Bhartiyans

Menu

सर्जिकल स्ट्राईकच्या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कराने फडकवला जागतिक लष्करी स्पर्धेत तिरंगा

Date : 12 Nov 2016

Total View : 80

सर्जिकल स्ट्राईकच्या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कराने फडकवला जागतिक लष्करी स्पर्धेत तिरंगा, सुवर्णपदक पटकावत पाकिस्तानच्या हृदयात पुन्हा एकदा भरवली असेल दिवसाढवळ्या धडकी....


सारांश

जगातल्या सर्वात अवघड, आव्हानात्मक आणि प्रतिष्ठेच्या ब्रिटीश आर्मीतर्फे आयोजीत केल्या जाणाऱ्या लष्करी कवायतींच्या जागतिक स्पर्धेत भारतीय लष्कराच्या ‘गोरखा रायफल्स’ संघाने विलक्षण नेत्रदीपक कामगिरी करत सुवर्ण पदक पटकावले आहे. वेल्स इथल्या ब्रिटीश आर्मी कार्यालयाने ट्वीट केलेल्या एका व्हिडीओ मध्ये एकासविस्तर बातमी

सर्जिकल स्ट्राईकच्या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कराने फडकवला जागतिक लष्करी स्पर्धेत तिरंगा,
सुवर्णपदक पटकावत पाकिस्तानच्या हृदयात पुन्हा एकदा भरवली असेल दिवसाढवळ्या धडकी....
#Bharatiyans

जगातल्या सर्वात अवघड, आव्हानात्मक आणि प्रतिष्ठेच्या ब्रिटीश आर्मीतर्फे आयोजीत केल्या जाणाऱ्या लष्करी कवायतींच्या जागतिक स्पर्धेत भारतीय लष्कराच्या ‘गोरखा रायफल्स’ संघाने विलक्षण नेत्रदीपक कामगिरी करत सुवर्ण पदक पटकावले आहे.

वेल्स इथल्या ब्रिटीश आर्मी कार्यालयाने ट्वीट केलेल्या एका व्हिडीओ मध्ये एका शाही समारंभात ८-गोरखा रायफल्सच्या दुसऱ्या बटालियनच्या जवानांना सुवर्ण पदकाने आणि ‘कुकरी’च्या आलिशान स्मृतीचीन्हाने, गोरखा रायफलच्या गौरवशाली प्रतीकाने, गौरवण्यात आले आहे.

‘Cambrian Patrol’ ही एक दरवर्षी ब्रिटन मधल्या कॅम्ब्रियन पर्वतरांगांमध्ये ब्रिटीश आर्मीतर्फे आयोजित केली जाणारी, आंतरराष्ट्रीय लष्करी-गस्ती-पथकांची भयंकर अवघड स्पर्धा आहे जिथे जगातल्या अनेकानेक, एकापेक्षा एक दर्जेदार लष्करी सामर्थ्यांनी पूर्ण ताकतीने भाग घेतलेला असतो.

आजच्या काळातल्या जगातल्या सर्वच देशांतल्या लष्करी जवानांच्या कणखरपणाचा, शारीरिक चिवटपणा आणि मानसिक मजबुतीचा, युद्धनैपुण्यांचा आणि प्रत्यक्ष युद्धसदृश्य वातावरणात कणखर, जोमदार लष्करी हालचालींचा पराकोटीचा कस लागेल अशी ही विलक्षण अवघड स्पर्धा असते.

जगातल्या निवडक अवघड अश्या कॅम्ब्रियन पर्वतरांगांमध्ये ही स्पर्धा भरवली जाते. या स्पर्धेमध्ये ५५ किलोमीटर्सचा विविध अडथळ्यांनी भरलेला बिकट मार्ग लष्करी कवायतींच्या सहाय्याने आणि स्वतःची शस्त्रे घेऊन प्रतिस्पर्ध्यांना नेस्तनाबूत करत यशस्वीपणे पार करायचा असतो. या स्पर्धेमध्ये एक मिशन दिलेले असते आणि ते मिशन विविध देशांतल्या सैन्य-गस्ती-पथकांना ४८ तासांमध्ये आपल्या सर्व वैयक्तिक कीट आणि शस्त्रांसहीत पूर्ण करायचे असते.

या स्पर्धेमध्ये विविध लष्करी संघांना स्वतःचे कमीतकमी आणि शत्रूचे जास्तीतजास्त नुकसान करत कामगीरी फत्ते करायची असते आणि यामधल्या कार्यक्षमतेवर ठरलेले पॉईंट्स इथे दिले जातात. हे करत असताना त्यांच्या कीट मधले काहीही साहित्य हरवले तर ते तितक्याच वजनाच्या दगडांनी भरले जाते आणि इथे मात्र त्या संघाचे पॉईंट्स कापले जातात.

जवानांची लष्करी कौशल्ये, त्यांनी पूर्ण केलेल्या कामगिरीचा दर्जा, शत्रूशी केलेल्या समोरासमोरच्या आणि हातघाईच्या लढाईतली अचूकता, मारकक्षमता आणि गुणवत्ता, मानवनिर्मित आणि नैसर्गिक अडथळे पार करण्याची सैनिकांची क्षमता, कमीतकमी वेळात आणि कुणालाही थांग लागू न देता प्रथमोपचार करण्याचे कौशल्य, आकाशातून गस्त घालणाऱ्या आणि लक्ष ठेवणाऱ्या शत्रूला चकवण्याचे सामर्थ्य, IED भूसुरुंग आणि इतर संहारक अश्या शत्रूने पेरून ठेवलेल्या स्फोटकांना ओळखण्याची आणि नष्ट करण्याची हातोटी, गस्त घालण्याची आणि त्याचवेळी दडून मारा करण्याची शक्यता असलेल्या शत्रूला ओळखून नष्ट करण्याच्या पारंपारिक लष्करी हालचाली आणि त्यांची गुणवत्ता, युद्धकैद्यांना हाताळण्याची मानसिकता, हेलीकॉप्टर ड्रील्स, दूरसंचार साधनांचा शत्रूला थांगपत्ता लागू न देता केलेला प्रभावी वापर आणि तोफखान्याच्या नेमक्या ठिकाणांचा लावलेला शोध आणि त्याला टाळत पुढे जाण्याचे कौशल्य या आणि अश्या अनेकानेक कामगीरींवर या स्पर्धेत त्या त्या क्षेत्रातल्या तज्ञ व्यक्तींकडून मार्क्स दिले जातात.

जगभरातल्या अनेकानेक देशांच्या लष्करांनी भाग घेतलेल्या या स्पर्धेत भाग घेऊन भारतीय लष्कराचे प्रतिनिधत्व करणाऱ्या गोरखा रायफल्सने या स्पर्धेत आपले जागतिक अजिंक्यत्व आणि सर्वश्रेठत्व अधोरेखीत केले.

भारतीय लष्कराने पटकावलेल्या या सुवर्णपदकाने पुन्हा एकदा पाकिस्तान आणि चीनच्या लष्करशहांच्या हृदयात धडकी भरवली नसेल तरच नवल....

भारतीय लष्कराच्या आणि गोरखा रायफल्सच्या जवानांचा आम्हा टीम भारतीयन्स’ना आज पुन्हा एकदा विशेष अभिमान वाटतो आहे.

भारतीय लष्कराला आम्हां टीम भारतीयन्स’चा आणि सव्वाशे कोटी भारतीयांचा मानाचा शतशः प्रणाम

#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his ‘Mission 2020’ .

 

मिलिंद वेर्लेकर

टीम भारतीयन्स

बातमी सौजन्य

टाईम्स ऑफ इंडिया