Bhartiyans

Menu

COEPच्या विद्यार्थ्यांच्या पावलावर पाउल ठेवून आता अवकाशात झेप घेणार मुंबईच्या IIT विद्यार्थ्यांचा 'प्रथम' हा लघु-उपग्रह..

Date : 14 Nov 2016

Total View : 111

तब्बल ९ वर्षांच्या तपस्येनंतर तयार झालेला प्रथम हा लघु-उपग्रह इस्रो'च्या Polar Satellite Launch Vehicle (PSLV)च्या सहाय्याने अवकाशात झेप घेणार आहे


सारांश

COEP च्या विद्यार्थ्यांच्या पावलावर पाउल ठेऊन मुंबई IIT चे विद्यार्थी प्रथम हा लघु उपग्रह इस्रो'च्या Polar Satellite Launch Vehicle (PSLV)च्या सहाय्याने अवकाशात सोडणार आहेत.भारतात होणाऱ्या सुनामीची पूर्वकल्पना देणारे अलर्टस आणि भारतीय ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम (GPS) च्या अधिक परीणामकारक उपयोगासाठी यसविस्तर बातमी

COEPच्या विद्यार्थ्यांच्या पावलावर पाउल ठेवून आता अवकाशात झेप घेणार मुंबईच्या IIT विद्यार्थ्यांचा \'प्रथम\' हा लघु-उपग्रह.....
#Bharatiyans

COEP (College of Engineering, Pune) च्या विद्यार्थ्यांनी निर्माण केलेला \'स्वयम\' या कर्तृत्वाने २२ जून २०१६ रोजी श्रीहरीकोटा इथल्या सतीश धवन स्पेस सेंटरवरच्या दुसऱ्या लॉन्चपड वरून अवकाशात यशस्वी झेप घेतली.

आणि आता हेच बहुमानाचे आणि अथक बुद्धिवान परिश्रमातून साकार होऊ घातलेले तेजस्वी स्वप्न पुढल्या महिन्यात अवकाशात घेऊन जाणार आहेत मुंबई येथील IIT,मुंबई\'चे गुणवान विद्यार्थी.

तब्बल ९ वर्षांच्या तपस्येनंतर तयार झालेला हा लघु-उपग्रह इस्रो\'च्या Polar Satellite Launch Vehicle (PSLV)च्या सहाय्याने अवकाशात झेप घेणार आहे आणि अवकाशात ७२० किलोमीटर अंतरावरच्या कक्षेत स्थिर केला जाणार आहे.

विशेषतः २ विद्यार्थ्यांच्या डोक्यातून उगम झालेला हा कन्सेप्ट अनेकानेक गुणवान आणि प्रतिभावान विद्यार्थ्यांच्या टीमच्या एकत्रीत सहभागी मदतीने पुढे नेण्यात आला.

१० किलो वजनाचा असलेला हा ब्रीलीयंट लघु-उपग्रह एकंदर चार महिने अवकाशात कार्यरत असणार आहे.

रेडिओलहरी परावर्तित करणारा वातावरणातील थर आणि त्याचे पृथ्वीवर होणारे परिणाम याचे अध्ययन हा लघु-उपग्रह करणार आहे.

भारतात होणाऱ्या सुनामीची पूर्वकल्पना देणारे अलर्टस आणि भारतीय ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम (GPS) च्या अधिक परीणामकारक उपयोगासाठी या लघु-उपग्रहाच्या नोंदीचा आणि अध्ययनाचा मोठा उपयोग होणार आहे.

संपूर्णता: विद्यार्थ्यांनी उभ्या केलेल्या या संपूर्ण प्रोजेक्ट ची एकंदर कॉस्ट दीड कोटी रुपये इतकीच आली आहे हे विशेष.

२००७ साली एका करारावर स्वाक्षऱ्या करून इस्रो आणि IIT,मुंबई यांनी या प्रोजेक्टचा श्रीगणेशा केला.

२०१२ लाच कदाचित तयार होऊ शकणारा हा लघु-उपग्रह तेव्हा काही छोट्या-मोठ्या कारणांमुळे अवकाशात जाऊ शकला नाही.

सध्या \'प्रथम\' हा बेंगलोर इथल्या इस्रो\'च्या \'क्लीन-रूम\' मध्ये ठेवला आहे आणि याच्या प्रक्षेपणाची निश्चित तारीख अद्याप नक्की केली झालेली नाही.

\'प्रथम\'चा मुख्य निर्माता आणि IIT,मुंबई इथल्या एरोस्पेसच्या शेवटच्या वर्षाला असलेला विद्यार्थी रत्नेश मिश्रा म्हणाला कि या लघु-उपग्रहाच्या कामकाजावर आणि याने पाठवलेल्या नोंदींचे अभ्यासात्मक पृथ्थकरण करण्यासाठी इथे IIT,मुंबई मध्ये एक ग्राउंड स्टेशन उभारण्यात येणार आहे आणि दुसरे असेच एक स्टेशन मालाड इथल्या अथर्व महाविद्यालयात उभारले जाणार आहे.

IIT,मुंबई येथील या उपक्रमावर काम करणारी आठ जणांची एक टीम या दरम्यानच्या काळात श्रीहरीकोटा येथे प्री-लौंच गोष्टींसाठी तळ ठोकणार आहे.

\'प्रथम\' च्या रूपाने अवकाशात झेप घेण्याच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या IIT,मुंबईच्या या सर्वच विद्यार्थ्यांचा \'टीम भारतीयन्स\'ला अभिमान वाटतो आहे.

देशभरातल्या आणि जगभरातल्या विद्यार्थ्यांनी स्फूर्ती घ्यावी अशी ही तेजस्वी घटना आहे.

IIT,मुंबई आणि \'प्रथम\'ची पूर्ण टीम यांना \'Team Bharatiyans\' च्या वतीने मानाचा मुजरा....


**Team Bharatiyans**

#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his ‘Mission 2020’ .