Bhartiyans

Menu

प्लास्टिकच्या दुष्परिणामांविषयी जनजागृती करण्यासाठी महाराष्ट्रभर शेकडो व्याख्याने देणारा अवलिया

Date : 26 Nov 2016

Total View : 159

मिलिंद पगारे हे ५८ वर्षीय ‘तरूण’ शेकडो व्याख्याने देऊन ‘प्लास्टिकचे दुष्परिणाम आणि त्याला पर्याय' या विषयावर जनजागृती करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढताहेत. त्यांच्या अनमोल कार्याची ओळख आज करू


सारांश

‘YES WE CAN’ अशा सकारात्मक विचाराने गुजरातच्या जामनगरमध्ये मॅकेनिकल इंजिनिअर म्हणून काम करणाऱ्या मिलिंद पगारे यांनी प्लास्टिकविषयी जनजागृती करण्यास सुरुवात केली. ‘प्लास्टिक हटाव, देश बचाव’ असा नारा देत मिलिंद या ५८ वर्षीय ‘तरूणाने’ कॉलेज, कंपन्या, संस्थासाठी शेकडो व्याख्याने विनामूल्य देऊन संपूर्ण मसविस्तर बातमी

तुमच्या दैनंदिन आयुष्यात अढळ स्थान पटकावलेले पण तुमच्या भावी पिढ्या संपवून टाकण्याची दाहकता जोपासणारे प्लॅस्टीक तुम्ही तुमच्या आयुष्यातून हद्दपार करू शकता? ‘प्लॅस्टीक’चे दुष्परिणाम आणि त्याला पर्याय\' या विषयावर शेकडो व्याख्याने घेऊन अख्खा महाराष्ट्र पिंजून काढणाऱ्या एका अवलियाला, ५८ वर्षाच्या तरुणाला, आज भेटूया, हे आहेत श्री. मिलिंद पगारे. #Bharatiyans सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत एक गोष्ट आपल्या बरोबर नी:शब्दपणे वावरत असते. सणासुदीचे दिवस असो वा मुलांच्या शाळेची गडबड, भाजीला जायचे असो वा हॉटेलमधून पार्सल आणायचे असो, फ्रीजमध्ये भाज्या ठेवायच्या असो वा पिकनिक ला जायचे असो, प्रसंग काहीही असो, वाढदिवस, समारंभ, गणपती, दिवाळी एक वस्तू आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाली आहे. ‘प्लॅस्टीक’ प्लॅस्टीकचा शोध १९ व्या शतकाच्या सुरुवातीला न्यूयॉर्क मध्ये लागला आणि काही दशकांमध्येच प्लॅस्टीकचा वापर आपल्या दैनंदिन व्यवहारात होऊ लागला. होऊ लागला आणि आता तर प्लॅस्टीक आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झालंय. पण ह्या प्लॅस्टिकचे जसे उपयोग आहेत त्यापेक्षा शतपटीने त्याचे अनेक गंभीर दुष्परिणाम आज सायन्सच्या आणि त्यामुळे सर्वसामान्यांच्या लक्षात आले आहेत. आजघडीस प्लॅस्टीकचा वापर इतक्या मोठ्या प्रमाणात आणि वारंवार होतो आहे की त्यामुळे पर्यावरणाचा समतोल पूर्णपणे बिघडला आहे. आणि याचे अतोनात गंभीर परिणाम प्राणी आणि मनुष्याच्या आऱोग्यावर दिसून आले आहेत. शासनाने प्लॉस्टिक पिशव्यांवर बंदी घालण्याचे आदेश दिले असले तरी या आदेशाची सर्वत्र सर्रास पायमल्ली सुरू असून प्लास्टिकच्या अतिरेकी वापराने प्रदूषणात दिवसेंदिवस भयंकर वाढ होत आहे. अनेक नाल्या-गटारांमध्ये प्लॅस्टीक अडकून पडल्याने पावसाळ्यात सांडपाणी तुंबते आणि साचते. तसंच अनेकदा प्लॅस्टीकमधून शिळे खाद्य पदार्थ फेकण्यात येत असल्याने हे प्लॅस्टीक खाऊन गाय, म्हशीसारखी अनेक जनावरे सर्रास मृत्युमुखी पडत आहेत. जितक्या सहजतेने प्लॅस्टिकने त्याचे जाळे पसरवले तितकेच कठीण होऊन बसले आहे त्याचे अस्तित्व मिटवणे आणि कमी करणे . आज अनेक देशांनी प्लॅस्टिकवर काही अंशी बंदी आणली आहे. प्लॅस्टिकची गुणवत्ता ठरवून फक्त त्याच गुणवत्तेचे प्लॅस्टीक वापरण्याचे कायदेही निघालेत. प्लॅस्टीक अगदी माती, पाणी, हवा यांच्यातून थेट आपल्या रक्तात जाऊन मिसळले आहे. मित्रानो, आज प्लॅस्टीकच्या या भस्मासुराने पृथ्वीला गिळायला सुरुवात केली आहे. अश्या प्लॅस्टीक विरोधी चळवळ उभारणारा, त्याचे दुष्परिणाम सांगून त्यावर पर्याय सांगणारा, जागृती करत फिरणारा ५८ वर्षाच्या मॅकेनिकल इंजिनिअर तरुण मिलिंद पांगारे. “YES WE CAN” आपण करू शकतो, ह्या वाक्याने सुरुवात करत अफाट उत्साहाच्या जोरावर शेकडोहून अधिक व्याख्यान देत महाराष्ट्र पिंजून काढलाय यांनी आत्तापावेतो. गुजरात मधल्या जामनगर मध्ये मॅकेनिकल इंजिनिअर म्हणून नोकरी करत असताना \"प्लॅस्टीक हटाव, देश बचाव\"चा नारा देत जनजागृती करता आहेत. कॉलेज, कंपन्या, संस्थामार्फत आयोजित अनेक कार्यक्रमांत त्यांनी प्लॅस्टिकच्या दुष्परिणावर व्याख्याने केलीत ह्या व्याख्यानांसाठी ते पैसे घेत नाहीत. इंग्रजी, हिंदी, मराठी, गुजराथी ह्या भाषांमधून ते व्याखाने करतात. ते म्हणतात, \"माझ्या प्रामाणिक प्रयत्नांमुळे एक माणूस जरी जागा झाला तरी माझ्या प्रयत्नांचे चीज झाले असे मी समजेन.\" आपण टाकलेल्या किंवा केलेल्या कचऱ्याचे पुढे काय? हा सततचा भेडसावणारा प्रश्न घेऊन उत्तर शोधण्यासाठी त्यांनी काही गोष्टीवर अभ्यास केला. अशावेळी आश्चर्यकारक पण चिंता वाढवणारे आकडेवारी त्यांच्या हाती लागली . प्लॅस्टिक खाऊन मुक्या प्राण्यांचे किती जीव जातात? गटारे तुंबतात, वाढत्या घाणींने आणि दुर्गंधीने किती लोकांचे आरोग्य धोक्यात येते? कोणतेही व्यसन नसलेल्या किती व्यक्तींना कॅन्सर झाला? त्याचे कारण काय? अशा नानाविध प्रश्नांची उत्तरे शोधत असतांना धक्कादायक आकडेवारी पाहून मिलिंद पगारे विचलित झाले. अशातच त्यांचा एक जवळचा निर्व्यसनी मित्र कॅन्सर मुळे हे जग सोडून गेला आणि सुरु झाले त्यांचे युद्ध प्लॅस्टीक विरोधी चळवळीचे. मिलिंदजींनी सुरु केलेल्या ह्या चळवळीने अनेक कंपन्यांमध्ये प्लॅस्टिकचा वापर टाळण्याचा प्रयत्न केला आहे. प्लॅस्टीकच्या बॉटल्स , चहाचे कप आणि प्लेट जाऊन त्या जागी स्टील किंवा काचेच्या चिनीमातीच्या कुठेकुठे अगदी मातीच्या वस्तूंचा पर्याय निवडला गेलाय. अनेक लोकांनी दैनंदिन वापरातील प्लॅस्टीकच्या पिशव्यांना पर्याय म्हणून कापडाच्या पिशव्या, कागदाच्या पिशव्या वापरायला सुरुवात केलीय. \"भारतीयन्स\"ने देखील जुन्या साड्यांपासून पिशव्या तयार करणाऱ्या महिलांची ओळख काही दिवसांपूर्वी एका लेखात करून दिली होती. संशोधनाचा संग्रह, काही माहितपट, लॅपटॉप, प्रोजेक्टर असा लवाजमा घेऊन प्रवास करणारे किरकोळ शरीरयष्टीचे वार्धक्याकडे झुकलेले पण अंगी प्रचंड ऊर्जा असणारे मिलिंद पगारे. मिलिंदजी म्हणतात, \" एका माणसानं जरी स्वतःसाठी स्वतःपासून सुरुवात केली तर नजीकच्या काळात अनेक हात ह्या चळवळीत सहभागी होतील. चळवळ अखंडपणे टिकावी आणि निसर्गाला पर्यायाने स्वतःला वाचवायची वेळ आता आली आहे. आपण सर्व ह्या चळवळीत सहभागी होऊ. दैनंदिन जीवनात किमान सहज टाळता येतील असे प्लॅस्टीक टाळू आणि त्याला सक्षम पर्याय शोधू. मिलिंदजींच्या उत्साहाला आणि ह्या चळवळीला टीम भारतीयन्स’च्या शुभेच्छा. आपण श्री. मिलिंद पगारे यांना व्याख्यानासाठी बोलावू इच्छित असाल तर संपर्क करा ७०१६२०४२७४ (7016204274)

#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his ‘Mission 2020’ .

 

टीम भारतीयन्स

टीम भारतीयन्स

बातमी सौजन्य