Bhartiyans

Menu

आकांक्षापुढती गगन ठेंगणे

Date : 13 Nov 2016

Total View : 474

उदयोन्मुख होतकरू व्यावसायिक अनेक नाविन्यपूर्ण कल्पना घेऊन आता निरनिराळ्या व्यवसायात उतरत आहेत.कॉलेज च्या व्यावसायिक गटाकडून त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत आहे.


सारांश

नाविन्यपूर्ण व्यवसाय हा फक्त IIT किंवा IIM च्या विद्यार्थ्यांपुरता न राहता आता इतर कॉलेज चे विद्यार्थी सुद्धा अनेक निरनिराळ्या कल्पना घेऊन व्यवसाय सुरु करतआहेत.कॉलेजच्या E-cell कडून त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत आहे.३ Idiots या चित्रपटातील रॅन्चोची आठवण करुन देणारे हे होतकरु युवा व्यावसायिक देशाच्यासविस्तर बातमी

तुमच्या घरातल्या चपला, शूज जुने झाले,खराब झाले की तुम्ही त्याचं काय करता ?
कचऱ्यात फेकून देता ना ?

आता तुमचे जुने शूज, चपला किंवा तत्सम वस्तू फेकून देऊ नका ? त्याऐवजी त्यांचा मेक ओव्हर करवून घ्या आणि ते एखाद्या गरजू पर्यंत पोचवा.

नाविन्यपूर्ण व्यावसायिक कल्पना ही आता फक्त IIT आणि IIM च्याच विद्यार्थ्यांची मक्तेदारी राहिली नाहिये. इतर कॉलेजेसच्या उदयोन्मुख होतकरु विद्यार्थी व्यावसायिकांनी थिम रेस्टॉरंट, सोशल मिडीया मार्केटिंग अशा अनेक व्यवसायांमधे यशस्वी पदार्पण केलं आहे.

जयहिंद कॉलेजच्या तिसरया वर्षाचा विद्यार्थी असणारा श्रीयंस भंडारी हा एक ऍथलीट खेळाडू. आधी तो त्याचे स्पोर्ट शूज ४ महिने वापरुन फेकुन देत असे. असे एका वर्षी त्याने किमान १०/१५ जोड फेकून दिले.

अचानक त्याच्या डोक्यात आलं की हे शूज आपण फेकून देण्यापेक्षा याचं काहीतरी चांगलं करून आपण ती नवी गोष्ट एखाद्या गरजूला देऊ शकलो तर?

या त्याच्या कल्पनेने नंतर चांगलाच जम बसवला आणि आता आता तो त्यापासून eco- friendly स्लिपर्स बनवतो.

कॉलेजच्या व्यावसायिक गटाचा भाग असणारा भंडारी सांगतो की दर वर्षी स्पोर्ट शूज चे किमान ३५० लाख जोड फेकून दिले जातात. पण गरीबीमुळे कित्येक लोक साध्या चपला सुद्धा विकत घेऊ शकत नाहित. बाकी सुखसुविधा सोडून देऊ पण या पायात चप्पल नसणाऱ्या गरिबांना किमान पायात साधीशीच का होईना चप्पल मिळाली तरी त्याचं आयुष्य नक्कीच सुखकर होऊ शकेल.

भंडारी आणि त्याचा मित्र रमेश धामी या गोष्टीने प्रेरीत झाले आणि फेकून दिलेल्या शूज पासून त्यांनी स्लिपर्स बनवायला सुरवात केली. 
त्यासाठी आता \' कदम- बाय- कदम नावाचा प्रकल्प त्यांनी सुरु केला आहे.

जयहिंद कॉलेजच्या व्यावसायिक गटाच्या ( E-cell ) संचालक असणारया हसिना सय्यद सांगतात,\" आमच्याकडे असे खूप हुशार विद्यार्थी आहेत ज्यांच्याकडे नाविन्यपूर्ण कल्पना आहेत ज्यांना योग्य दिशा मिळण्याची गरज आहे. 
आम्ही नियमितपणे विद्यांर्थ्यांची आणि गुंतवणूकदार आणि व्यावसायिकांची भेट घडवतो. त्यामुळे विद्यांर्थ्यांना त्यांच्या कल्पना अमलात आणायला मदत होते.”

स्वतःच्या मालकीचं एखादं रेस्टॉरंट असावं असं बरयाच जणांचं स्वप्न असतं. पण यश चांदी, जयहिंद कॉलेजचाच अजुन एक विद्यार्थी हा \'Go Panda\' नावाच्या एका fusion restaurant चा मालक आहे. हे रेस्टॉरंट अंधेरीला आहे.

याचबरोबर चांदी आणखी २ व्यवसाय यशस्वीपणे चालवतोय.
नाइट क्लब साठी केटरींग करणारी मार्केटिंग कंपनी व सोशल मिडीया मार्केटिंग कंपनी.

चांदी म्हणाला,\"E-cell चा माझ्या या यशात महत्वाचा हात आहे\". KC कॉलेज मधले अनेक विद्यार्थी अशाच अनेक नाविन्यपूर्ण व्यावसायिक कल्पना घेऊन व्यवसाय सुरु करत आहेत.

राहील पारीख या काॅॅम्प्युटर सायन्सच्या विद्यार्थ्याने \'Infydream\' नावाची कंपनी सुरु केली आहे. ज्यात ते मुलांच्या जन्मापासून ते ५ वर्षांपरयंतच्या अनेक सुखद आठवणी फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून जतन करतात.

\"मुलांना बालपणीच्या अगदीच अंधुक आठवणी असतात. Infydreams च्या माध्यमातून आम्ही मुलांना आणि त्यांच्या पालकांना आयुष्यभर जतन होणारा आठवणींचा ठेवा देत आहोत.\"

३ Idiots या चित्रपटातील रॅन्चोची आठवण करुन देणारे हे होतकरु युवा व्यावसायिक देशाच्या प्रगतीत महत्वाचा वाटा उचलतील अशी आशा उराशी बाळगून टीम भारतीयन्स त्यांना लाख लाख शुभेच्छा देत आहे.टीम भारतीयन्स 
 

#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his ‘Mission 2020’ .