Bhartiyans

Menu

सेड नो टू

Date : 13 Nov 2016

Total View : 182

तीन भारतीय जोडप्यांनी


सारांश

तीन भारतीय जोडप्यांनीसविस्तर बातमी

 

सेड नो टू \\"बिग फॅट वेडींग\\"
इन्स्टेड 
सेड येस टू \\"नोबल सोशल कॉज\\"

तीन भारतीय जोडप्यांनी \\"बिग फॅट वेडींग\\" ची प्रथा मोडून लग्नांत खर्ची पडणारा पैसा आपल्या समाजातील गरजू लोकांपर्यंत पोचवण्याचा आणि त्यांचं आयुष्य काही अंशी सावरण्याचा विक्रमी प्रयत्न केला.

या तीनही जोडप्यांनी वर्षानुवर्षे चालत आलेल्या बिग फॅट वेडिंग कन्सेप्टला झुगारून, लग्नात खर्चिला जाणारा सर्व पैसा गरिबांसाठी ओतला. सामाजिक प्रश्नांचं भान ठेवून ह्या नवदाम्पत्याने घेतलेला निर्णय अत्यंत समर्पक आणि स्तुत्य वाटतो.  

 

 

तुमचं लग्न आठवा जरा लगेच...आठवतंय ?

\\"एका लग्नाची गोष्ट\\", त्यातले बडेजाव, रुसवे फुगवे, मोठ्ठाली गिफ्ट्स, फुलांची उधळण, भरगच्च कपडे आणि दागिने....

ह्या सगळ्या गोष्टीच जणूकाही लग्न म्हणून मानल्या जातात. बऱ्याच वेळेस अश्या प्रसंगांमध्येच नाहक पैसे खर्च केल्याचे आपण आजूबाजूला बघतो. सेलिब्रिटी वेडिंग हा तर खूपच भव्य सोहळा असतो, पण मग हा सगळा पैसा खर्चून लग्न पूर्ण होतं का? खरंतर विधीवत केलेलं छोटंसं लग्न देखील तोच आनंद मिळवून देतं...

मग हा बडेजाव कशाला? बाकीच्यांचं सोडा पण स्वतःच्या लग्नात मानपानाशिवाय काय मज्जा असं आजही आपल्यातील कित्येक कुटुंबांना वाटत.

खरंतर भारतीयनस् हे बिग फॅट वेडींग चे वेडे असतात, पण ह्या लेखातील तीन कुटुंबांनी ह्या परंपरेला तोडून नवीन पिढीसमोर एक वेगळाच पायंडा घालून दिलाय. श्रीमंत लग्न सोहळा (ग्रँड वेडिंग) ह्याचं फॅड आपल्याकडे वाढत असल्याने आज वेडिंग प्लँनिंग किंवा विवाह नियोजन हा भारतातील एक मोठा व्यवसाय आहे.

त्यात लग्नाच्या व्हेन्यूचे डेकोरेशन आणि त्याला मॅचिंग कपडे उच्चभ्रू असणं आणि दिसणं हे एक स्टेटस सिम्बोल झालंय.

आणि हे सगळं उभारण्यासाठी काय लागतं ? - तर अर्थातच...पैसा!!

Business Insider अहवालानुसार भारतात दरवर्षी लग्न सोहळा उद्योगात जवळ जवळ १ लक्ष करोड इतका पैसा ओतला होतो.

आता जरा वेळ असा विचार करून बघा की हा पैसा अनाहतपणे लग्न सोहळ्यात न ओतता जर भुकेजलेल्यांना जेवण घालण्यात खर्च केला तर? किंवा तुमचे नातेवाईक नसलेल्या पण गरजू लोकांना लग्नात पाहुणचार घ्यायला बोलावलं तर??

स्वप्नवत वाटत ना ? पण आपल्यातीलच ह्या तीन भारतीय जोडप्यांनी \\"बिग फॅट वेडींग\\" ची प्रथा मोडून लग्नांत खर्ची पडणारा पैसा आपल्या समाजातील गरजू लोकांपर्यंत पोचवला आणि त्यांचं आयुष्य काही अंशी सावरण्याचा प्रयत्न केला.

१. पुण्यात स्थायिक झालेल्या *आदित्य तिवारी* ने ह्या पूर्वीच एका विकलांग मुलाला लग्नाच्या आधीच दत्तक घेऊन त्याचे पालकत्व स्वीकारले होते आणि आपण त्याचं कौतुकही केलं होतं. इथेच त्याची गोष्ट संपत नाही.

ह्याच आदित्यने १६ जुलै, २०१६ रोजी म्हणजेच आपल्या लग्नाच्या दिवशी अनेक अपूर्व आणि अत्यंत कौतुकास्पद सामाजिक उपक्रम घडवून आणले. मुख्य म्हणजे त्याच्या पत्नीने जी मूळची इंदोरची आहे, तिने संपूर्णपणे ह्यात सहभाग घेतला.

त्याच्या लग्नात १०,००० हुन अधिक निवारा नसलेले पाहुणे आले होते, त्यात अनाथालयातील मुलांचाही समावेश होता. एवढेच नव्हे तर झू मधील पाळीव प्राणी आणि भटक्या कुत्र्यांनाही अन्न वाढलं गेलं. त्याचा लग्न सोहळा ह्या अनाथ पाहुण्यांना पुस्तके आणि औषधं वाटपाने संपन्न झाला.

२. एका गुजराथी व्यावसायिकाने आपल्या मुलाच्या लग्नात हजाराहून अधिक समाजाने नाकारलेल्या विधवा माता भगिनींना पाहुणे म्हणून बोलावले.

कित्येक वर्षे प्रयत्न करूनही आपल्या समाजातील विधवा महिलांची व्यथा संपत नाही, आजही त्यांना विवाह किंवा इतर धार्मिक सोहळ्यांमध्ये बोलावले जात नाही. पण समाजातील हा षंढपणा आपण मोडून काढायचा असे *श्री जितेंद्र पटेल* ह्या गुजराथी व्यावसायिकाने ठरवले आणि करूनही दाखवले.

श्री जितेंद्रजींना जितूभाई म्हणून गावातील लोक ओळखतात, आपल्या समाजातील ह्या जुन्या रूढी मोडत जितुभाईंनी तब्बल १८,००० विधवा माता भगिनींना आपल्या मुलाला आशिर्वाद देण्यासाठी लग्नात बोलावले. ह्या सर्व माता भगिनींना त्यांनी आहेर म्हणून ब्लँकेट्स आणि पर्यावरणाचं एक प्रतीक म्हणून लहान रोपटं दिलं.

सर्वात महत्वाचं म्हणजे ह्यांतील ५०० महिलांना गोमाता भेट करण्यात आली म्हणजे त्या कोणावरही आपल्या आर्थिक गरजांसाठी अवलंबून राहणार नाहीत !

३. शेतकऱ्यांच्या समस्या आणि त्यातून घडणाऱ्या आत्महत्या हे आज समाजातील भीषण प्रश्न आहेत. अश्याच १० पिडीत शेतकरी कुटुंबांना आपल्या लग्नात प्रत्येकी २०,००० रोख रक्कम मदत म्हणून देणारे *अभय देवारे आणि प्रीती कुंभारे* हे जोडपे !

राष्ट्रपती श्री प्रणब मुखर्जी ह्यांच्या वक्तव्याने प्रेरणा मिळून ह्या नवदांपत्त्याने कुठल्याही प्रकारचा गाजावाजा न करता ही सेवा शेतकऱ्यांच्या कुटुंबासाठी रुजू केली.

अभय देवारे हे इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस ऑफिसर आहेत, तर प्रीती कुंभारे IDBI बँकेत असिस्टंट मॅनेजर म्हणून काम करतात. दोघांनीही बिग वेडिंग कन्सेप्ट ला झुगारून समाजातील पीडितांसाठी सेवा म्हणून लग्नाचा सर्व खर्च अर्पण करायचे ठरवले.

आणि ३ जुलै, २०१६ रोजी आपल्या लग्नात त्यांनी १० पिडीत शेतकरी कुटुंबांना ज्यांचा एकुलता एक कर्ता भीषण समस्यांमुळे अकस्मात निघून गेला अश्यांना प्रत्येकी २०,००० रोख रक्कम मदत म्हणून बहाल केली.

हा सर्व सोहळा अमरावतीमध्ये पार पडला. एवढ्यावरच न थांबता ह्या नवदाम्पत्याने ५२,००० पुस्तके अमरावती जिल्ह्यातील ५ वाचनालयांना भेट केली.

आज गावाकडील शेतकरी घरातील लग्न कार्यासाठी किंवा कुटुंबासाठी उधार घेतो आणि नंतर पैसे फेडू न शकल्यामुळे त्याला आत्महत्या करायची वेळ येते. अश्या सामाजिक प्रश्नांचं भान ठेवून ह्या नवदाम्पत्याने घेतलेला निर्णय अत्यंत समर्पक आणि स्तुत्य वाटतो.

ह्या तीनही कुटुंबांना त्यांच्या सामाजिक जाणिवेसाठी आणि कार्यासाठी सलाम !!

#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his ‘Mission 2020’ .

 

 

मिलिंद वेर्लेकर

टीम भारतीयन्स

बातमी सौजन्य