Bhartiyans

Menu

काकोरी दरोडा...स्मृतिदिन

Date : 14 Nov 2016

Total View : 407

आज ९ ऑगस्ट, भारतीय स्वातंत्र्य लढयातल्या सोनेरी अक्षरात लिहून ठेवलेल्या काकोरी' दरोड्याचा तेजस्वी स्मृती दिवस...


सारांश

९ ऑगस्ट १९२५ रोजी चंद्रशेखर आझाद आणि रामप्रसाद बिस्मिल या निडर क्रांतिकारकांच्या नेतृत्वाखाली अश्फाकुल्ला खान, सत्चीन्द्र बक्षी, राजेंद्र लाहिरी, केशब चक्रवर्ती, मन्मतनाथ गुप्त, बनवारीलाल, मुरारीलाल गुप्ता आणि मुकुन्द्लाल गुप्त यांनी काकोरी मध्ये इंग्रज सरकारचा रेल्वेने निघालेला खजिना देशकार्यासाठीसविस्तर बातमी

आज ९ ऑगस्ट, 
भारतीय स्वातंत्र्य लढयातल्या सोनेरी अक्षरात लिहून ठेवलेल्या काकोरी\' दरोड्याचा तेजस्वी स्मृती दिवस...
#Bharatiyans

९ ऑगस्ट १९२५ रोजी चंद्रशेखर आझाद आणि रामप्रसाद बिस्मिल या निडर क्रांतिकारकांच्या नेतृत्वाखाली अश्फाकुल्ला खान, सत्चीन्द्र बक्षी, राजेंद्र लाहिरी, केशब चक्रवर्ती, मन्मतनाथ गुप्त, बनवारीलाल, मुरारीलाल गुप्ता आणि मुकुन्द्लाल गुप्त यांनी काकोरी मध्ये इंग्रज सरकारचा रेल्वेने निघालेला खजिना देशकार्यासाठी मोठ्या धाडसाने लुटला.

इंग्रजांच्या विरोधात स्वातंत्र्य लढा चालवण्यासाठी पैशांची आवश्यकता होती म्हणून आपल्या या थोर क्रांतिकारकांनी प्राणाची पर्वा न करता इंग्रजांच्या बंदुकांच्या समोर ताठ मानेने उभे राहून हा खजिना लुटला.

या धाडसी दरोड्यात भारतीय क्रांतिकारकांनी जर्मन बनावटीची माउजर पिस्तुले वापरली होती ज्यात पिस्तुलाच्या मागे दट्ट्या जोडून आयत्या वेळी यांचा उपयोग रायफल प्रमाणे सुद्धा करता येऊ शकतो.

नक्कीच...
इंग्रजांचा खजिना लुटणे हा इंग्रजांच्या नजरेत एक भयंकर मोठा अपराध होता...

कारण भारतीय क्रांतिकारकांनी थेट इंग्रजांनाही आपण समोरासमोरील लढाईत मात देऊ शकतो आणि शस्त्रांच्या जोरावर उद्दाम इंग्रजांना लुटू ही शकतो हे खुले आम जगाला दाखवून दिले.

म्हणून यामधील चार क्रांतीकारकांना देहदंडाची शिक्षा झाली आणि बाकी जणांना ही मारून मुटकून शांत करण्यात आले.

या सर्व थोर क्रांतीकारकांना \'टीम भारतीयन्स\' तर्फे सहस्त्रावधी प्रणाम आणि मानाचा मुजरा....


** टीम भारतीयन्स**

#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his ‘Mission 2020’ .

 

मिलिंद वेर्लेकर

टीम भारतीयन्स

बातमी सौजन्य

---