतो.

असे असूनही हरीशने काही ठिकाणी संशोधन करून परिश्रमपूर्वक कोरफडीला इन्टरनेट वरून स्थानिक आणि बाहेरील मार्केट शोधून काढले.

हरीशने सुरुवातीला त्याच्या एकंदर जमिनीपैकी फक्त १५-२० एकरांवर कोरफड लावली.

सुरुवातीची गुंतवणूक खूप जास्त लागली कारण कोरफडीची दर्जेदार रोपे महाग असतात.

पण ही रोपे लावल्यावर काही दिवसांतच या रोपांना छान धुमारे फुटले आणि त्यातून अनेकानेक छोट्या कोरफडी बाहेर पडू लागल्या.

यामुळेच सुरुवातीला लावलेली८०,००० रोपे थोड्याच दिवसांत ७,००,००० इतक्या प्रचंड संख्येत वाढली.

हरीश म्हणतो,” शेतकरी बहुतांशी वेळा त्याच्या कम्फर्ट झोन मधून बाहेर पडू इच्छित नसतो आणि त्यामुळे आधीच्या पिढ्यांनी केलेली शेतीच तो परत परत करत बसतो. पण आपल्या जमिनीचा कस दरवर्षी तपासणे आणि त्यानुसार उत्पन्न घेणे हा आधुनिक शेतीचा पहिला नियम आहे, जे मी केले आणि भरघोस उत्पन्न मिळवले.”

आपल्या शेतीत हरीशने कुठल्याही प्रकारची केमीकल खते किंवा पेस्टीसाईडस यांचा अजिबातच वापर केला नाही.

याउलट त्याने आपल्या शेतीत गायीच्या मलमूत्राचा उपयोग करून तयार केलेलं सेंद्रिय खत वापरले हे विशेष.

त्याच्याकडच्या २० गायी आणि शेजारपाजारच्या काही गायी यांपासून निर्माण केलेली खते हरीश आपल्या शेतामध्ये वापरतो.

हरीशची शेती ही ROCA (Rajasthan Organic Certification Agency) यांच्याकडून प्रमाणित अशी सेंद्रिय शेती आहे.

कोरफडीची शेती करायला सुरुवात केल्या केल्या पहिल्या सहा महिन्यातच हरीशने त्याच्या कोरफडीच्या गरासाठी राजस्थानातच १० गिऱ्हाईके मिळवली.

पण, काही काळातच त्याच्या लक्षात आले कि हे सगळेच जण त्याच्याकडून हा गर घेऊन बाहेरच्या बाजारात चढ्या दरात विकत होते. इथूनच त्याने आपल्या कोरफडीचा गर काढण्याची योग्य आणि शास्त्रीय प्रक्रिया संशोधन करून शिकून घेतली.

“ कोरफडीचा गर काढणे ही फार सोप्पी प्रक्रिया आहे. यंत्रांच्या मदतीशिवाय माणसे हाताने सुद्धा हा गर सहजपणे काढू शकतात. आपल्याला गर काढताना फक्त पूर्ण आणि उच्च दर्जाची स्वच्छता ठेवणे गरजेचे असते.” हरीश म्हणतो.

ही प्रक्रिया शिकल्यावर हरीशने आधीच्या १० जणांना कोरफडीची पणे देणे थांबवले आणि आपल्या स्वतःच्या शेतातल्या कामगारांनाच अधिक पैसे देऊन हा गर काढण्याचे परिपूर्ण प्रशिक्षण त्याने दिले.

आता गेल्या काही वर्षांमध्ये हरीशने अजून अनेक एकर जागा घेतली आहे आणि आता तो शेकडो एकर मध्ये कोरफडीची लागवड यशस्वीपणे करतो आहे. यासोबतच आंतरपीक म्हणून हरीश आता या शेतीत डाळिंबे, आवळा वगैरे पिक घेतो.

हरीशचा ठाम विश्वास आहे की पेशन्स ठेवून, संशोधन करून मिळवलेले ज्ञान हीच यशाची गुरुकिल्ली आहे आणि आज हा यशस्वी इंजिनिअर-शेतकरी इन्टरनेट वापरून आपल्या आसपासच्या शेतकऱ्यांना सुद्धा मार्गदर्शन करतो आहे.

तंत्रज्ञानाची अगदीच मर्यादित माहिती असणार्यांसाठी, इन्टरनेट वरून शासनाच्या अनेकानेक कर्जांच्या संदर्भातली पुस्तके आणि माहिती डाऊनलोड करून घेऊन तो ती आपल्या आजूबाजूच्या तरुण शेतकऱ्यांना पुरवतो आणि त्यांना या बाबतीत व्यवस्थित मार्गदर्शनही करतो.

\"नवनवीन तंत्रज्ञानाची कास धरणे , व्यवस्थित नियोजन करणे, संशोधन करून संधी आणि रिस्क घेणे या गोष्टींनी माझा फायदा मी कष्टपूर्वक करून घेतला आहे.

मला विश्वास आहे कि आपला प्रत्येक शेताल्कारी हा असा फायदा करून घेऊच शकतो. आज भारतातल्या माझ्या शेतकरी बंधूंनी त्यांच्या कम्फर्ट झोन मधून बाहेर पडून आता भीती सोडून देण्याचे दिवस आले आहेत. अस केले तर भारतीय शेतकऱ्यांचे आणि पर्यायाने भारतीय शेतीचे भविष्य उज्वल आहे.” 
हरीश शांतपणे सांगतो.

डॉ एपीजे अब्दुल कलामांच्या स्वप्नातला बलशाली भारत निर्माण करण्याचे स्वप्न ज्या शेतकऱ्यांच्या जोरावर आपण पाहत आहोत या भारतीय शेतकऱ्यांना आपल्या स्वतःच्या कल्पक अश्या उदाहरणाने एक असामान्य असा आदर्श घालून देणाऱ्या हरीश धनदेव या २४ वर्षीय इंजिनिअर आणि प्रगतीशील यशस्वी शेतकरी असलेल्या तरुणाचा आम्हांस अभिमान वाटतो आहे.

हरीश धनदेव, तुझ्या कर्तुत्वाला , तुझ्या भारतावरच्या प्रेमाला आणि तुझ्यावरील या संस्कारांना ‘टीम भारतीयन्स’चा मानाचा मुजरा.....

#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his ‘Mission 2020’ .