Bhartiyans

Menu

दक्षिण कोरियामधील “जागतिक मार्शल आर्टस् मास्टरशीप २०१६” स्पर्धेमध्ये सुश्मिता रायने जिंकले ऐतिहासिक कांस्यपदक !

Date : 12 Nov 2016

Total View : 89

सुश्मिता राय पूर्व सिक्कीम मधील “माझितर” येथील रहिवासी आहे. दक्षिण कोरिया येथे आयोजित करण्यात आलेल्या “ऑलिम्पिक्स फॉर मार्शल आर्टस् २०१६” या स्पर्धेसाठी, जगभरातील ८७ देशांमधून २०७३ स्पर्धक आले होते.


सारांश

इतक्या व्यापक स्वरूपाची ही पहिलीच मार्शल आर्ट्स स्पर्धा होती. यामधे संपूर्ण जगभरातील राष्ट्रीय संघांनी भाग घेतला होता. एक आठवडाभर चाललेल्या या स्पर्धेत, भारतामधून एकूण १२ जणांची टीम निवडली गेली , ज्यात सुष्मिता राय ची निवड झाली. गेल्या वर्षी, पुण्यात झालेल्या “आशियाई किकबॉक्सिंग स्पर्धा २०१५” मधेहीसविस्तर बातमी

 

सुश्मिता रायला “जागतिक मार्शल आर्टस् मास्टरशीप” स्पर्धे मध्ये कांस्यपदक

 

दक्षिण कोरियामध्ये नुकतीच “जागतिक मार्शल आर्टस् मास्टरशीप” स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. आठवडाभर सुरु असलेल्या या स्पर्धेत १२ सदस्य सहभागी झाले होते. भारतीय क्रिडा क्षेत्रासाठी हि स्पर्धा ऐतिहासिक ठरली. ऐतिहासिक क्षण ठरलेल्या, या विजयाची शिल्पकार आहे सुश्मिता राय. तिला टिम भारतीयन्स चा मानाचा मुजरा...

 

सुश्मिता हि पूर्व सिक्कीम मधील “माझितर” येथील रहिवासी आहे. दक्षिण कोरिया मधील चेओनगजू,चुन्ग्चेओन्ग्बुक-दु येथे आयोजित करण्यात आलेल्या “जागतिक मार्शल आर्ट मास्टरशीप २०१६”, स्पर्धेमध्ये तिने हे कांस्यपदक पटकावले.

 

“ऑलिम्पिक्स फॉर मार्शल आर्टस्” या स्पर्धेसाठी, जगभरातील ८७ देशांमधून २०७३ स्पर्धक आले होते. इतक्या व्यापक स्वरूपाची ही पहिलीच मार्शल आर्ट्स स्पर्धा होती. यामधे संपूर्ण जगभरातील राष्ट्रीय संघांनी भाग घेतला होता.

 

एक आठवडाभर चाललेल्या या स्पर्धेत, भारतामधून एकूण १२ जणांची टीम निवडली गेली , ज्यात सुष्मिता राय ची निवड झाली. गेल्या वर्षी, पुण्यात झालेल्या “आशियाई किकबॉक्सिंग स्पर्धा २०१५” मधेही , पूर्व सिक्कीम मधील “कामारेय भास्मेय” ह्या गावातील मुष्टियोद्ध्याने रौप्य पदक जिंकले होते.

 

पदक घेऊन निघताना, निरोपाच्या वेळी सुश्मितानेे माजी भारतीय फुटबॉलपटू “श्री. भाईचुंग भुतिया” यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त केली.
तिने लिहिले आहे: \\" भाईचुंग धन्यवाद. ज्या काळात अत्यंत आवश्यकता होती, त्या काळात आपण मला जो आधार दिलात, त्या बद्दल मी आपली अत्यंत ऋणी आहे. मी आजवर आपल्याला एक उत्तम खेळाडू म्हणून ओळखत आले पण आज आपण “माणूस” म्हणूनही किती मोठे आहात हे लक्षात आले. तुम्ही दाखवलेल्या दयाशीलतेमुळे आणि सहृदयतेमुळे आज एक जीवन वाचले, उभे राहिले. मी आपली खूप खूप आभारी आहे. खूप कृतज्ञ आहे. \\"

 

दरम्यानच्या काळात सुश्मिताने, भविष्यासाठी अजूनही काही स्वप्ने पाहिली आहेत. सध्या ती सिक्किम सरकारच्या,ताडोन्ग-गंगटोक येथील कॉलेजमधे कलाशाखेमधे पदवीचा अभ्यास करते आहे. ती “रे व्हॅली इंटरनॅशनल स्कूल” येथे एक प्रशिक्षक म्हणूनही काम करते आहे.

 

सुष्मिताच्या उज्वल कारकिर्दीसाठी आपण तिला शुभेच्छा देऊयात. तिच्या कष्टांना आणि जिद्दीला टिम भारतीयन्सचा सलाम!

#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his ‘Mission 2020’ .

 

 

मिलिंद वेर्लेकर

टीम भारतीयन्स

बातमी सौजन्य