Bhartiyans

Menu

ड्युटीवर असताना कर्तव्य निभावताना प्राण दिलेल्या पोलिसांच्या कुटुंबियांना पत्र पाठवण्याचा मुंबई पोलिसांचा उपक्रम

Date : 14 Nov 2016

Total View : 126

पोलीस बांधव कामावर असताना शहीद झाला तर या पोलिसाच्या कुटुंबियांना एक अत्यंत महत्वाचे असे सांत्वनपरपत्र पाठवण्याचा नवीन उपक्रम मुंबई पोलिसांनी सुरु केला आहे


सारांश

ड्युटीवर असताना कर्तव्य निभावताना प्राण दिलेल्या पोलिसांच्या कुटुंबियांना पत्र पाठवण्याचा उपक्रम मुंबई पोलिसांनी सुरु केला आहे.या पत्रावर स्वहस्ताक्षरीत सही असते मुंबई पोलीस कमिशनर यांची. या पत्रात निव्वळ सांत्वन करणाऱ्या शब्दांशिवाय अजून खूप काही असते.या गोष्टीमुळे मुंबई पोलीस दलातल्या पोलिसांचे आसविस्तर बातमी

ड्युटीवर असताना कर्तव्य निभावताना प्राण दिलेल्या पोलिसांच्या कुटुंबियांना पत्र पाठवण्याचा मुंबई पोलिसांचा माणुसकी जोपासणारा आणि मनोधर्य उंचावणारा नवीन उपक्रम सिद्ध करतोय की मुंबई पोलीस आहेत सर्वोत्तम
#Bharatiyans

यदाकदाचीत दुर्दैवाने एखादा मुंबईतला पोलीस बांधव कामावर असताना शहीद झालाच तर या पोलिसाच्या कुटुंबियांना एक अत्यंत महत्वाचे असे सांत्वनपरपत्र पाठवण्याचा नवीन उपक्रम मुंबई पोलिसांनी सुरु केला आहे जो इतर पोलिसांचे आणि त्यांच्याकुटुंबियांचेही मनोधर्य उंचावतो आहे.

या पत्रावर स्वहस्ताक्षरीत सही असते मुंबई पोलीस कमिशनर यांची.

आणि या पत्रात निव्वळ सांत्वन करणाऱ्या शब्दांशिवाय अजून खूप काही असते ज्याचा या देशासाठी कर्तव्य निभावत असताना प्राण दिलेल्या पोलिसांच्या कुटुंबियांना खूप उपयोग होऊ शकेल.

घरातला कर्ता पुरुष असलेला हा पोलीस कर्तव्य बजावत असताना शहीद झाला तर नंतर मागाहून मिळणाऱ्या पोलीस दलातील सर्व कायदेशीर मदती आणि फायदे मिळवण्यासाठी ज्या ज्या गोष्टी त्या कुटुंबाने करणे आवश्यक आहे त्या सर्व गोष्टी या पत्रात इत्यंभूतपणे नमूद केलेल्या असतात.

जनरल इन्श्युरन्स, बाकी राहिलेल्या रजेचा आर्थिक स्वरूपातील परतावा, कौटुंबिक पेन्शन इत्यादी सर्व गोष्टी आणि या गोष्टी मिळण्यासाठी कराव्या लागणाऱ्या कमीत कमी पुर्ततांची यात सखोल माहिती असते हे विशेष.

काही विशेष केसेसमध्ये शहीद झालेल्या पोलिसांच्या मुलांना पोलीस दलात नोकरी करण्याची ऑफर दिली जाते. अपघातांमध्ये जीव गमावलेल्या पोलिसांच्या कर्मचाऱ्यांना जास्तीचा असा २५ लाखांचा विमा सुद्धा दिला जातो.

दरवर्षी जवळपास १०० एक पोलीस मुंबईमध्ये कर्तव्य निभावताना अथवा अपघातांमध्ये शहीद होतात अशी माहिती एका जेष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली.

पोलीस दलातील ताणांमुळे हृदयविकार , उच्च रक्तदाब अथवा डायबेटीस इत्यादी मुळे प्राण जाण्याची सुद्धा काही मोठी करणे या पोलिसांच्या बाबतीत शक्य असतात.

“ घरातला कर्ता पुरुष हिरावला गेलेल्या पोलिसांच्या कुटुंबियांच्या मोठा मानसिक आणि प्रत्यक्ष आधार देण्यासाठी आम्ही हे करतो. 
या पोलिसांच्या कुटुंबियांना कायदेशीररित्या मिळणारे फायदे आणि सर्वच गोष्टी या लवकरात लवकर मिळाव्यात आणि त्या सुद्धा सोप्या पद्धतीने मिळाव्यात हा आमचा उद्देश असतो आणि म्हणून मुख्यत्वेकरून आम्ही हे करायला सुरुवात केली आहे. 
मुंबई पोलिसांच्या मुख्यालयातल्या establishment desk कडे ही पत्रे पाठवण्याची जबाबदारी असते. कुठल्या अधिकाऱ्यांकडे, कुठे या कुटुंबीयांनी या गोष्टींसाठी जायचे आहे, त्यांचे पत्ते आणि टेलिफोन नंबर्स आणि काय काय कमीत कमी पूर्तता करायच्या आहेत हे सगळे या पत्रामध्ये सविस्तर दिलेले असते.” श्री दत्तात्रय पडसळीग्कर मुंबई पोलीस कमिशनर यांनी माहिती दिली.

मुंबईचे पोलीस कमिशनर यांनी हा पुढाकार जवळपास सहा महिन्यांपूर्वी घेतला आणि establishment desk ला या संदर्भातल्या सर्व पूर्तता करण्याचे आदेश दिले.

पोलिसांना हा उपक्रम खूपच आशादायक वाटतो आहे करण बर्याचदा पोलिसांना आणि त्यांच्या कुटुंबियांना या साध्या साध्या गोष्टींची कल्पनाच नसते.

या गोष्टीमुळे या काम करणाऱ्या मुंबई पोलीस दलातल्या पोलिसांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे मनोधैर्य उंचावायला खूप मदत झाली आहे.


**टीम भारतीयन्स**

#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his ‘Mission 2020’ .

 

मिलिंद वेर्लेकर

टीम भारतीयन्स