Bhartiyans

Menu

एक अनाहत सौंदर्य - रेश्मा कुरेशी

Date : 12 Nov 2016

Total View : 490

अॅॅसिड हल्ल्यातून वाचलेली भारतीय तरुणी रेश्मा कुरेशी हिने न्यूयाॅर्क फॅशन विक मध्ये रॅम्प वाॅक करुन हिंसक वृत्तीतून होणारे अॅसिड हल्ले या ज्वलंत समस्येबाबत जनजागृती केली.


सारांश

आपल्याला हवी असणारी वस्तू नाही मिळाली तर ती हिसकावून घ्यायची या हिंसक वृत्तीतून होणारे acid हल्ले हि एक मानसिक विकृती आहे. अशाच एका अॅॅसिड हल्ल्यातून वाचलेली भारतीय तरुणी रेश्मा कुरेशी हिने न्यूयाॅर्क फॅशन विक मध्ये रॅम्प वाॅक करुन या ज्वलंत समस्येबाबत जनजागृती केली. End Acid Sale या मोहिमेची रेश्मासविस्तर बातमी

\"एक अनाहत सौंदर्य - रेश्मा कुरेशी \"

नकार पचवण्याची तयारी नसणे, टोकाचा अहंकार आणि आत्मकेंद्रितता ह्या समाजातील फोफावणाऱ्या दुर्गुणांमुळे निर्माण झालेला \'स्त्री ही एक उपभोग्य वस्तु आहे\', हा दृष्टीकोन कधी बदलणार? आणि मग हवी ती वस्तूू नाही मिळाली तर ती ओरबाडून घ्यायची अशा हिंसक वृत्तीतून होणारे अॅसिड हल्ले ही एक मानसिक विकृती आहे. ही मानसिकता बदलण्यासाठी स्त्रीचा, तिच्या मताचा आदर करायला घरापासुनच सुरुवात केली पाहिजे, तरच मुलांना नकार पचवता येईल.

अॅॅसिड हल्ल्यातून वाचलेली भारतीय तरुणी रेश्मा कुरेशी हिने न्यूयाॅर्क फॅशन विक मध्ये रॅम्प वाॅक करुन या ज्वलंत समस्येबाबत जनजागृती केली.

मुंबईतील एका टॅक्सी ड्रायव्हरची मुलगी असलेल्या रेश्माच्या चेहऱ्यावर, २०१४ मध्ये तिचा मेहुणा आणि त्याच्या मित्रांनी अॅसिड फेकलं. अवघ्या १७ वर्षांच्या आनंदी, सुंदर मुलीचं आयुष्य त्या भयानक प्रसंगानं दुःखाच्या अंधाऱ्या खाईत लोटलं गेलं. आत्महत्या करुन हे नरक यातना देणारं जीवन संपवुन टाकावं, असं कितीतरी वेळा तिला वाटुन गेलं.

पण काळोख्या रात्री प्रकाशाचा किरण चमकावा तसा अनुभव तिला रीया शर्मा यांना भेटल्यावर आला.

\'Make Love, Not Scars\' या NGO च्या रीया शर्मा संस्थापिका आहेत. त्यांनी भारतामध्ये अॅसिडची खुलेआम विक्री बंद करण्याची मोहीम राबवली आहे. रेश्माला नैराश्यामधुन बाहेर काढण्यासाठी रीया शर्मा यांनी सर्व प्रयत्न केले.

२०१५ मध्ये \'End Acid Sale\' या अॅसिड विक्रीचा विरोध करणाऱ्या मोहिमेची प्रतिनिधी म्हणून रेश्माची नियुक्ती झाली. खुलेआम होणारी अॅसिड विक्री समाजासाठी किती घातक आहे, हा संदेश लोकांपर्यंत पोचवण्यासाठी त्यांनी छोट्या छोट्या व्हिडीओज चा वापर केला.याच मालिकेमधिल तिचा रेड लिपस्टीक व्हिडीओ जगभरातूून जवळ जवळ १५ लाख लोकांनी पाहिला.

त्यानंतर FTL Moda ने (जे त्यांच्या विविध प्रकारच्या माॅडेल्स साठी ओळखले जाते), रेश्माला त्यांच्या प्रेझेंटेशन साठी बोलावले. सुप्रसिद्ध भारतीय फॅशन डिझायनर अर्चना कोच्चर हिने डिझाईन केलेल्या आदिवासी प्रिंट असलेल्या पांढरयाशुभ्र ड्रेसमधिल रेश्माच्या कॅट-वाॅक मुळे सारया जगाचं लक्ष भारतामधल्या सध्याच्या या महत्वाच्या ज्वलंत विषयाकडे वेधलं गेलं.

स्त्रीचं सौंदर्य म्हणजेच तिचं सर्वस्व आहे आणि तेच जर नष्ट केलं तर ती आयुष्यातुन उठेल असा समज असलेल्या लोकांना रेश्माच्या या रॅम्प-वाॅक ने चांगलीच चपराक बसली आहे. अश्या धाडसी आणि कर्तुतत्ववान रेश्माला भारतीयनस् टीमचा मानाचा मुजरा!!


** Team Bharatiyans **

#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his ‘Mission 2020’ .

 

सुमेधा देशपांडे

टीम भारतीयन्स

बातमी सौजन्य

सौजन्य - इंडिया टुडे