Bhartiyans

Menu

एका आदिवासी खेड्याची साक्षरता मोहीम...!

Date : 12 Nov 2016

Total View : 420

पूर्व सिंघभूम तालुक्यातील, माओवाद्यांनी पिडीत पतंबडा ब्लाॅक मधिल


सारांश

जमशेदपूर येथिल घुसरा नावाच्या एका आदिवासी खेड्याची हि कथा.या छोट्याशा गावानं १५ नोव्हेंबर पर्यंत १००% साक्षर होण्याची मोहीम राबवली आहे. या योजने अंतर्गत असे ठरले आहे कि गावातील प्रत्येक शिक्षित माणसाने इतर अशिक्षित लोकांना शिकवण्याची जबाबदारी घ्यावी. १००% साक्षरतेच्या दिशेनं वाटचाल करणाऱ्या या गावाचसविस्तर बातमी

\"चला शिकु आणि शिकवुया, एक विकसित भारत घडवुया!!\"

एका आदिवासी खेड्याची साक्षरता मोहीम...
#Bharatiyans

जमशेदपुर ---पूर्व सिंघभूम तालुक्यातील एक आदिवासी खेडे साक्षरतेच्या दिशेने वाटचाल करत आहे. माओवाद्यांनी पिडीत पतंबडा ब्लाॅक मधिल \"घुसरा\" नावाचे एक खेडे. गावाची लोकसंख्या साधारणपणे १००० आहे. २०११ सालच्या मोजणीप्रमाणे ४१% साक्षरता असलेल्या या गावाने १५ नोव्हेंबर पर्यंत १००% साक्षर होण्याची मोहीम राबविली आहे.

गावातील महिला आता अंगठ्याच्या जागी स्वतःची सही करु लागल्या आहेत.साठीच्या पुढची रेवती म्हणते कि, जवळ जवळ ४० मिनटांच्या शिकवणी नंतर तिला स्वतःची सही करता येऊ लागली. याबद्दल ती स्थानिक प्रभागीय सदस्य अमित कुमार यांची आभारी आहे.

रेवती ने एका कागदावर १०० वेळा सही करुन अंगठाबहाद्दर ते साक्षर हा प्रवास मोठ्या आनंदाने दाखवला. तिच्या या कृतीला गावकर्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात प्रतिसाद दिला. तालुक्यातील (District Public Relations Officer - DPRO) संजय कुमार यांच्या पुढाकाराने गावातील २१३ घरांनी अंतिम तारखेच्या आत लक्ष्य पूर्ण करण्याचे ठरविले आहे.

श्री कुमार म्हणाले ,\" आम्ही लोकांना कुठलीही शैक्षणिक साधने कमी पडणार नाहीत याची काळजी घेत आहोत. जसे पेन,पेन्सिल ,हिंदी वर्णमाला पुस्तके इ.\"
या योजने अंतर्गत असे ठरले आहे कि गावातील प्रत्येक शिक्षित माणसाने इतर अशिक्षित लोकांना शिकवण्याची जबाबदारी घ्यावी. शाळा आणि काॅलेज मध्ये शिकणाऱ्या मुला-मुलींनी त्यांचे पालक व आजी-आजोबांना शिकवावे.

घुसरा गाव, जिथे फक्त २६.४९% महिला साक्षर आहेत, अशा गावातील एक मध्यमवयीन महिला, सुमन मार्दी म्हणते कि या वयात अक्षर ओळख होणें हे तिच्यासाठी नक्कीच अभिमानास्पद आहे.

गावाचे ग्राम प्रधान गंगाधर सिंह म्हणतात,\" ज्या गावातील सर्व लोक शिक्षित होण्याचा प्रयत्न करत आहेत अशा गावाचा मुख्य असणे हा मोठा बहुमान आहे.\"
ग्राम शिक्षा समिती (GSS) च्या कार्यकर्त्यांनी उरलेल्या ६०% गावकरयांना साक्षर करण्यासाठी कंबर कसली आहे.

सर्व गावकरी जर साक्षर झाले तर शासनाच्या लोककल्याणकारी योजना त्यांच्यापर्यंत पोहचवणे सोपे होईल, असे GSS कार्यकर्ते म्हणतात.


** Team Bharatiyans**

#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his ‘Mission 2020’ .

 

सुमेधा देशपांडे

टीम भारतीयन्स

बातमी सौजन्य

सौजन्य - Times of India