Bhartiyans

Menu

कधी कधी लहान मुलं देखील मोठ्यांना लाजवेलं असं काम करुन जातात.

Date : 13 Nov 2016

Total View : 360

भोपाळला राहणाऱ्या दोन लहान मुलांनी आपल्याला मिळालेले शिष्यवृत्तीचे आणि पोकेटमनी चे पैसे शाळेच्या स्वच्छतागृहासाठी वापरले


सारांश

मेमुनाखानआणि आमीर खान या भोपाळला राहणाऱ्या १६ आणि १५ वर्षाच्या मुलांनी त्यांना मिळालेले शिष्यवृत्तीचे पैसे खर्च न करता शाळेच्या स्वच्छतागृहासाठी वापरले.इतक्या लहान वयात ही समज असणं हि कौतुकाची बाब आहे.आधुनिक भारताच्या या छोट्या सुजाण नागरीकांचं मोठ्यांना लाजवेल असा कामसविस्तर बातमी

कधी कधी लहान मुलं देखील मोठ्यांना लाजवेलं असं काम करुन जातात.

वाढदिवसाला किंवा इतर कारणाने लहान मुलांना जर कोणी पैसे दिले तर ती अगदी खुष होतात आणि लगेच त्यांचं प्लॅनिंग सुरु होतं की आता या पैशातून काय घ्यायचं अन काय करायचं.

मेमूना खान, वय १६ आणि तिचा भाऊ आमीर खान,वय १४, ही भोपाळला राहणारी मुलं.

मेमूना ११ वीत आहे तर आमीर १० वीत.

अल्पसंख्यांक म्हणून त्यांना शिष्यवृत्ती मिळाली आहे. 
ही मुले ते पैसे अगदी सहजपणे सिनेमा,बर्गर आणि आइस-क्रीम वर खर्च करु शकले असते.

पण त्यांनी ते साठवले शिवाय त्यात स्वतःचे असेच वेळोवेळी कुणीकुणी दिलेले २००० रुपये घातले आणि आता ही सगळी रक्कम त्यांनी मध्य प्रदेशातील नरसिंगपूर जिल्ह्यातील महाराणी लक्ष्मीबाई मुलींच्या शाळेत शौचालय बांधण्यासाठी दिली.
या शाळेत फक्त एकच शौचालय असल्यामुळे मुलींना खूप वेळ रांगेत थांबावं लागत असे.

या दोघांनाही मिळालेल्या शिष्यवृत्तीच्या ८००० रुपयांमधे त्यांनी स्वतःजवळचे २००० रुपये घातले. त्यांचा उत्साह बघुन त्यांच्या वडिलांनी सुद्धा त्यात आपले १४५०० रुपये दिले.

ही सामाजिक जाणीव मेमूना मधे पहिल्यापासूनच आहे.
२०११ मधे तिने मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना पत्र लिहीलं होतं. 
त्या पत्रात त्यांना \'मामाजी\' असं संबोधन करुन तिने तिच्या शाळेकडे जाणारा रस्ता बांधण्याची विनंती केली होती.

चौहान यांनी या पत्राची त्वरीत दखल घेतली आणि तिच्या पत्राला उत्तर देताना ते म्हणाले की \" भांजीयोंकी बात मै कैसे टाल सकता हुँ भला?\" आणि रस्ता बांधण्यासाठी निधी मंजूर झाला होता आणि रस्ताही बांधून तयार झाला होता.

आधुनिक भारताच्या या छोट्या सुजाण भारतीयन्स नागरीकांना ‘टीम भारतीयन्स’चा मानाचा मुजरा.


टीम भारतीयन्स 

#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his ‘Mission 2020’ .