Bhartiyans

Menu

अपंगत्व? श्या ... असं काही नसतं ...

Date : 13 Nov 2016

Total View : 214

काही वैद्यकीय कारणांमुळे दोनही हात गमावलेला आपल्यातीलच एक सामान्य मनुष्य असामान्य निश्चयाने अपंगत्वावर मात करतो आणि ड्रायविंगच्या सर्व कठीण परीक्षा पार करून, लायसन्स मिळवून लेह लडाख सारख्या कठीण प्रवा


सारांश

काही वैद्यकीय कारणांमुळे दोनही हात गमावलेला आपल्यातीलच एक सामान्य मनुष्य असामान्य निश्चयाने अपंगत्वावर मात करतो आणि ड्रायविंगच्या सर्व कठीण परीक्षा पार करून, लायसन्स मिळवून लेह लडाख सारख्या कठीण प्रवासासाठी स्वतः बनवलेली कार ड्राईव्ह करून जायचा निश्चयही करतो. स्वतःचा व कुटुंबाचा उदरनिर्वाह कोणावरहीसविस्तर बातमी

अपंगत्व? श्या ... असं काही नसतं ... काही वैद्यकीय कारणांमुळे दोनही हात गमावलेला आपल्यातीलच एक सामान्य मनुष्य असामान्य निश्चयाने अपंगत्वावर मात करतो आणि ड्रायविंगच्या सर्व कठीण परीक्षा पार करून, लायसन्स मिळवून लेह लडाख सारख्या कठीण प्रवासासाठी स्वतः बनवलेली कार ड्राईव्ह करून जायचा निश्चयही करतो. स्वतःचा व कुटुंबाचा उदरनिर्वाह कोणावरही अवलंबून न राहता समर्थपणे पेलतो. त्याच्यातील शिकण्याची जिद्द LLB करायला प्रवृत्त करते. अश्या असामान्य कर्तृत्व असणाऱ्या मित्राला कोणी अपंग म्हणेल का? किंबहुना हात पाय धड असलेले लोक रस्त्यावर भीक मागताना दिसतात पण असे कर्तृत्व आणि धडाकेबाजपणा दाखवणाऱ्या विक्रम अग्निहोत्रीला त्रिवार सलाम! तुम्ही कार चालवत आहात, तुमच्या डावीकडच्या एका कारला ओव्हरटेक करून पुढे जाताना तुमच्या लक्षात येतं की त्या कारचालकाचे हात स्टीअरींग व्हील वर नाहीत... तुम्ही सावरून स्वतःच्या स्टीअरींग व्हीलवरची ग्रीप घट्ट धरता...न जाणो ती शेजारची कार तुम्हाला धडकली तर? आता तुम्ही तुमच्या कारचा स्पीड स्लो करता अन नीट निरखून बघता.... आणि तुमच्या लक्षात येतं.... शेजारची कार चालवणाऱ्या व्यक्तीला दोन्ही हात नाहीत... तो त्याच्या पावलांनी कार चालवतो आहे...सराईत कार चालकासारखाच... आज भेटूया...या आत्मविश्वासी भारतीय वादळाला... विक्रम अग्निहोत्रीला.... #Bharatiyans आता असं बघा की आपल्यातीलच एक व्यक्ती ज्याला दोनही हात नाहीत तो सफाईदार पणे कार चालवतो, पर्मनंट लायसन्सही मिळवतो आणि लेह लडाख सारख्या कठीण प्रवासासाठी कार ड्राईव्ह करून जायचा निश्चयही करतो... अशक्य वाटतंय ना? पण हे खरं करून दाखवणारा आहे हा आजचा आपला नायक विक्रम अग्निहोत्री !! विक्रमचे दोन्ही हात काही वैद्यकीय कारणांमुळे कापावे लागले पण त्याने हार मानली नाही! प्रत्येक माणसाने स्वावलंबी असलचं पाहिजे अशी त्याची पक्की धारणा आहे. विक्रम चरितार्थासाठी एक गॅस एजन्सी चालवतो आणि एकीकडे LLB सुद्धा करतोय. त्याची ऑटोमॅटिक गियरवाली कार तो स्वतः आपल्या पायांनी चालवतो, त्यासाठी आपला उजवा पाय तो स्टीअरींग व्हीलवर ठेवतो आणि डाव्या पायाने ऍक्सीलेटर ऑपरेट करतो. २०१५ मध्ये त्याने ड्रायविंग लायसन्ससाठी फॉर्म भरला परंतु त्याला जड वाहनांच्या ट्रॅक’वर टेस्ट द्यायला सांगितली गेली, हे आव्हान स्वीकारून त्याने कार सफाईदारपणे चालवून दाखवली सुद्धा! परंतु निव्वळ तो हाताने सिग्नल देऊ शकत नाही म्हणून त्याला नापास करण्यात आलं. दुसरा एखादा सामान्य मनुष्य ह्या प्रकारामुळे खचून गेला असता पण विक्रमने पक्का निश्चय केला की आता काहीही करून ड्रायविंग लायसन्स मिळवायचंच! मग काय... वाऱ्याला कोणी अडवू शकतो का? विक्रम थेट ग्वाल्हेरच्या ट्रान्सपोर्ट कमिशनरना जाऊन भेटला. त्यांच्या कडूनही त्याला तांत्रिक कारणांमुळे लायसन्स मिळू शकणार नाही असे सांगण्यात आले. विक्रम म्हणाला, \"मला ह्या लोकांनी सांगितलं की माझी कार अपंग व्यक्तींसाठी बनवलेली नाहीये आणि अशी कार डिझाईन करणं हे देखील आपल्याकडे सोप्प नाहीये.\" पण शेवटी खूप मेहनत घेऊन, योग्य तिथे आवश्यक तेव्हढे मोजके पैसे खर्च करून त्याने स्वतःसाठी अशी एक स्पेसिफिक एक कार बनवून घेतलीच ! नंतर तो केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी यांना जाऊन भेटला आणि राज्यमंत्र्यांकडे त्याने अनेक अर्जही केले. तेव्हा कुठे जाऊन सूत्रे हलली आणि त्याला ३० सप्टेंबर ला \"Invalid Carriage (CAR Driving License for Physically challenged person)\" ह्या स्तरावरचे लायसन्स मिळाले. विक्रम अग्निहोत्रीसाठी हा एक विक्रमच होता आणि मग त्याची घोडदौड खऱ्या अर्थाने सुरु झाली. मे २०१५ मध्ये त्याला Learner License मिळाल्यानंतर त्याने इंदोर मध्येच जवळ जवळ १४,५०० कि.मी. च अंतर कुठल्याही अपघाताशिवाय आत्तापर्यंत ड्राईव्ह केलं आहे. निश्चयाचा मेरुमणी असलेल्या विक्रमला आता वेध लागलेत ते त्याच्या विक्रमी लेह लडाख ड्राईव्हचे! एकदा का सीमेवरील परिस्थिती सुरळीत झाली की आपला चारचाकी तैलरथ (कार) घेऊन विक्रम निघणार आहे लेह लडाखच्या टूर साठी!! त्यासाठी आवश्यक ती सर्व तयार त्याने अंतिम फेरीत आटोपत आणली आहे. विक्रम... तुझ्या धाडसाला, संयमी पण कणखर वृत्तीला आम्हां Team Bharatiyans’चा प्रणाम आणि तुझ्या पुढील प्रवासासाठी तुला अनेक शुभेच्छा !!

#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his ‘Mission 2020’ .

 

मिलिंद वेर्लेकर

टीम भारतीयन्स

बातमी सौजन्य