Bhartiyans

Menu

कामगारप्रिय व्यापारी - श्री ढोलकिया

Date : 14 Nov 2016

Total View : 131

गेल्या वर्षी ४९१ कार्स, २०० घरे आणि यंदा १२६० कार्स, ४०० घरे दिवाळी बोनस म्हणून वाटणाऱ्या या भारतीय कंपनीत काम करणे आवडेल नक्कीच तुम्हाला... काय म्हणता?


सारांश

श्री ढोलकिया - व्यवसायाने हिरे व्यापारी असलेल्या गुजरातच्या या कामगारप्रिय सद्गृहस्थाने कायमच आपल्या कामगाच्या उज्वल भवितव्याचा विचार केला आणि प्रति वर्षी बोनस देताना त्यांचा दानशूरपणा दिसालाही! हे करताना इतर सर्व उद्योगधंद्यांसाठी चांगुलपाणाचा एक आदर्श समोर ठेवला आहे.सविस्तर बातमी

 

कामगारप्रिय व्यापारी -  श्री ढोलकिया

गेल्या वर्षी ४९१ कार्स, २०० घरे आणि यंदा १२६० कार्स, ४०० घरे दिवाळी बोनस म्हणून वाटणाऱ्या या भारतीय कंपनीत काम करणे आवडेल नक्कीच तुम्हाला...

काय म्हणता?

श्री ढोलकिया  - व्यवसायाने हिरे व्यापारी असलेल्या गुजरातच्या या कामगारप्रिय सद्गृहस्थाने कायमच आपल्या कामगाच्या उज्वल भवितव्याचा विचार केला आणि प्रति वर्षी बोनस देताना त्यांचा दानशूरपणा दिसालाही! हे करताना इतर सर्व उद्योगधंद्यांसाठी चांगुलपाणाचा एक आदर्श समोर ठेवला आहे.

 

!! देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे
घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हातच घ्यावे !!

सुरत मधले उद्योगपती सावजी ढोलकिया या वर्षी सुद्धा त्यांच्या हरे कृष्ण एक्स्पोर्टस या कंपनीतल्या कामगारांना ५१ कोटींचा घसघशीत दिवाळी बोनस देऊन जगभर चर्चेत तर आले आहेतच पण त्याहीपुढे जाऊन कामगारप्रिय अश्या या सद्गृहस्थाने हे करताना इतर सर्व उद्योगधंद्यांसाठी चांगुलपाणाचा एक आदर्श समोर ठेवला आहे.

गुजरातच्या या कुबेरपुत्र हिरे व्यापाऱ्याने थोडी थोडकी नव्हे तर १२६० कार्स आणि ४०० घरे आपल्या कंपनीसाठी झटणाऱ्या कामगारांना दिवाळी निम्म्त्त वाटल्या आहेत.

हरे कृष्ण एक्स्पोर्टस ही कंपनी जगभर प्रचंड मोठ्या प्रमाणावर हिरे आणि कपडे निर्यात करते.

गतवर्षी श्री ढोलकिया यांनी याच प्रकारे ४९१ कार्स आणि २०० घरे आपल्या कामगारांना दिवाळी निमित्त बिनास म्हणून वाटली होती.

हरे कृष्णा एक्स्पोर्टस या ढोलकिया यांच्या कंपनीत ५५०० हून अधिक कामगार काम करतात आणि त्यांच्या या कंपनीचा जगभरातली उलाढाल ही ६००० कोटीहून अधीक आहे.

कामगारांनी गेल्या वर्षात नोंदलेल्या कामगीरीवरून या बोनसचे प्रमाण ठरवण्यात आले आहे. वाटप करण्यात आलेल्या घरांसाठीचे प्राथमिक डाऊन पेमेंट कंपनी मार्फत करण्यात येणार आहे आणि नंतर उरलेली रक्कम ही पुढल्या पाच वर्षांत कंपनीमार्फत EMI स्कीम अंतर्गत भरली जाणार आहे.

श्री सावजी हे गुजरात मधल्या अमरेली जिल्ह्यातल्या दुधाला गावाचे मूळ रहिवासी आहेत आणि कष्ट करून शब्दशः शून्यातून स्वर्ग उभ्या केलेल्या या उद्योगपतीने सुरुवातीला आपल्या काकांकडून छोटे कर्ज घेऊन एका छोट्याश्याच उद्योगाला सुरुवात केली होती.

भारतीयन्सच्या वाचकांना आठवत असेल की याच श्री ढोलकिया यांची एक पोस्ट आपण काही महिन्यांपूर्वी शेअर केली होती ज्यामध्ये यांनी यांच्या द्रव्य या परदेशात शिकायला असलेल्या त्यांच्या धाकट्या मुलाला केवळ ७००० रुपये देऊन केरळ इथे एक महिना कष्ट करून पैसे कमावून आपल्या पायांवर उभे राहण्यासाठी पाठवले होते.

श्री सावजी ढोलकिया तुमचा, तुमच्या कंपनीचा आणि तुमच्या भारतीयत्वाचा आम्हा टीम भारतीयन्स\'ना आदर वाटतो आहे.

 

#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his ‘Mission 2020’ .

 

 

 

मिलिंद वेर्लेकर

टीम भारतीयन्स

बातमी सौजन्य