Bhartiyans

Menu

पोलिसांबद्दल सामान्य माणसाचे मत काही बरे नसते! पण हे सायकलवाले पोलीसमामा एकदम चित्रपटात शोभतील!

Date : 12 Nov 2016

Total View : 147

तुम्ही रस्त्याने चालला आहात...अचानक तो मोटारसायकल वरून येतो...तुमची चेन खेचतो आणि निघून जायला लागतो....पण समोर असलेल्या गाड्यांच्या गर्दीत थोडासा अडकतो......आणि तेव्हढ्यात शेजारच्या गल्लीतून सायकलवरून


सारांश

बहुतेक चित्रपटांमध्ये रंगवलेली पोलिसांची व्यक्तिरेखा आणि आपल्याला कधी ना कधी आलेले एकूण अनुभव, ह्यामुळे पोलिसांबद्दल सामान्य माणसाचे मत काही फार बरे नसते! अर्थात ह्यालाही काही पोलीस अपवाद आहेतच. अशाच एका अपवादात्मक पोलिसाची कथा आज आपण पाहूयात. चेन्नई : “चेन्नई शहर पोलिसांचा लोगो” आणि “सायरन” असलेल्यसविस्तर बातमी

 

तुम्ही रस्त्याने चालला आहात....आणि अचानक तो मोटारसायकल वरून येतो...तुमची चेन खेचतो आणि निघून जायला लागतो....पण समोर असलेल्या गाड्यांच्या गर्दीत थोडासा अडकतो.......

 

आणि तेव्हढ्यात शेजारच्या गल्लीतून सटकन सायकलवरून एक पोलिसमामा येतो...सायकल असल्याने सहज पुढे घुसून या साखळी-चोराची गचांडी धरतो....

 

भन्नाट आहे ना सगळ हे....सायकलमुळे अगदी वेळेवर मदतीला पोचणारे पोलीस........
\\" Bharatiyans \\"

 

बहुतेक चित्रपटांमध्ये रंगवलेली पोलिसांची व्यक्तिरेखा आणि आपल्याला कधी ना कधी आलेले एकूण अनुभव, ह्यामुळे पोलिसांबद्दल सामान्य माणसाचे मत काही फार बरे नसते!

 

अर्थात ह्यालाही काही पोलीस अपवाद आहेतच. अशाच एका अपवादात्मक पोलिसाची कथा आज आपण पाहूयात.

 

चेन्नई : “चेन्नई शहर पोलिसांचा लोगो” आणि “सायरन” असलेल्या, हिरव्या रंगाच्या सायकलवर वॉकी-टॉकी घेऊन एक पोलीस “मैलापूर” मधील “पल्लाकुमानगर” येथील गाल्लीबोळामधून फिरत असतो.

 

आणि मग “येत्तैः” (`yettaiah\\') ह्या शब्दाच्या ध्वनी-प्रतिध्वनीने तिथले वातावरण गजबजून जाते.

 

पोलीस हेड कॉनस्टेबल श्री. जी. पेरूमल, एका हातात दंडुका आणि चेहऱ्यावर स्मितहास्य घेऊन हे सर्व करत असतात.

 

ह्या फेरीमध्ये कधी ते नवऱ्या बरोबर भांडण झालेल्या बाईची विचारपूस करतात तर कधी कोडाईकॅनॉल ला ट्रिपला निघालेल्या मनुष्याची चौकशी करतात.

 

श्री. पेरूमल हे रात्री उशिरा आणि दुपारी गस्त घालण्याची जबाबदारी देण्यात आलेल्या चेन्नईमधील एक हजार पोलिसांपैकी एक आहेत.

 

साधारण एक महिन्यापूर्वी मुख्यमंत्री जयललिता यांनी शहर पोलीसांना २५० सायकली दिल्या.

 

त्यानंतर हे पोलीस कायद्याच्या अंमलबजावणीच्या दोन पावले पुढे जाऊन लोकांना मदत करताहेत. भीती वाटण्यापेक्षा आता ते लोकांना एका सहृदय संरक्षकासारखे वाटायला लागले आहेत.

 

लोकांशी संवाद साधण्याचे स्वतःचे कौशल्य वापरून त्यांनी लोकांच्या मनात विश्वास निर्माण केला आहे. त्यामुळे लोकही आता पोलिसांच्या कामात त्यांना मदत करू लागले आहेत, जसे की संशयास्पद गोष्टी / हालचाली त्यांना कळवणे किंवा स्थानिक गुंडांबद्दल त्यांना माहिती पुरवणे इ.

 

श्री. पेरूमल असेच एकदा मार्गक्रमणा करत होते, तेंव्हा दोन तरुण समोर आले आणि त्यांनी पेरूमल यांना व्हॉटसप मेसेज दाखवला. मग त्यांनी एकमेकांना फोन नंबर दिले आणि ते पुढे निघाले.

 

तेव्हढ्यात त्यांना श्री. मुरुगन यांनी त्यांच्या चहाच्या दुकानात बोलावले. अजून काही लोक तिथे आले आणि मग गप्पा सुरु झाल्या. आणि मग बोलता बोलताच दारूच्या अवैध विक्री बद्दल पेरूमल यांना माहिती मिळाली.

 

एक दोन स्थानिक लोकांनी ह्या धंद्यात कोणाचा हात आहे हे देखील सांगितले आणि मग त्या लोकांवर कारवाई करण्याचे आश्वासन देऊन पेरूमल तेथून निघाले.

 

मग त्यांनी त्यांच्या एका सहकार्याला वॉकी-टॉकी वरून ह्या बद्दल माहिती दिली. काही मिनिटातच अजून एक हवालदार तिथे चाललेल्या घडामोडींचा आढावा घ्यायला तिथे येऊन पोहोचला देखील !

 

पेरूमल जिथे जिथे जातात, मग ते देऊळ असो अथवा निवासी इमारत असो, तिथून ते नवीन कोण राहायला आलय का? किंवा किती घरांना सध्या कुलूप लाऊन बंद ठेवण्यात आलय इ. माहिती गोळा करतात.

 

फक्त माहिती गोळा करून ते थांबत नाहीत तर, सर्वांना सुरक्षितते विषयी सूचनाही देतात. दुकानदारांनी दुकानांमध्ये सी.सी.टी. व्ही. कॅमरे सतत चालू ठेवावेत ह्यासाठी ते त्यांना प्रोत्साहित करतात.

 

तसेच स्त्रियांनी साखळी चोरांपासून सावध राहावे हेही ते आवर्जून सांगतात.

 

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की सायकलवरच्या पोलिसांच्या भूमिकेतला हा बद्दल हेतूपुर:सर करण्यात आला आहे.

 

ते म्हणाले, “सायकलवरून गस्त घालण्याचा उद्देश साखळी चोरांना पकडणे हा नाहीये. तर उपयुक्त माहिती गोळा करणे ही त्या मागची कल्पना आहे.”

 

काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना असेही वाटते की सायकल वापरल्यामुळे पोलीस जास्त सतर्क रहातात, लोकांशी त्यांचे संबंध जास्त मैत्रीपूर्ण रहातात. तसेच मोटर बाईक वरून झरकन जाण्यापेक्षा सायकल मुळे पोलीस शहरातल्या गल्ली-बोळामध्ये तसेच छोट्या छोट्या गोष्टींपर्यंतही नीट पोहोचू शकतात.

 

मैलापूर चे डेप्युटी कमिशनर व्ही. बालकृष्णन म्हणाले की ह्या संकल्पनेमुळे पोलीस लोकांना जास्त जवळचेही वाटतात.

 

पोलिसांच्या ह्या बदलत्या भूमिकेमुळे लोकांमध्ये त्यांच्या बद्दल विशवास निर्माण होऊन , कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट होईल अशी अपेक्षा ठेवायला आता हरकत नाही!

#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his ‘Mission 2020’ .

 

मिलिंद वेर्लेकर

टीम भारतीयन्स

बातमी सौजन्य