Bhartiyans

Menu

तुमच्या पोटच्या मुला-मुलींना शाळेत मुळीच न घालण्याचा डेअरिंग’बाज निर्णय तुम्ही घेऊ शकाल?

Date : 15 Nov 2016

Total View : 136

कधीच शाळेत न गेलेल्या मालविकाला प्रवेश दिला अमेरिकेच्या एका नावाजलेल्या शिक्षण संस्थेने!


सारांश

आजची शिक्षण पद्धती मुलांवर खर्या ज्ञानापेक्षा ओझच जास्त टाकते, म्हणून आपल्या मुलीला शाळेत न घालता शिक्षण देण्याचा धाडसी निर्णय घेतला सुप्रिया जोशींनी. मालविकाला विविध विषयांच्या अभ्यासातून गणित आणि कॉम्पुटर प्रोग्रामिंग खूप आवडले आणि तिला चक्क तिच्या ज्ञानाच्या बळावर अमेरिकेच्या Massachusetts Instiसविस्तर बातमी

तुमच्या पोटच्या मुला-मुलींना शाळेत मुळीच न घालण्याचा डेअरिंग’बाज निर्णय तुम्ही घेऊ शकाल?
शाळेत न जाताच, तुमच्या मुला-मुलींना घरीच सर्व आवश्यक ते शिक्षण देऊन, अमेरिकेच्या आघाडीच्या शिक्षण संस्थेत प्रवेश मिळू शकतो हे सांगितलं तुम्हाला, तर ‘आता’ हा निर्णय घेऊ शकाल ?
#Bharatiyans
सुप्रियाने हा निर्णय घेतला...आणि मालविकाची सक्सेस स्टोरी जन्माला आली.....

‘3 Idiots’ पाहिला आणि मनाशी जाम पक्कं ठरवलं की येस्स...यातून धडा घ्यायचा. मुलाची IIT ला जायची बौद्धिक पात्रता असूनही त्याच्या कॉमर्स शाखा निवडण्याच्या निर्णयाला पूर्ण पाठिंबा दिला. 
आईशप्पथ काहीतरी अचिव्ह केल्यासारखं वाटलं पण आज या सुप्रियाला, अजून एक भन्नाट “सुप्रिया” भेटली.. आमच्यासारख्यांपेक्षा कितीतरी पट भन्नाट…

सुप्रिया एका NGO त काम करायची जे कॅन्सरपिडितांसाठी काम करायचे. 
तिथे ती बर्याचदा लहान मुले पहायची....अगदी ८ वी ९ वीतली कॅन्सरने पीडीत.

त्या सगळ्याचा तिच्यावर खूप खोल परिणाम झाला आणि तिच्या मनानी एक पक्कं घेतलं की माझ्या मुलींनी खूप आनंदी राहिले पाहिजे.

मग यात सगळ्यात पहिली गोष्ट तिला जाणवली ती म्हणजे आपली पारंपरिक शिक्षण पद्धती, जी मुलांवर खऱ्या ज्ञानापेक्षा ओझंच जास्त टाकते म्हणूनच पहिला धडाकेबाज आणि महत्वाचा निर्णय तिने घेतला आणि तो म्हणजे चक्क मुलींना शाळेतून काढण्याचा; जो अजिब्बात सोपा नव्हता कारण आपल्या समाजाची मन:स्थिती unschooled किंवा “घरातून शाळा” या कल्पनेला तयारच नाहीये.

अगदी तिचा नवराही याला अपवाद नव्हता कारण यामुळे तिच्या मुलींकडे १० वी आणि १२ वीचे स्टँडर्ड सर्टिफिकेटच असणार नव्हते पण अखेरीस तोही तयार झाला.

मग तिने तिचा NGO मधला जॉब सोडला आणि तिच्या मुलीसाठी , मालविकासाठी, संपूर्ण शैक्षणिक कार्यक्रम आखला ज्यात घरातच एक क्लासरूम तयार करण्यापासून अनेकानेक महत्वाचे घटक अंतर्भूत होते.

सुखद आश्चर्य म्हणजे या सगळ्यामुळे मालविका खरच खूप आनंदी होती आणि कुठल्याही सक्तीशिवाय सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत ज्ञान मिळवणे ही तिची अक्षरश: पॅशन झाली होती.

मग सुरू झाला तिचा हा भन्नाट प्रवास , मालविकाचा...

यात तिने विविध विषय हाताळले ज्यामधून computer programming तिला खूप भावले आणि त्यामुळे त्यावरच लक्ष केंद्रित करण्याचे तिने ठरवलं.

मुळच्या हुशारीमुळे आणि आवडीचे क्षेत्र मिळाल्यामुळे तिने या क्षेत्रात मस्त आश्वासक भरारी घेतली.

पण, भारतीय नियमांच्या बडग्यामुळे या ब्रिलियंट मुलीला IIT त प्रवेश मिळू शकला नाही.

फक्त एकाच संस्थेत तिला प्रवेश मिळाला , चेन्नई मॅथेमॅटिकल इन्स्टिट्यूट ( CMI ) आणि तिने गणितासाठी जास्तीतजास्त वेळ दिला कारण शाळेत न गेल्यामुळे काही गॅप्स तर राहिल्या होत्याच उदा. Matrices ... पण ते सगळे तिने सूत्रबद्धपणे केले आणि तिच्या ध्येयाकडे जात राहिली.

गेली ३ सलग वर्षे ती प्रोग्रॅमिंग ऑलिंपियाड मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार्या पहिल्या चारात आहे.

आणि यापुढची कहाणी म्हणजे तिचा मॅचविनिंग परफॉर्मन्स ....

१७ वर्षीय मालविका राज जोशी , जिच्याकडे १० वी किंवा १२वीचे प्रमाणपत्रही नाही ज्यामुळे तल्लख बुद्धीमत्ता असूनही IIT मधे जिला प्रवेश नाकारला , तिला Massachusetts Institute of Technology ( MIT ) नी तिच्या International Olympiad of Informatics ( Programming Olympiad ) मधल्या दैदिप्यमान यशामुळे (सलग ३ वर्षे २ सिल्व्हर आणि १ ब्राँझ मेडल ) scholarship देऊ केली त्यामुळे आता ती तिच्या आवडत्या computer science मधे रीसर्च वर्क करू शकेल.
(MIT च्या नियमांमधे ही व्यवस्था आहे की जे विद्यार्थी वेगवेगळ्या Olympiads मधे medal winners असतात त्यांना MIT त प्रवेश दिला जातो )

सलाम .....

तिच्यातल्या computer programming talent लाही , तिच्या आईलाही आणि त्या आईच्या लेकीलाही , ज्यांनी \' मेरीट \' हे \' मार्कांपेक्षा \' कितीतरी वरचढ असते हे अतिशय उज्ज्वलपणे जगाला सिद्ध करून दाखवले.

फक्त एक खंत तिच्या आईच्या , सुप्रियाच्या बोलण्यातून जाणवली की एवढे करूनही मूळ मुद्द्याचा मूळ गाभाच बर्याचशा पालकांच्या लक्षात येत नाही. 
त्यांचे विचारणे एकच असते , MIT ला प्रवेश कसा मिळवायचा हो?

त्यावर त्यांचे जीव तोडून एकच सांगणे असते ...

पालकांनो ते लक्षात घ्या .. \" आम्ही कधीही MIT च्या प्रवेशाचे ध्येय ठेवले नाही. बस्स मुलांना जे आवडेल ते करूद्या ... यश आपोआपच मागे येईल \".

सुप्रिया पोतनीस
**Team Bharatiyans**

#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his ‘Mission 2020’ .

 

सुप्रिया पोतनीस

टीम भारतीयन्स

बातमी सौजन्य

इंडियन एक्स्प्रेस