Bhartiyans

Menu

ह्रदयात शिरण्याचा मार्ग पोटातून जातो. म्हणूनच विचारांमधली सकारात्मकता वाढवण्याची सुरुवात करूया तुमच्या पोटापासून, ‘फुडीझम’पासून..!

Date : 26 Nov 2016

Total View : 172

माणसाचा सगळा आटापिटा जगण्यासाठी, पोटासाठी असतो. पोट भरल्यानंतरच बौद्धिक, मानसिक वगैरे भुकांची जाणीव होते. म्हणून चला सकारात्मकतेची सुरुवात करूया पोटापासून, ‘फुडीझम’पासून..!


सारांश

भारतीय खाद्यसंस्कृती जगातील कोणत्याही देशापेक्षा सर्वात जास्त समृद्ध, वैविध्यपूर्ण आहे. पण आज अनेक पारंपारिक किंवा नवे पदार्थ माहीतच नसतात. सांगणारं कोणी नसतं किंवा वेळच नसतो. मग नाईलाजाने आधार घेतला जातो इन्स्टंट पाककृतींचा. यात गैर नाही ; पण अनेक, सोपे, पारंपरिक पदार्थ आपण विसरलो आहोत. अशाच काही वसविस्तर बातमी

" निगेटिव्ह बातम्यांच्या जगात फक्त पॉझिटीव्ह आणि उत्साह वाढवणाऱ्या बातम्या.. "
मिलिंदने सांगितलेल्या भारतीयन्स पेजवर जेव्हा आले तेव्हा सर्वात आधी या ओळींनी लक्ष वेधलं.

मनात आपसूक विचार आला, की जर तुम्हाला पॉझिटीव्हीटी वाढवायची असेल तर सुरुवात पोटापासून का बरं करू नये?

माणसाचा सगळा आटापिटा जगण्यासाठी, पोटासाठी असतो. पोट भरल्यानंतरच बौद्धिक, मानसिक वगैरे वगैरे भुकांची जाणीव होते आणि मगच पॉझिटिव्हिटी आणि निगेटिव्हिटी यातला फरक कळू लागतो.

मग अस जाणवलं, की आपण ही 'पॉझिटिव्हिटी' वाढवण्यासाठी वेगवेगळ्या पारंपारिक खाद्यपदार्थांच्या रेसिपीज इथे देउन हातभार लावावा.

आपली भारतीय खाद्यसंस्कृती जगातील दुसऱ्या कोणत्याही देशापेक्षा सर्वात जास्त समृद्ध आणि वैविध्यपूर्ण आहे.

इथल्या प्रत्येक प्रांताची, खाद्यसंस्कृती भिन्न आहे. रीतिभाती वेगळ्या आहेत. तरी देखील आपण सगळे "भारतीय" म्हणून त्यांचा आदर करतो. त्यामुळेच "अतिथी देवो भव" ही आपली भारतीय संस्कृती आहे.

आजच्या काळात अनेकांना वेळ नसतो. मार्गदर्शन करायला कोणी वडीलधारे जवळ नसतात आणि मग नाईलाजाने आधार घेतला जातो तो झटपट, इन्स्टंट पाककृतींचा.

अर्थातच, यात काही गैर नाही ; पण इन्स्टंटच्या या जमान्यात आज अनेक साधे, सोपे, पारंपरिक पदार्थ आपण विसरलो आहोत.

म्हणूनच आता महिन्याच्या प्रत्येक मंगळवारी, मी आणि मिलिंद आळीपाळीने, काही ओळखीच्या तर काही विस्मृतीत गेलेल्या पारंपारिक भारतीय पदार्थांची ओळख 'फुडीझम'मध्ये आपल्याला करून देणार आहोत.

शक्य असेल त्यांनी ते पदार्थ घरी अवश्य करून पहा. भारतातल्या विविध राज्यातल्या अस्सल जातिवंत पारंपारिक पदार्थांची युनिक टेस्ट स्वत:ही घेऊन बघा अन मस्तपैकी घरच्यांनाही करून खाऊ घाला.

या लेखमालेमुळे लुप्त होत चाललेल्या भारताच्या विविध राज्यांतल्या खाद्यसंस्कृतीची ओळख तर तुम्हाला होईलच. तसचं तुमच्या कुटुंबीयांनादेखील नवनवीन आणि विविध चवीच्या डिशेस् घरच्या घरी खायला मिळाल्याने तेही खुश होतील.

चला, तर मग! आता पॉझिटिव्हिटी वाढवण्याची सुरुवात करूया आपल्या पासून आणि आपल्या पोटापासून...भारतीयन्स'च्या फुडीझम'पासून...

कारण,
मित्र आणि मैत्रिणींनो, 
घर पॉझिटिव्ह तर देश पॉझिटिव्ह !

#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his ‘Mission 2020’ .

 

मिलिंद वेर्लेकर

टीम भारतीयन्स

बातमी सौजन्य