Bhartiyans

Menu

स्तनाचा कॅन्सर या विषयावर संशोधन केले आहे एका १६ वर्षीय भारतीय मूळ असलेल्या विद्यार्थ्याने!

Date : 12 Nov 2016

Total View : 194

“कॅन्सर” हा शब्द नुसता ऐकला जरी तरी प्रत्येकाच्याच मनात एक अनामिक भीती निर्माण होते आणि हे अगदी सहाजिक आहे. कारण कॅन्सर म्हणजे अत्यंत वेदनादायी मृत्यू हेच मनात पक्क आहे.


सारांश

कर्टीन निथ्यानंदम त्याच्या पालकांबरोबर इंग्लंडला जाऊन स्थायिक झाला. या तरुण वैज्ञानीकाचे असे म्हणणे आहे की “ज्या पेशीचे वर्गीकरण करता येत नाही अशा प्रकारच्या कॅन्सरचे, मुळातच रोगनिदान करता येत नाही. परंतू तिहेरी नकारात्मक प्रकारच्या स्तनाच्या कर्करोगावर योग्य प्रकारचे उपचार करून, पारंपारिक औषधांना आसविस्तर बातमी

 

कॅन्सर (कर्करोग) एक जागतिक दु:स्वप्नी भयगंड ,
आणि जगाच्या पाठीवर महिलांना ग्रासलेला एक भयंकर मोठा विषय म्हणजे स्तनाचा कॅन्सर.
एका निव्वळ १६ वर्षीय भारतीय मूळ असलेल्या विद्यार्थ्याने या विषयावर जगाला तोंडात बोट घालायला लावणारे संशोधन केले आहे, त्याचीच ही कथा....
#Bharatiyans

 

कॅन्सर, हा शब्द नुसता ऐकला जरी तरी प्रत्येकाच्याच मनात एक अनामिक भीती निर्माण होते आणि हे अगदी नैसर्गिक, साहजिक आहे कारण कॅन्सर म्हणजे अत्यंत वेदनादायी मृत्यू हेच आपल्या सर्वांच्या मनात पक्क झालं आहे.

 

पण लंडन मधील भारतीय वंशाच्या अवघ्या १६ वर्षांच्या एका मुलाने असा दावा केला आहे की औषधाला प्रतिसाद न देणार्या एका प्रकारच्या भयंकर अशा स्तनाच्या कॅन्सरवर त्याला उपचार सापडले आहेत !

 

कर्टीन निथ्यानंदम त्याच्या पालकांबरोबर इंग्लंडला जाऊन स्थायिक झाला. या तरुण वैज्ञानीकाचे असे म्हणणे आहे की तथाकथित “तिहेरी नकारात्मक प्रकारच्या स्तनाच्या कर्करोगावर योग्य प्रकारचे उपचार करून या कर्करोगाला, जो पारंपारिक औषधांना आणि उपचारांना अजिबात प्रतिसाद देत नाही, औषधांना प्रतिसाद देणारया कर्करोगात बदलता येऊ शकते.”

 

बऱ्याच प्रकारचे स्तनाचे कर्करोग हे इस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरॉन अथवा शरीराच्या वाढीला कारणीभूत असणारी रसायाने ह्याच्या सहाय्याने वाढतात. त्यामुळे “टॅमोक्सिफेन” हे एकच औषध शरिरातील कॅन्सर पेशींची वाढ रोखू शकते.

 

परंतु तिहेरी नकारात्मक प्रकारच्या स्तनाच्या कर्करोगान्च्या पेशीमधे हे औषध ग्रहण करण्याची क्षमताच नसते. त्यामुळे त्यावर उपाय म्हणून शस्त्रक्रिया, किरणोत्सर्ग आणि रासायनिक उपचार ह्याचेच सहाय्य घ्यावे लागते. 
पण पेशंटच्या शरीराला हे सर्व झेपणे अवघड असल्याने, या उपचारांदरम्यान पेशंट वाचण्याची शक्यता कमी होते.

 

“मुळात मी ‘उपचाराला प्रतिसाद न देणाऱ्या कर्करोगाना’, “उपचाराला प्रतिसाद देणार्या कर्करोगामधे” रुपांतरीत करण्यासाठी प्रयत्न करत होतो. बहुतेक कर्करोगांच्या पेशीच्या पृष्ठभागावर “टॅमोक्सिफेन” ग्रहण करू शकणारे “रिसेप्टर्स” असतात.

 

परंतु “तिहेरी नकारात्मक प्रकारच्या कर्करोगाच्या” पेशींमध्ये हे “रिसेप्टर्स” नसल्याने हे औषध काम करू शकत नाही.” कर्टीन म्हणतो.

 

“ज्या पेशीचे वर्गीकरण करता येत नाही अशा प्रकारच्या कॅन्सरचे, मुळातच रोगनिदान करता येत नाही. हे स्त्रियांसाठी अत्यंत धोकादायक आहे. त्यामुळे किमान तशा प्रकारच्या पेशींचे रुपांतर, उपचाराला प्रतिसाद देऊ शकतील अशा पेशींमध्ये करणे, हे माझ्या संशोधनाचे मुख्य उद्दिष्ट होते.

 

‘आय.डी.४’ प्रकारच्या प्रथिनांमुळे (प्रोटीन) मूळ पेशींच्या (स्टेम सेल) कॅन्सरचे वर्गीकरण करणे शक्य होत नाही. त्यामुळे शरिरातील हे प्रोटीन “ब्लॉक” करावे लागते.

 

ज्या जनुकांमुळे ‘आय.डी.४’ हे प्रथिन निर्माण होते, त्यांना सुप्तावस्थेत टाकण्याचा मार्ग मला सापडला आहे. त्यामुळे कॅन्सरचे कमी धोकादायक स्थितीत रुपांतरण करणे शक्य होते आहे.” कर्टीन आत्मविश्वासाने सांगतो.

 

तिहेरी नकारात्मक प्रकारच्या कॅन्सरच्या उपचारांना काही स्त्रिया उत्तम प्रतिसाद देतात तर काही स्त्रियांच्या बाबतीत अजिबात प्रतिसाद मिळत नाही.

 

मुळात कॅन्सरपेशींचे वर्गीकरण होऊ शकते की नाही, ह्यावर ते अवलंबून आहे.

 

कॅन्सरच्या ज्या पेशींचे वर्गीकरण करता येते, त्या पेशी, निरोगी पेशींसारख्याच दिसतात. त्यांचे विभाजन आणि वाढ अत्यंत सावकाश होते. तसेच त्या कमी आक्रमक असतात.

 

पण ज्या कॅन्सरपेशींचे वर्गीकरण करता येत नाही, त्या प्राथमिक प्रारुपातच रहातात. त्यांना ओळखणं शक्यच होत नाही आणि मग अचानक त्या वेगाने वाढतात, विभाजित होतात आणि मग त्यांचे रुपांतर भयानक अशा मोठ्या गाठीमधे (ट्युमर) होते.

 

कर्टीनने अजून एक शोध लावला आहे. कॅन्सरच्या गाठीना मारक अशा ‘पिटेन ह्या जनुकाच्या क्रियाशीलतेमधे जर वाढ केली, तर किरणोत्सर्ग आणि रासायनिक उपचार अधिक चांगल्या पद्धतीने काम करू शकतात. त्यामुळे जर ह्या दोन्ही गोष्टी एकदम केल्या तर पारंपारिक औषधांपेक्षा, हे उपचार आधी परिणामकारक ठरू शकतात.

 

त्याच्या ह्या उपचार पद्धतीचे, इंग्लंड मध्ये प्रसिद्ध असलेल्या आणि तरुण शास्त्रज्ञाना अश्या प्रकारचे काम करण्यासाठी प्रवृत्त करून उत्तेजन देणारा कार्यक्रम \\' द बिग बँग फेअर\\' साठी अंतिम नामांकन झाले.

 

मागच्या वर्षी देखील या भारतीयाचे नाव ठळक बातम्यामधे तेव्हा आले जेव्हा “अल्झायमरची लक्षणे लवकर ओळखता येतील आणि त्यांचा प्रसार थांबवता येईल”, ह्यासाठी चाचणी पद्धत विकसित करून, त्याने ‘जागतिक गुगल सायन्स फेअर’ जिंकली होती.

 

अमेरिका देत असलेला ‘सायंटिफीक अमेरीकन इनोव्हेटिव्ह पुरस्कार’सुद्धा या भारतीयाने पटकावलेला आहे.

 

सध्या शाळेच्या प्रयोगशाळेमध्ये आणि त्याच्या घराच्या बेडरुममध्ये या भारतीय युवकाने विकसित केलेल्या असंख्य गोष्टींमध्ये आणि उपकरणांमध्ये तो हे प्रयोग करत असतो परंतु गेल्या वर्षीच्या त्याला मिळालेल्या जागतिक दर्जाच्या ‘गुगल सायन्स फेअर’च्या पुरस्कारामुळे आता त्याने जागतिक दर्जाच्या प्रचंड मोठा आवाका असणाऱ्या मेडिसिन कंपन्यांना त्याच्या तंत्रज्ञानाकडे आणि कुशाग्र बुद्धीकडे आकर्षीत केले आहे.

 

त्याच्या प्रखर बुद्धिमत्तेच्या आणि आकलनशक्तीच्या जोरावर, इतक्या लहान वयात त्याने जे संशोधन कार्य केले आहे त्याला टीम भारतीयन्सचा सलाम आणि पुढील वाटचालीसाठी सव्वाशे कोटी शुभेच्छा !

#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his ‘Mission 2020’ .

 

मिलिंद वेर्लेकर

टीम भारतीयन्स

बातमी सौजन्य