Bhartiyans

Menu

“जरा याद करो कुर्बानी”

Date : 13 Nov 2016

Total View : 204

गान सम्राज्ञी लता दीदींच्या जन्मदिनी शत्रूशी लढणाऱ्या आपल्या सैनिक बांधवांची आठवण म्हणून जवानांसाठी त्यांनी मदत फंड पाठवला शिवाय चाहत्यांना जवानांसाठी मदत करण्याचे आवाहनही केले.


सारांश

गान सम्राज्ञी लता दीदींच्या जन्मदिनी शत्रूशी लढणाऱ्या आपल्या सैनिक बांधवांची आठवण म्हणून जवानांसाठी त्यांनी मदत फंड पाठवला शिवाय चाहत्यांना जवानांसाठी मदत करण्याचे आवाहनही केले. आपल्या सर्वांच्याच लाडक्या 'भारत रत्न' पुरस्कारानी बहुमानीत, गान सम्राज्ञी लता दिदींनी आपल्या ८७ व्या जन्मदिनी, शत्रूशीसविस्तर बातमी

जरा याद करो कुर्बानी

 

गान सम्राज्ञी लता दीदींच्या जन्मदिनी शत्रूशी लढणाऱ्या आपल्या सैनिक बांधवांची आठवण म्हणून जवानांसाठी त्यांनी मदत फंड पाठवला शिवाय चाहत्यांना जवानांसाठी मदत करण्याचे आवाहनही केले. 

आपल्या सर्वांच्याच लाडक्या \\\\'भारत रत्न\\\\' पुरस्कारानी बहुमानीत, गान सम्राज्ञी लता दिदींनी आपल्या ८७ व्या जन्मदिनी, शत्रूशी लढणाऱ्या आपल्या सैनिक बांधवांची आठवण ठेवा आणि त्यांच्या हिताकरिता दान करा, असा उदात्त आणि प्रेमळ संदेश सर्व चाहत्यांना दिला आहे.    

 

 

सीमेवर सैनिक, तुम्हा-आम्हांसाठी छातीचा कोट करून उभे असताना, \\\\"ऐ मेरे वतन के लोगों\\\\" हे आतून आलेले आर्त देवदुर्लभ स्वर ऐकल्यावर डोळ्यांत पाणी तरळणार नाही असा राष्ट्रभक्त भारतीय नागरिक अथवा एखादा सैनिक सापडेल?

\\\\"लग जा गले, तेरे बिना जिंदगीसे शिकवा तो नहीं, चन्दा हैं तू मेरा सूरज हैं तू, सावन का महिना\\\\" आणि अशी हज्जारो सुपर-डुपर हिट अजरामर गाणी देणारी आपली लाडकी लता दीदी....
तिचा आज जन्म दिवस...२८ सप्टेंबर....

\\\\"माझ्या जन्मदिनी शत्रूशी लढणाऱ्या आपल्या सैनिक बांधवांची आठवण ठेवा आणि त्यांच्या हिताकरिता दान करा\\\\", असा उदात्त आणि प्रेमळ संदेश आपल्या सर्वांच्याच लाडक्या \\\\'भारत रत्न\\\\' पुरस्कारानी बहुमानीत, गान सम्राज्ञी लता दिदींनी आपल्या ८७ व्या जन्मदिनाच्या निमित्ताने सर्व चाहत्यांना दिला आहे.

सीमेवरील आपल्या जवानांना \\\\"ए मेरे वतन के लोगो ... जरा आँख में भर लो पानी ... जो शाहिद हुए है उनकी जरा याद करो कुर्बानी\\\\" ह्या दिदींच्या गाण्यातील पंक्तीप्रमाणे त्यांच्या रक्षणार्थ जमेल तितके दान करा असे आवाहन सर्व रसिक प्रेक्षकांना आणि आपल्या चाहत्यांना लता दिदींनी केले आहे.

शुक्रवारी आपल्या ट्विट मध्ये लता दिदीं म्हणाल्या, \\\\"दरवर्षी माझ्या जन्मदिनाचं औचित्य साधून लाखो चाहते मला फुले, मिठाई, केक, शुभेच्छा पत्रे पाठवतात... 
परंतु ह्या वर्षी मी सर्वांना नम्र निवेदन करते की ह्या पैश्यातून आणि तुम्हाला जेवढी आर्थिक मदत जमेल तेवढी आपल्या सीमेवरील आपल्यासाठी लढणाऱ्या बांधवांसाठी पाठवा.

\\\\"आपले आई-वडील, गुरु, मातृभूमी, आणि आपले शूरवीर जवान ह्यांच्या साठी आपण करू तेवढं कमीच असतं! आज आपण सुरक्षितपणे आपलं रोजचं जीवन जगतोय ते आपल्यासाठी एका क्षणासाठीही स्वतःच्या प्राणांचा विचार न करता मातृभूमी साठी आपले प्राणार्पण करणाऱ्या ह्या जवानांमुळे.. \\\\" त्या पुढे म्हणाल्या,

लता दिदींनी आपल्या वतीने Army Welfare Fund Battle Casualties fund हा उपक्रम सुरु केला आहे आणि त्यात त्यांनी आपल्या परीने शक्य तेवढी मदत ह्या जवानांसाठी पोचवली सुद्धा आहे. 
ह्याचा उल्लेख करताना त्या म्हणतात, \\\\"ह्या जवानांसाठी काही उत्तम , उन्नत, उदात्त करणं हि आपली एक भारतीय नागरिक म्हणून नैतिक जवाबदारी आहे.\\\\"

\\\\"आपल्यातील प्रत्येकाने आपापल्या आर्थिक स्थितीनुसार जर ह्या उपक्रमासाठी योगदान दिलेत तर हा मोठा सद्भाव असेल असे मी मानते. मला पूर्ण खात्री आहे की तुम्ही माझ्यावर अखंड असेच प्रेम कराल, आणि माझ्या पुढील कारकिर्दीसाठी आशीर्वाद द्याल. जय हिंद ! वंदे मातरम !\\\\"

मागच्या रविवारी लता दिदींनी उरी आणि जम्मू काश्मीर मध्ये झालेल्या दहशदवादी हल्याचा कडक शब्दात निषेध केलाय आणि ह्या दहशदवाद्यांविरुद्ध सरकारने अतिशय कडक कारवाई करावी अशी विनंतीही केली आहे.

\\\\"मला वाटतं की उरीवर झालेला हमला हे भ्याडपणाचे उदाहरण आहे. ह्या दहशदवाद्यांना अतिशय कठोर उत्तर आपण दिलेच पाहिजे. हीच खऱ्या अर्थाने धारातीर्थी पडलेल्या आपल्या बांधवांसाठी श्रद्धांजली असेल.\\\\" असे आपल्या संपूर्ण कारकिर्दीत असंख्य अजरामर देशभक्तीपर गीते म्हणणाऱ्या दिदी म्हणतात.

लोकांच्या मनात इतकी वर्षे आपल्या मधुर स्वराने सुराज्य करणाऱ्या आपल्या गानकोकिळेला त्यांच्या या अतिशय नम्र निवेदनासाठी आम्हा \\\\'Team Bharatiyans\\\\' मानाचा मुजरा, 
भारताच्या या जागतिक वारसाला उत्तम आयुरारोग्य लाभो हिच ईश्वरचरणी प्रार्थना ! 
लता दिदी, आप जियो हज़ारो साल यही है हमारी आरझू !!

#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his ‘Mission 2020’ .

 

 

 

मिलिंद वेर्लेकर

टीम भारतीयन्स

बातमी सौजन्य