Bhartiyans

Menu

यशस्वी होण्यासाठी नेहेमी हातांची आवश्यकता असतेच असं नाही...

Date : 14 Nov 2016

Total View : 363

निर्धार आणि हिम्मत या दोन्ही शब्दांना बेंगलोरचा स्विमर विश्वास के एस याने असामान्य असा नवीन अर्थ देत वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले.


सारांश

दहा वर्षाचा असताना एका दुर्दैवी अपघातात आपले दोन्ही हात आणि वडील गमावून् बसलेल्या २६ वर्षीय विश्वासने कॅनडा येथे नुकत्याच पार पडलेल्या ‘2016 Speedo Can Am Para-swimming Championships’ मध्ये ३ पदके जिंकत भारतीयन्स'ना अभिमान आणि गर्व वाटेल अशी कामगिरी केली.सविस्तर बातमी

यशस्वी होण्यासाठी नेहेमी हातांची आवश्यकता असतेच असं नाही....
निर्धार आणि हिम्मत या दोन्ही शब्दांना बेंगलोरचा स्विमर विश्वास के एस याने असामान्य असा नवीन अर्थ देत वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले.
#Bharatiyans

दहा वर्षाचा असताना एका दुर्दैवी अपघातात आपले दोन्ही हात आणि वडील गमावून् बसलेल्या २६ वर्षीय विश्वासने कॅनडा येथे नुकत्याच पार पडलेल्या ‘2016 Speedo Can Am Para-swimming Championships’ मध्ये ३ पदके जिंकत भारतीयन्स\'ना अभिमान आणि गर्व वाटेल अशी कामगिरी केली.

\"माझे वडील , सत्यनारायण मूर्थी हे शेतकी विभागात क्लार्क होते. 
दक्षिणेत कोलार इथे आम्ही राहत होतो आणि आम्ही राहत होतो त्याचं राहत्या घरी सिमेंट लावलेल्या भागावर पाणी मारत असताना माझा पाय घसरला आणि तो विजेच्या उघड्या तारांवर पडला. 
हे पाहणाऱ्या माझ्या वडलांनी मला विजेच्या धक्क्यापासून वाचवण्यासाठी धाव घेतली परंतु मला वाचवताना जोरदार विजेचा धक्का बसून त्या अपघातात त्यांचा विलक्षण दुर्दैवी मृत्यू झाला.

दोन महिने कोमामध्ये गेल्यावर त्यातून मी कसाबसा बाहेर आलो पण माझे दोन्ही हात मात्र मी गमावून बसलो. यानंतर आम्ही बेंगलोरला राहायला आलो.\" 
२६ वर्षीय विश्वास १६ वर्षांपूर्वीची घटना सांगतो.

विजयनगर येथील बसवेश्वर महाविद्यालयात त्याने नंतर बीकॉम पूर्ण केले आणि नंतर छोटीमोठी कामे तो करू लागला.

हे सगळ करताना विश्वासला लोकांच्या तिरकस आणि हिणकस कॉमेंट्सन सामोरे जावे लागत असे पण त्याने त्याकडे कधीच लक्ष दिले नाही.

हे सगळ होत असताना त्याचे मित्र त्याला स्विमिंगला घेऊन जात असतं. याचवेळी बेंगलोर येथील आस्था या NGOमध्ये सुनिल जैन यांच्याशी त्याची ओळख झाली आणि हळूहळू \'मला स्विमिंग शिकायचे आहे.\" अशी इच्छा त्याने त्यांच्याकडे प्रदर्शित केली.

आस्था\'ने विश्वासची प्रामाणिकपणे कष्ट करण्याची मानसिकता लक्षात घेऊन, दुसरी एक NGO, BOOK A SMILE, सोबत विश्वासला ट्रेनर, सर्व मुलभूत आवश्यक त्या सोयी, पौष्टिक खुराक आणि व्यावसायिक क्रीडापटून्ना लागणाऱ्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या.

गतवर्षी बेळगाव इथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत विश्वासने ३ सिल्वर मेडल्स मिळवली आणि यामुळेच Sports Authority of Ihdia ने त्याला कॅनडा इथे होणाऱ्या स्पर्धेसाठी निवडले.
आणि या संधीचा पुरेपूर फायदा उठवत विश्वासने कॅनडा येथे आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ३ पदके पटकावली.

व्यावसायिक स्विमर होण्यासाठी विश्वासने ३ वर्षांचे आत्यंतिक कठोर असे प्रशिक्षण घेतले.
हातांचा उपयोग न करता त्याने बटरफ्लाय, बकस्ट्रोक, ब्रेथस्ट्रोक आणि फ्री स्टाईल स्विमिंग या सर्वच क्रीडाप्रकारांत आंतरराष्ट्रीय दर्जाचे कौशल्य संपादित केले. हे करत असताना अनेकानेक कठीण प्रसंगांना त्याला सामोरे जायला लागले.

हात असणाऱ्या आपणांस हात नसलेल्या विश्वासच्या मानसिक, शारीरिक कष्टांची आणि सातत्यपूर्ण परिश्रमांची म्हणावी तशी कल्पना येणे जरा अवघडच आहे.

टोकयो इथे २०२० साली होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत भाग घेणे आणि भारतासाठी मेडल्स जिंकणे हे माझे स्वप्न आहे , असे हा धीरोदात्त भारतीय स्विमर आत्मविश्वासाने सांगतो.
हात नसलेल्या आणि वडीलही नसलेल्या या यशस्वी, कष्टाळू विश्वासचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून हात असलेले आपण, कित्येक गोष्टी नक्कीच करू शकतो आणि यशस्वीततेचे नवनवीन उच्चांक निर्माण करू शकतो हे नक्की.

मित्रा विश्वास, आम्हा bharatiyansना तुझा अभिमान वाटतो आहे आज....
खूप खूप अभिनंदन आणि अनेकानेक शुभेच्छा........


** Team Bharatiyans **

#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his ‘Mission 2020’ .

 

मिलिंद वेर्लेकर

टीम भारतीयन्स