Bhartiyans

Menu

सुखासीन आयुष्य सोडून ग्रामीण तरुणांना शिक्षण देणारा प्रांजल दुबे

Date : 14 Nov 2016

Total View : 119

गावातील तरुणांना शिक्षण मिळून नोकरीच्या संधी मिळाव्यात म्हणून स्वताची गलेलट्ठ पगाराची नोकरी सोडून त्यांच्यासाठी कॉलेज काढणारा टेकी प्रांजल दुबे


सारांश

प्रांजल दुबे या तरुणाने स्वताची गलेलट्ठ पगाराची नोकरी सोडून गावातील मुलांसाठी कॉलेज सुरु केलं. या मुलांना नोकरीच्या चांगल्या संधी मिळाव्यात म्हणून तो बंगलोर मधिल सुखासीन आयुष्य सोडून तो संदलपूर येथे राहत आहे.भारताची खेडी जेव्हा स्वयंपूर्ण होतील तेव्हाच भारत सुपर पॉवर म्हणून घडेल हे डॉ एपीजे अब्दुसविस्तर बातमी

थोडा वेळ काढा आणि भेटा प्रांजल दुबे नावाच्या या ४० वर्षांच्या असामान्य टेकी\'ला.....
#Bharatiyans

ज्याने त्याच्या वाड-वडलांच्या गावातल्या युवकांना शिक्षण देण्यासाठी स्वतःची मल्टीनॅशनल सॉफ्टवेअर कंपनीतली गलेलठ्ठ पगाराची नोकरी तर सोडलीच आणि वर स्वतःचे राहते घर सुद्धा विकून टाकले.....

संदलपूर या देवास जिल्ह्यातल्या त्याच्या वाड-वडलांच्या गावातल्या युवकांना नोकरीच्या चांगल्या संधी मिळाव्यात आणि त्यांचे राहणीमान उंचवावे हे स्वप्न प्रांजल याने त्याच्या हृदयात बाळगले.
आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याच्याकडचे शब्दशः सर्वकाही त्याने देऊन टाकले.

आज त्याने सुरु केलेल्या महाविद्यालयामधले किमान १०० एक तरुण-तरुणी SAP, Cognizant सारख्या मोठ्या कंपन्यांमध्ये यशस्वीपणे काम करत आहेत हे विशेष.

\"स्वतःची नोकरी सोडणे आणि शहरातले स्वतःचे घर विकून महाविद्यालयासाठी पैसे उभे करणे हा नक्कीच सोपा निर्णय नव्हता पण आपल्यापैकी प्रत्येकालाच कधी ना कधी अवघड निर्णय हे घ्यावेच लागतात.\" असं टाईम्सशी बोलताना प्रांजल म्हणाला.

अत्यंत तोकड्या भांडवलात त्याने सुरु केलेले संत सिंगाजी इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड मॅनेजमेंट या महाविद्यालयाने या महत्वाकांक्षी टेकी\'चे आयुष्यच बदलून टाकले.

\"मी नेमक काय करतो आहे हे मला आणि माझ्या कुटुंबाला समजायला आणि पटायलाच थोडी थोडकी नाही तर तब्बल २ वर्षे लागली कारण गावाकडच्या युवकांसाठी कॉलेज सुरु करण्याचे माझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बेंगलोर मधली माझी जी नोकरी सोडली ती नोकरी आणि बेंगलोर सारख्या शहरातले आलिशान राहणीमान हे आजकाल अनेक युवकांचे स्वप्न असतेच असते.\" तो म्हणाला.

२०१० साली प्रांजलने सुरु केलेल्या कॉलेजमधल्या ५० युवकांची पहिलीच बॅच घेऊन प्रांजल स्वतः बंगलोर आणि भारतातल्या इतरही शहरात गेला जेणेकरून त्याचे विद्यार्थी आयुष्यात मोठी स्वप्ने पाहू शकतील.

\"गावातल्या या युवकांशी संवाद साधणे माझ्यासाठी सोप्पे नव्हते कारण माझे लहानपणा पासूनचे राहणीमान आणि या सगळ्यांचे राहणीमान या सगळ्यात खूपच तफावत होती. या सगळ्या युवकांच्या मनात उज्वल भविष्याची स्वप्ने पेटवण्यासाठी मी या सगळ्यांना बेंगलोर मधल्या Infosys, Biocon, SAP सारख्या मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये घेऊन गेलो जेणेकरून या भव्य ठिकाणी काय काय होते ते हे सगळे युवक-युवती पाहू शकतील आणि त्यातून मोठी प्रेरणा घेऊ शकतील.\" प्रांजल म्हणाला.

पुढे तो म्हणाला.\" आजही गावात मुलींना शिक्षणाकडे वळवणे हे अजिबात सोपे नाही आणि आजही मला यासाठी खूप परिश्रम करावे लागतात.\"

आज सहा वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर त्याच्या कॉलेज मध्ये शिकून तयार झालेले अनेक युवक आणि युवक अनेक मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये चांगल्या पगाराच्या नोकरीत रुजू झाले आहेत.

मध्य प्रदेश मधल्या तब्बल २०० गावांमधून आजमितीस त्याच्या संस्थेत शिकत असलेल्या १००० युवक-युवतींना शिकवताना आसपासच्या फक्त पैशांसाठीच डिग्री विकणाऱ्या कॉलेजेसचा त्याला खरा धोका वाटतो.

६१ वर्षांची प्रांजलच्या आई श्रीमती कल्पना दुबे आणि ३७ वर्षांची त्याची पत्नी अमिता या दोघींच्या भक्कम पाठींब्यावरच या टेकी\'ने या त्याच्या संस्थेचं स्वप्न पाहिलं आणि ते पूर्णही केलं.

\"बेंगलोर मधले तसं म्हटलं तर सुखासीन आयुष्य आणि इतकी छान नोकरी सोडून इथे गावाकडे येऊन इतक मोठ स्वप्न पाहण हे फारच अवघड होत.

फक्त प्रांजलच्या आनंदासाठीच मी या कठोर परीक्षेला तयार झाले.

जर तू या सगळ्यात आनंदी असशील तर मी तुझ्यासोबत आहे. जे काही होवो मी तुझी साथ कधीच सोडणार नाही.\" असे धीरोदात्त उद्गार प्रांजलची पत्नी अमिता हिने कॉलेज सुरु करताना प्रांजल सोबत उभं राहताना काढले होते.

प्रांजल , अमिता आणि कल्पनाजी...तुम्हा सर्वांचा आम्हाला अभिमान वाटतो आहे.

भारताची खेडी जेव्हा स्वयंपूर्ण आणि परिपूर्ण होतील तेव्हाच खरा भारत सुपर पॉवर म्हणून घडेल हे डॉ एपीजे अब्दुल कलम यांचे उद्गार साकार करणाऱ्या प्रांजल आणि त्याच्या टीम\'ला, \'टीम भारतीयंस\'चा मानाचा मुजरा.....

****Team Bharatiyans**** 

#Bharatiyans

#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his ‘Mission 2020’ .